Skip to main content

दीपावली चे मागणे

लेखक sश्रिकान्त यांनी गुरुवार, 31/10/2013 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाचा झरा, प्रकाशाचा पाऊस, प्रेमाची रीमझीम, नातीगोत्यांचा संगम, लष्मीचा व्रषाव, समाधानाचा कीनारा, जीवनाचे वाहणे, कधी न थांबणे, मीसळपावकरांची दीवाळीं, आनंदी जावों, दीपावलीचे हे एकच मागणे.

गव्हाणी घुबडाच्या घरात.... समारोप..!! They are back...!!

लेखक गवि यांनी गुरुवार, 31/10/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा धागा भरुन वहायला लागला. घुबडाच्या न बांधलेल्या गबाळ्या घरात खूप जणांना डोकावण्याची उत्सुकता दिसली. नवीन प्रतिसाद शोधणं त्या धाग्यात कठीण झाल्याने हा आणखी एक धागा तयार करतोय. अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??! पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं..

पुरातनासोबत काही क्षण : मध्यप्रदेशातील मितावली आणि पडावली मंदिरे

लेखक अमेय६३७७ यांनी गुरुवार, 31/10/2013 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
मध्य प्रदेशातील चंबळ खोर्‍यात अनेक पुरातन मंदिरे आहेत त्यापैकीच ह्या दोन जागा : मितावली आणि पडावली. नुकतीच इथल्या प्राचीन मंदिरांना भेट दिली. यापैकी नवव्या शतकातील बांधकाम असलेले मितावली येथील वर्तुळाकार मंदिर अजूनही बरेच सुस्थितीत आहे. आपल्या संसदेची वास्तू या मंदिराची प्रेरणा घेऊन बांधण्यात आली असे मानण्यात येते. छोट्या टेकडीवर स्थित मितावली थोडे दुर्गम भागातच आहे. ग्वाल्हेर - कानपुर हायवेवर १० किमीनंतर हायवे सोडल्यावर, पुढील २५ किमीचा रस्ता बरेच ठिकाणी खचलेला आहे. मात्र सभोवतालचे दृश्य रस्त्याबद्दलच्या वैतागाला थोडे सुसह्य करते.

फुकाडे

लेखक क्रेझी यांनी गुरुवार, 31/10/2013 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या पृथ्वीवर जितकी म्हणून जनता,स्त्री-पुरूष कोणीही जे बिडी, सिगारेट किंवा सिगार फुकतात ते सगळे फुकाडे! ही सगळी फुकाड्यांची जमात एकजात निर्बुध्द आहे! निसर्गाने दिलेली बुद्धी चालवायला ह्यांना असल्या फालतू गोष्टीची गरज पडते हे बघून खरंच कीव येते ह्या लोकांची आणि जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून किंवा बसून किंवा कारमधे, रिक्षामधे किंवा वाट्टेल तिथे हे लोक फुकू शकतात हे बघून अगदी संताप होतो माझा!! आमच्या ऑफिसच्या बाहेर तर मोठा सिग्नल आहे त्यामुळे कायम रहदारी.

मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही

लेखक निरु यांनी गुरुवार, 31/10/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही. आता हे वाचून तुम्हाला वाटलं असेल, आला... आणखी एक पर्यावरणवादी आला. आता हा पतंग, मांजा, त्या पतंगांसाठी होणारी वृक्षतोड आणि पतंगांचा कचरा यावर छान लांबलचक भाषण देणार आणि महा बोर करणार.... नाही!!! काळजी करू नका. माझा तसला कसलाही उद्देश नाही. माझा विरोध त्या पतंगांना किंवा त्या वृक्षतोडीला किंवा खरं सांगायचं तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या अपेयपानाच्या (दारू पिणे याला सभ्य मराठी भाषेत 'अपेयपान' म्हणतात) पार्ट्यांनाही माझा विरोध नाही.

सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल?

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 31/10/2013 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी तिकडे जायची वेळ झाली, कि मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे नाडी सोडण्याचं, बांधण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल ? कधी वापरली असेल ? आणि कशी बनवली असेल ? ... विशेषतः पायजम्याचं कौतुक वाटतं हो ,च्यायला कोणच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी कापडाच्या दोन भोंगळ्या करून त्या एकमेकांना शिवून टाकायच्या, त्यात तंगड्या घुसवून मग हे झुंबाड खाली सरकून जाऊ नये, पण योग्य वेळी पटकन सरकवताही यावे, म्हणून त्यात नाडी घालावी, बांधावी, सोडावी ?

हलके व्हा .. !!

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 31/10/2013 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्रास झालाय त्रास.. गेले आठवडाभर ऑफिसमध्ये एवढे मरमरून काम करावे लागतेय जेवढे मी महिन्या महिन्याला मिळून नाही करत. जणू काही यंदा सर्व कर्मचार्‍यांचा दिवाळी बोनस मला एकट्यालाच काढायचा आहे. जेव्हा दिवसभरात आंतरजालावर (ईंटरनेटवर) एखादी चक्कर टाकायलाही वेळ मिळत नाही तेव्हा जशी जगाशी संपर्क तुटल्याची प्रकर्षाने जाणीव होते, ती गेले काही दिवस मी अनुभवतोय. पंधरा मिनिटांसाठी टॉयलेटला जाऊन हलके होणे आणि तिथेच गपचूप मोबाईल काढून व्हॉटसअपवरचे मेसेज बघणे हा एवढाच मनोरंजनाचा कार्यक्रम दिवसभरात उरलाय.

सगळ्यात पहिला गडू कोणी बनवला असेल?

लेखक भाते यांनी बुधवार, 30/10/2013 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
घन निल यांचा लाडू झाला, ३_१४ विक्षिप्त अदिती यांचा झाडू झाला, खटासि खट यांचा खडूसुद्धा झाला. मा. श्री. विजुभाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे साडू आणि भाडू राहीले आहेत. रडू आणि भिडू चे क्वापीराईट मा. श्री. ध्यानस्थ बगळा यांनी घेतले आहेत. च्यायला, गडू कसे काय विसरले सगळे? त्याचा क्वापीराईट कोणीही कसा नाही घेतला? मा. श्री. वटवाघुळ यांनी गडू संबंधी सुतोवाच केलेच आहे. तेव्हा आधी कोणी जिलबी टाकायच्या आधी आपणच बाराखडी पुर्ण करण्याचा प्रयत्न करूयात या सदविचाराने हा धागा काढत आहे. मला पडलेला प्रश्न म्हणजे सगळ्यात पहिला गडू कोणी बनवला असेल? तोच तो गडू, आपण पाणी पिण्यासाठी वापरतो तो. ज्याला, पेला, भांडे इ.

मंतरलेले दिवस ते, पुन्हा परत येतील का....

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 30/10/2013 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
येतील का मिपा चाळत असताना एका धाग्याचं नाव वाचलं आणि त्या मक्त्याला धरून विचारांना बरोबर घेत मग काव्य सुचत गेलं... aaa नाणेघाटच्या अविस्मरणीय ट्रेक मधील एक निवांत क्षण मंतरलेले दिवस ते, आता परत येतील का वेळीअवेळी मित्र माझे हाका मारत येतील का मान्य आहे सगळे येथे गरजेपुरते सखे गरजेला मी साद घालता तरीही धावत येतील का भेटलास आनंद झाला, नको म्हणाया कुणी नाही भेटलो म्हणून साले शिव्या घालत येतील का निर्जळ झाल्या आपुलकीच्या नद्या इथे डोळ्यात प्रेमाचे ते झरे नभातून वाजत गाजत येतील का मिटेल का कधी इथली ही विषयांची वानव