Skip to main content

मंतरलेले दिवस ते, पुन्हा परत येतील का....

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 30/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
येतील का मिपा चाळत असताना एका धाग्याचं नाव वाचलं आणि त्या मक्त्याला धरून विचारांना बरोबर घेत मग काव्य सुचत गेलं... aaa नाणेघाटच्या अविस्मरणीय ट्रेक मधील एक निवांत क्षण मंतरलेले दिवस ते, आता परत येतील का वेळीअवेळी मित्र माझे हाका मारत येतील का मान्य आहे सगळे येथे गरजेपुरते सखे गरजेला मी साद घालता तरीही धावत येतील का भेटलास आनंद झाला, नको म्हणाया कुणी नाही भेटलो म्हणून साले शिव्या घालत येतील का निर्जळ झाल्या आपुलकीच्या नद्या इथे डोळ्यात प्रेमाचे ते झरे नभातून वाजत गाजत येतील का मिटेल का कधी इथली ही विषयांची वानवा उगीच कुणी मग शाळेच्या त्या गोष्टी सांगत येतील का मी दिसता जे हात दाविती, हसती बघून मजला मी नसता ते सगळे चेहरे मला विचारत येतील का गर्वाच्या ईर्षेच्या भिंती तुटतील कधी अपूर्व स्वत:स विसरून स्वत:च सारे स्वत:स शोधत येतील का - अपूर्व. सर्व हक्क राखीव.
लेखनविषय:

वाचने 2251
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

अरेच्चा! माझा धागा इन्विजिबल राहिला की काय :P प्रतिसादच नाहीत :P

खूप छान गझल ! प्रा. अरुण म्हात्रे यांच्या शब्दात सांगायचे तर " ते दिवस आता कुठे जेंव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही तिची सावली भेटायची" हरवले ते दिवस … !

कल्पना, फोटो आणि त्यानुरूप कविता. फार छान!

सुंदर !