Skip to main content

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 11/09/2013 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/25527 ...पुढे चालू आणखि एक गमतीदार, चवदार, व लज्जतदार विषय. संपूर्ण विषय ऐकल्यावर, यातल्या गमती कोणत्या? चव कोणती? लज्जत कोणती? आणी या गोष्टी चाखणार्‍यांची नक्की दारं कोणती? हे न कळल्यामुळे तुमचीही अवस्था विधानसभे सारखी त्रिशंकू होइल,यात शंका नाही............. =============================
जखमे सारखं
चिडचिडं करणारा सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे, रस्त्यावरून येता-जाताना काहि कारणास्तव ब्रेक मारून थांबावं, तर काहि लोकं आंम्हाला नखं ते शिखेचा अंत होईपर्यंत न्याहाळतात.

रीमेक बनवूयात

लेखक खटासि खट यांनी बुधवार, 11/09/2013 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
जंजीर, डॉन, शोले, अग्निपथ, गोलमाल अशा सिनेम्यांचे रीमेक येऊन गेले. अजून काही येऊ घातले आहेत. सहज मनात विचार आला, मिसळपाव या संस्थळावर प्रतिभावान, धनवान इसमांची कमी नाही. आपणही एखादा रीमेक बनवू शकतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे रीमेक कसा बनवायचा याची सखोल चर्चा आपल्याला इथे करता येईल. चर्चाप्रस्तावासाठी दोन शिणुमाम्यांची नावे समोर ठेवत आहे. त्यांचा एकदा फडशा पडला कि दुस-या नावांचाही विचार करता येईल. सर्वांना विनंती कि त्यांनी आपापले मौलिक विचार मांडावेत. या कार्यात आपल्या सर्वांचा हातभार लागावा ही अपेक्षा आहेच. रीमेकसाठी विचारार्थ ओरीजिनल शिणेमे खालीलप्रमाणे : १. रामगोपाल वर्मा कि आग २.

विस्मरणशक्ती, तुमची-माझी!

लेखक मीराताई यांनी बुधवार, 11/09/2013 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
विस्मरणशक्ती, तुमची-माझी! एखादी महत्त्वाची वस्तू अत्यंत काळजीपूर्वक कोठेतरी ठेवलेली असते, कोणत्याही क्षणी तिची निकड लागू शकते म्हणून. पण नेमक्या वेळी बघावं तर ती इथे नाही, तिथे नाही, अन् त्या तिथे? मग कुठे बरं 'गेली'? असा विचार करीत शोधा-शोध सुरू होते. कपाटातल्या वस्तूंची उलथापालथ होते. पलंगावरच्या गाद्यांच्या कडा आणि कोपरे उचलून आशाळभूत नजर तिथून फिरत राहते. कपाटांच्या खाली, टेबला-खर्ुच्यांच्या खाली वाकून वाकून पाहून कंबर दुखू लागते. वस्तू जिथे ठेवणे अशक्य, अशी ठिकाणेसुध्दा धुंडाळली जातात. पण छे:!

पुस्तकवेडा (लघुकथा)

लेखक मराठे यांनी मंगळवार, 10/09/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
सुनिलला वाचनाचं फार म्हणजे फारच वेड. आठवी/नववीतल्या ह्या मुलाचा वाचन व्यासंग कोणालाही थक्क करेल असाच होता. कोणतंही पुस्तक हाती आलं की ते वाचून पूर्ण केल्याशिवाय त्याला चैनच पडतफारच, मग कुठलाही विषय असो. घराजवळच्या पुस्तकाच्या दुकानातून शेकड्यानं पुस्तकं त्याने विकत आणून वाचली होती! (वाचनालयातली वापरलेली पुस्तकं त्याला चालत नसत.. प्रत्येक पुस्तक नवीन हवं). एकदा त्या दुकानात पुस्तकं चाळताना त्याला जाणवलं की त्या दुकानातली जवळ जवळ सगळीच पुस्तकं त्यानं वाचून संपवली होती. अचानकच त्याला फार रिकामं वाटू लागलं. ते एवढं मोठ्ठं दुकानही त्याला खूप लहान वाटू लागलं.

सार्थक

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 10/09/2013 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
आभार… तिच्या गारस वयाचे ओळखीच्या समयाचे आतर्क्य यमनाचे आणि त्यामुळे छेडल्या गेलेल्या अरूप यौवनाचे ……. !! त्यातूनच उतारावरचं तारुण्य नात्याचं लावण्य शब्दांचा प्रसव आणि भावनांचा दुर्लभ शृंगार लाभला आहे मला … "माझा मी",… "नसूनही असलेली माझ्यातली ती " भेटलीय मला असंख्य वेळा ……. अस्तित्वाशिवाय ……!! या गंधर्व क्षणांमधून जन्मलेली कविताच जिवंत ठेवील मला चंद्र माधवीच्या प्रदेशात तिची प्रतीक्षा करीत चिरंतन …. !! आभार पुन्हा एकदा आमच्या न भेटण्याचे, …… आजन्म ………………. !! …………………… अज्ञात
काव्यरस

