Skip to main content

अनुराग कश्यपचे सेन्सॉर बोर्डाला आव्हान

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 27/11/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमात धूम्रपान दाखवले तर तिथे धूम्रपान हानीकारक असल्याचे बंधन सेन्सॉरने घातले आहे ते व्यक्तीस्वातंत्र्याला मारक आहे असे अनुराग कश्यपचे मत आहे. असले डिसक्लेमर्स दाखवल्याने रसभंग होतो असे मलाही वाटते. लोकांना अशा व्यसनापासून मुक्त करण्याची जबाबदारी सिनेमा निर्मात्यांची आहे का? असाच आचरटपणा आणखी वाढवायचा असेल तर स्मगलिंग, भ्रष्टाचार, चोरी, खून, बलात्कार अशी दृश्ये दाखवताना तिथेही असे करणे बेकायदा आहे अमुक एक शिक्षा होऊ शकते असे डिस्क्लेमर्स दाखवा असा सेन्सॉर आग्रह धरू लागला तर काय? खरोखरच हे इतके जीवघेणे असेल तर सरकार ते थेट बेकायदेशीर का नाही ठरवत?

विज्ञान आणि चमत्कार - ग्रंथ परिचय

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 27/11/2013 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथ परिचय – विज्ञान अणि चमत्कार भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान? या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे? बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय?

' माझ्या सासुबै ! ' -पूढे

लेखक जेनी... यांनी बुधवार, 27/11/2013 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
' माझ्या सासुबै ! ' ____________________________________/\______________________________________ त्या दिवशी मी जाम खुश होते .बामच्या बाटलीचीहि गरज पडली नाहि .. रोजच्या कचकचीवर सुचलेल्या ऊपायांवर एवढी खुश होते कि चिडुन ३६ च्या आकड्यात असणारे आम्ही दोघे ६३ च्या आकड्यात आलो होतो :) तब्बल आठवडाभर सासुबैंचा जवळुन अभ्भ्यास केला तेव्हा लक्षात आलं कि सासुबै आरामप्रिय आणि स्तुतिप्रिय प्राण्यात मोडतात. अश्या व्यक्तिंना त्यांच्या कलेने घेवुनच आपल्या कलेत आणावं लागतं . मला त्यांना नाराज करायचं नव्हतं.

पीनट बटर

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 26/11/2013 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच जाणतो, की, जर व्यायाम ही नाण्याची एक बाजू असेल, तर दुसरी बाजू अर्थातच सकस आहार आहे. सकस आहाराचा एक अविभाज्य भाग म्हणजे प्रथिनं. आपल्या शरीराला (पुरेसा व्यायाम करत असल्यास) प्रतिदिन १ ग्रॅम प्रति किलो (६० किलो वजन असलेल्या व्यक्तीला प्रतिदिन ६० ग्रॅम प्रथिनं) इतकी प्रथिनांची गरज असते. शरीरसौष्ठव, वजनवाढ किंवा इतर विशेष उद्दिष्ट असल्यास १.५ ग्रॅम प्रति किलो. आता, शाकाहारीं मंडळींना प्रथिनांची गरज भागवण्याचे स्त्रोत कमी असतात. कम्प्लीट प्रोटीन जे म्हणतात ते शाकाहारात फार कमी मिळतं. त्यामुळे वेगवेगळ्या स्त्रोतांतून प्रथिनं शरीरात जावी लागतात.

वेडा गणू

लेखक सचीन यांनी मंगळवार, 26/11/2013 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
गजाअण्णांना सकाळी सकाळी आपल्याकडे पाहून ज्योतिषी महाराज खुश झाले. "या या अण्णा, अलभ्य लाभ, आज आमच्याकडे कस येणे केले. यावर गजाभाऊ उतरले,"अहो काय सांगायचं तुम्हाला, आमचा गणू वेड्यासारखे वागतोय, इतका शिकला पण हुकलाहो. भलते सलते प्रश्न विचारतो. हे अमुक का? हे तमुक का? मागे ३ महिन्यापूर्वी तुमच्या कडे चांगले दहा हजार खर्चून त्याची शांती केलीय. पण आता तर तो भलताच अशांत झालाय. तुम्ही खरेच न हो बरोबर शांती केली होती? "तर हो, आपल काम म्हणजे सोळा आणे खरे" "अहो आम्ही ज्योतिष लोक, म्हणजे पृथ्वीवरचे सर्वज्ञच हो. "ते मरू द्या,तुमचे कीर्तन. मला आमच्या गणूची झकास पैकी कुंडली काढून द्या.

पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस पहिला-दुसरा/भाग १

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 26/11/2013 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्रीमती सोनाली मुखर्जी ह्यांचा "फुकेत-थायलंड" धागा पाहुन मी २०१२ साली मित्रासोबत केलेली टुर आठवली. त्या सफरीचे काहि निवडक फोटो येत्या काहि भागात देतोय. आशा आहे पाकॄ सारखाच हा धागाहि गोड मानुन घ्याल. फोटोंमधुन थायलंडचं सॄष्टिसौदर्य तुम्हि अनुभवाव हाच निखळ हेतु आहे त्यामूळे विस्तृत माहिती न देता फक्त फोटो देत आहे. १. बँकॉक एअरपोर्टवर उतरल्यावर जागोजागी असलेले मनमोहक ऑर्किड आपलं लक्ष वेधुन घेतात orchids २.

कसाब अजुन जिवंत आहे का ?

लेखक जेपी यांनी मंगळवार, 26/11/2013 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
२६/११ मुंबई हल्याला आज ५ वर्ष पूर्ण होतील . त्या हल्यात मृत झालेल्या लोकांना आज ठिकठिकाणी श्र्दांजली वाहिली जातेय . या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मला काही दिवसा पासुन पडलाय . कसाब अजुन जिवंत आहे का ? मंजे त्याला गुपचूप फाशी दिली ,दफन हि केला . मग त्याचा एखादा फोटो किवां चित्रफित फाशी देतानाची का नाही दाखवली जात . त्या सदाम हुसेन च्या फाशीची चित्रफित पहिली होती आपण . लादेन हि मेला हे निट कळाल . मग कसाब च्या फाशीचा एखादा पुरावा का नाही .

खळबळ

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 26/11/2013 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या तीर्थरूप वडिलांचे अकस्मात निधन झाले. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत आणि आत्मनिर्भर होते. त्यांच्या जाण्याने हरवल्यागत झालेली ही विकल मनोवस्था...................... ते समाधानाने भाग्यवंतासारखे अनंतात विलीन झाले. त्यांना सद्गती मिळेलच. त्यांची तत्परता, प्रमाणिकपणा, स्वावलंबन या आदर्श संस्कारांद्वारे ते आम्हा सर्व भावंडांत वास्तव्य करून असले तरी त्यांच्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत रितीच राहील.........
काव्यरस