Skip to main content

माणसाचा स्वभावाच आहे तो...

लेखक गजानन५९ यांनी सोमवार, 04/11/2013 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचा स्वभावाच आहे तो... माणसाचा स्वभावच आहे तो कुनि कामाला पुढे ढकलतो, बॉस अप्रेजल पुढे ढकलतो, तर एखादा गरीब मरणाला पुढे ढकलतो मरणाला कवटाळणारा क्वचितच जन्माला येतो, न मागता सगळे देणारा देवत्वाला पोहोचतो. तरीही मरणाच्या बाजारातली तेजी काही सरत न्हाई, काही जन मात्र चंदनाच्या लाकडाशिवाय सरणावर चढत न्हाई असच चालत हल्ली अस म्हणून भागणार न्हाई दुसर्याच पांघरून आपल्याकड वढून चालणार न्हाई न्हायतर एक दिवशी वढलेल्या पांघरुणाखाली गुदमरला जाशील. पन माणसाचा स्वभावच तो आक्षी म्हणूनशान भागणार न्हाई... --------------------------------------------------------------------------- एक विनंती :- हे जे का

तपस्या

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 04/11/2013 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
का गं आज अशी शांत का ? कोणी बोललं का तुला ? विशेष काही नाही.

सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र.

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 03/11/2013 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे. याबद्दल मदनकेतु म्हणतो: "... एवढ्या हजारो स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना घेऊन द्वारकेपर्यंतचे शेकडो योजने अंतर कसे पार करणार? एवढा मोठा जथा पायी चालून जाणार म्हणजे किती दिवस लागतील? वाटेत रानटी पशु किंवा रानटी लोकांच्या टोळ्या यांच्यापासून संरक्षण कसे करायचे ?

दुिनया

लेखक sश्रिकान्त यांनी रविवार, 03/11/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
सोनं पांघरुन बसल तर चामडही िवकत, चामडं पाघरुन सोनं िवकणार्याला आजकाल कोण िवचारतं? झगमगाटाची इथली दुिनया, चलती का नाम गाडी, गरीबदुबळ्याचं आयुष्यं मात्र कस्पटाची काडी स्वत: साठी जगणार्यांची बेपव्रई मस्ती, आत्याचारी प्रव्रुती मागे गरीबाची नालस्ती िवकासाचा ध्यास घेऊनी पाऊल चंद्रावरती, तरीही नांदत आहेच येथे खेकड्यांची प्रव्रुती कुठला देश? कसला वेश? कुठली नाती? कुठली माती? हेच िशकवून गेली का हो भारतीय संस्कंरुती?

१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलिड लोचा

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 03/11/2013 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
गरवारे कॉलेज मध्ये असताना आमचा एक छान ग्रूप जमला होता .बर्याच वर्षानी आम्हि काही दिवसापुर्वि एक मस्त गेट टुगेदर केल. खाण -पिण आणि गगन भेदी गप्पा . सगळे साधारण २८ ते ३० या वयोगटातले .या गप्पांमध्ये मला आणि माझ्या एका मित्राला एक गोष्ट strike झाली की आमच्या गप्पांमध्ये खूप वेळा 'आपल्या वेळेस अस नव्हत ' हे वाक्य अनेक वेळेला repeat झाल होत ……. आईला ! भर तिशीतच आम्हाला nostalgia आला कि काय ? मला अस वाटत होत की हा निवृत्त झाल्यावर , सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्यावर पोरटोर मोठी झाल्यावर येणारी हि गोष्ट असते . कुठेतरी काहीतरी चुकत आहे खास. म्हणजे अस पाहा .

तू उत्तर नाही दिलंस मला

लेखक वडापाव यांनी रविवार, 03/11/2013 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
तू उत्तर नाही दिलंस मला मी एक प्रश्न विचारला का तुझ्यातल्या नव-याने आज माझ्यावर हात उगारला? तू उत्तर नाही दिलंस मला हवं तर पुन्हा विचारते तुझ्या चुकांचं खापर मी का डोक्यावर माझ्या मारते? तू उत्तर नाही दिलंस मला मी केव्हाची वाट पाहत्येय संसार अधोगतीच्या प्रवाहात जातोय आणि मीही त्यात वाहत्येय तू उत्तर नाही दिलंस मला उलटून बोलतोयस तू फक्त तुझ्यासारखाच मीही जाब विचारला तर का खवळतंय तुझं रक्त? तू उत्तर नाही दिलंस मला आता वाट पाहून मी थकले तुझा विश्वास मिळालाच नाही आज तुझ्या प्रेमालाही मी मुकले

आता तुमीच सांगा रायल बुलेट वापरावी का? ऑ?