स्वत्वाचा शोध

लेखक arunjoshi123 यांनी मंगळवार, 10/09/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
स्वत्वाची संकल्पना - मनुष्य स्वतःला 'मी' म्हणून संबोधतो. त्यात दोन भाग आले. मनुष्य एक जीव म्हणून कसा आहे याचे वर्णन हा पहिला भाग. अनेक शास्त्रांनी या भागावर चिकित्सा करून अधिकाधिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. आपल्या असा एक जीव असण्याचे श्रेय सहसा कोणी विवेकी मनुष्य आपल्याकडे घेत नाही. म्हणजे मी अमुकराव आहे 'म्हणून' माझ्याकडे विचार करण्याची शक्ती आहे, अन्न पचवण्याची शक्ती आहे, असे कोणी मानत नाही. दुसरा भाग म्हणजे ज्याचे संपूर्ण श्रेय प्रत्येकजण आपल्याकडे घेतो.

फरपट

लेखक जुईचे फूल यांनी मंगळवार, 10/09/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
नशीबाच्या शोधात दूर देशी आलो अन इथवर येऊन परतीच्या वाटाही विसरून गेलो हीच झाडं, हेच वारे, हेच ऋतू आपले पसरलेले हिरवे माळ अन रस्तेही आपले इथल्या मातीत पाय रोवून उभे राहू लागलो पाळामूळांसकट आता इथेच गुंतू लागलो तरीही येतो एक क्षण असाच अडवा तिडवा हृदयात थेट हात घालून घेतो सारा मागोवा फरपट्ल्यासारखा घेऊन जातो पुन्हा घरट्याकडे रक्ताळलेले आपण खोल आत मनामध्ये जखमा तशाच भरून निघतात पण व्रण मात्र तसेच प्रत्येक व्रण एक दूत होतो आठवणींचा पूल होतो आता पाय मातीत रोवूनही त्यात मूळं रुजत नाहीत त्यांनाही कदाचित वाटत असावं ही माती आपली नाही पायाखालची जमिन सरकतानाही रुजल्याचा आव आणतो ही माती ही झाडं हे सारं आपल

गणराया

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 10/09/2013 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
गणराया प्रथम नमन तुला गणराया, दाखवतो तू वाट भक्तांना आद्य पूजेचा मान तुझा आवडतो तू आम्हाला , संकट काळी धावून येशी, तुझ्या नामातच गोडवा किती ॐकाराचे स्वरूप तू, सर्व जगाचे रक्षण करशी तू चौशष्ट कलांचा,चौदा भाषांचा तूस्वामी दाता, बुद्धी ची देवता तू,सुबुद्धी दे आम्हांस, दुष्टांचा संहार कर,पापांचा नाश कर, तू सुखकर्ता,तू दु;ख हरता, विघ्नांचा तू विनाश करतो प्रसन्नतेचा तू एक आनंद उत्सव, सर्वाना तू आनंद देतो मंगलमय वातावरण निर्माण करतोस. तुझ गूण वर्णन कराया स्फूर्ती येते, सर्व संकटे घेऊन जाते तुझ्या दर्शनाने आम्ही पावन होतो.

मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे

लेखक शरद यांनी मंगळवार, 10/09/2013 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे ? "गीतरामायणा"तील सर्वात उत्कृष्ठ गीत कोणते? बरेच जण बरीच निरनिराळी गीते सांगतील. पण हे ठरवावयास आपण त्या दर्जाचे परिक्षक आहो तरी कां? तेव्हा प्रश्न थोडासा बदलू. तुम्हाला सर्वात जास्त आवडणारे गीत कोणते? आता ठीक. कॊणीही उत्तर देण्यास हरकत नाही. तुम्ही तुमचे मत द्याच. माझी पसंती वरील गाण्यास. पतीने त्याग केल्याच्या बातमीची वीज कोसळ्यावर सीतेने जा धीरगंभीरतेने लक्ष्मणाला निरोप दिला आहे तो तिच्या आईचा, धरतीचा, वारसा सांगणारा आहे. सगळा दोष श्रीरामावर लादण्यास वाव असतांना ती केवळ एकदा तसे म्हणावयास सुरवात करते व लगेच थांबते.

विकासाची भारतीय संकल्पना..२

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 10/09/2013 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
विकासाची भारतीय संकल्पना ...पण इच्छा पूर्ण कमी करता येणारच नाहीत ! शरीर आहे म्हणजे शरीर धर्म आहे आणि म्हनून त्याच्या किमान गरजा आहेत , वासना - कामना आहेत ! त्याचे " दमन " करता उपयोगी नाही तर त्याला निर्धारित आणि सुनियंत्रित वाट करुन द्यावी लागेल. त्याचे योग्य दमन करता आले नाही तर त्या " केला जरी पोत बळेचि खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे या न्यायाने वासना - कामना अधिकच चेतविल्या जातील ! आणि म्ह्णूनच त्यांचे निर्धारित आणि सुनियंत्रित व्यवस्थापन म्हणजे विवास संस्था आणि चार आश्रम !