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 02/11/2013 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
आता तुमीच सांगा रायल बुलेट वापरावी का? ऑ? तसं म्हनाल तर आपला बारदाना लई मोट्टा है. चाळीसपंनास एकर उस है. निम्मा उस जातोय साकरकारखान्यात. निम्या उसाचं गुर्‍हाळं लागत्यात. द्राक्षे है. मागल्या सालाच्या मागल्या साली वायनरी फैक्ट्रीचे सत्तर टक्के शेर घेतले. द्राक्षे वायनरीत नाय तर फारेनला जात्यात. सोसायटी, ग्रामपंचायत झालंच तर पंचायत समिती आपल्याच ताब्यात है. पुढल्या सालाला झेडपीत उडी मारायची है. दोन गण आपलेच है त्यामुळे फिकीर नै. उगाच नै कै पंचक्रोशीत बाळासायेब म्हनून आपल्याला वळखतेत. काय? तस सौंसारपानी बरा चाललाय. घरामदी एकाला तिन तिन गाड्या हैत.

टबुडी टबुडी जसवंती

लेखक तिमा यांनी शनिवार, 02/11/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी खूप जुनी आहे. आई,नाना १९४५ च्या सुमारास मुंबईत आले. मुंबईला त्यांचे कोणीच नव्हते. फक्त नानांची नोकरी भक्कम होती. परवडेल अशी जागा, त्यावेळच्या मुंबईच्या हद्दीबाहेरच मिळत होती. मालाड मुंबईच्या बाहेर होतं. स्टेशनपासून साधारण १० मिनिटांवर एका चाळीत दोन खोल्यांची जागा त्यांना मिळाली. पहिल्या मजल्यावर, ते धरुन तीन बिर्‍हाडे होती. पाणी खालून विहीरीवरुनच आणावे लागे. संडास त्याच मजल्यावर पण बराच लांब. बाकी शेजार कॉस्मॉपॉलिटन! एका बाजुला सिंधी तर दुसर्‍या बाजुला गुजराथी. हे गुजराथी खूपच श्रीमंत होते. (हो, त्याकाळी श्रीमंतही चाळीत रहात.) त्यांची जागा मोठी होती.

पहीली आंगोळ

लेखक sश्रिकान्त यांनी शनिवार, 02/11/2013 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज दीवाळी. दीपावली म्हणल की स्रवात आदी लक्षात येते ती पहीली आंगोळ. काय थाट आसतो तीचा, बगा ना इतर वेळी आंगोळ करण्यात आणी दीवाळींच्या पहील्या आंगोळीत कीतीफरक असतो. इतर वेळी लोक करतात म्हणुन आपल आंगोळ करायची, साला तोच रेगुलर साबण घासघास घासायच पाणी ओतायच की झाली आंगोळ. पण दीवाळींची पहीली आंगोळ म्हणजे... सारवलेल आंगण, त्यात रांगोळी वर पाट ठेवलेल असत. पहाटेच मस्त वातावरण, आंगाळा सुहासीक ऊटण लावल जात. खास दीवाळी साठीच नवीन साबन काडलेला आसतो, मग तेे लाउन आंगोळ करायची, त्या नंतर आई कींव्हा बहीण ओवाळते तो क्षण सारच तअत सोहला आसतो.त्यानंतर देवा पुढे नमस्कार करुन फराळांवर ताव मारणे सार काही अद्भुत.

आली सुमधूर संमोहक दिवाळी

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 02/11/2013 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहा आली सुमधूर संमोहक दिवाळी... दूर करून अंधार कृष्णछायेच्या कपाळी ! आशा घेऊन अश्विन सुमंगल सकाळी !! घेऊनी सोनप्रकाश ओजस्वी आश्वासक ओंजळी ! लख्ख करण्यास अनंत आकाशगंगेच्या ओळी !! ती पहा आली सुमधूर संमोहक दिवाळी... समग्र संकट समूळ सारीत ! सर्वसमावेशक सण सोहळा सुशोभित !! अंधार होऊनी निसंशय पराजित ! प्रकाश येऊनी मनात विराजीत !!