Skip to main content

अस्वस्थता अस्वस्थता

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी शुक्रवार, 21/02/2014 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
अस्वस्थता अस्वस्थता अस्वस्थता अस्वस्थता राजकारण्यांच्या चालण्यामुळे राजकारण्यांच्या चालींमुळे त्यांनी त्यांच्या सोयींसाठी चालवलेल्या राजकारणांमुळे अस्वस्थता अस्वस्थता दिशाहीन आंदोलनांमुळे चारित्र्यहीन आंदोलकांमुळे त्यांनी त्यांच्या सोयींसाठी चालवलेल्या चळवळींमुळे अस्वस्थता अस्वस्थता हरवलेल्या मित्रांमुळे रोज भेटणार्‍या शत्रुंमुळे त्यांनी त्यांच्या सोयींसाठी जुळवु पाहिलेल्या नात्यांमुळे - कवी म.ना.दे.

जीवनगाणे - ४

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 21/02/2014 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनगाणे - १ जीवनगाणे - १ जीवनगाणे - २ जीवनगाणे - २ जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ३ मॉरीस ह्यूज फ्रेडरीक विल्कीन्स या इंग्रज भौतिकशास्त्रज्ञाने फॉस्फरसन्स, आयसोटोप सेपरेशन, ऑप्टीकल मायक्रोस्कोपी आणि एक्स-रे डीफ्रॅक्शन या भौतिक घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण करण्यात तसेच राडारच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा” सत्र तिसरे

लेखक विटेकर यांनी शुक्रवार, 21/02/2014 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
आता एकदम ५१ प्रश्न आहेत .. शेवटचा हप्ता. सोमवारी दासनवमी आहे .. तोपर्यन्त सोडविण्याचा प्रयत्न करावा, तसाही विकांत आहे. ५१ ‘वादविवादात पराभव झाल्यास जीभ कापून देईन’ असे म्हणणारे विद्वान कोण ? ५२ वादविवादात पराभूत झाल्यानंतर ते विद्वान समर्थ शिष्य झाले त्यानंतरचे त्यांचे नाव काय ? ५३ त्यांची नियुक्ती कोणत्या मठावर झाली ? ५४ शिरवळ मठाचे मठाधिपती कोण होते ?

काळी मावशी

लेखक mohite jeevan यांनी शुक्रवार, 21/02/2014 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते.

काय ह्या शाळा,

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/02/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात साधू वासवानी स्कूल मध्ये नर्सरीची फी २६,००० वरून ७५,००० आणि ज्युनिअर के.जी. ची फी २८,००० वरून १,००,००० केल्यामुळे पालकांचे आंदोलन. अरेरे. काय ह्या शाळा, केव्हडा माजोरीपणा. कशी शिकायची मुले ? व मनात येते एव्हढ्या फिया घेवुन हे असे काय विषेश शिकवत असतिल? शाळांच्या फी दरवाढ विरोधात पालकांचे आक्रमक रूप आपण नेहमीच पाहिले आहे. याचाच प्रत्यय पुण्यात आला आहे. पुण्यात संतप्त पालकांनी चक्क मुख्यध्यापकांनाच फी दरवाढ विरोधात लक्ष्य केलं आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे साधू वासवानी इंटरनॉशनल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. संतप्त पालकांनी मुख्यध्यापकांना घेराव घालत काळ फासलं आहे.

'पालखी'

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 21/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
'पालखी' कुणी मोल केले, कुणी मापले भल्या भाविकाने तुला कापले घडावीत रांगेतुनी दर्शने जरी चोरट्याने खिसे नापले उठे ही सुखाची तुझी पालखी उरे भर्जरी दुःख आपापले तुझी आसवे लागली सार्थकी तुझे त्याग नोटांवरी छापले नसे आज चिंता तुझी जीवना पहा दुःख हे छानसे रापले ! डॉ.सुनील अहिरराव

माज़ा अस्तित्वा - तंजावर मराठीतून पॉडकास्ट

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 21/02/2014 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, 1 मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे. आपली बोली भाषा टिकवून त्यातील विविध भाग रंजक व अभिनव प्रकारे कशी वापरता येतील असे सुचवणारे पर्याय शोधले आहेत.

वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 21/02/2014 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्श जितका बोलका हृदयांस होतो पानगळ असली तरी मधुमास होतो तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो मित्र म्हणणे जवळचा हे खास नाही ते तसे होईल तेंव्हा खास होतो तेज देण्या केवढा बघ सूर्य जळतो फायदा नात्यातला चंद्रास होतो केवढी माया तुझी आहे प्रसिद्धी स्पर्शतो क्षणभर तुला, तो दास होतो बंधने तुडवीत जातो सहज सारी हा तुझ्याइतका मलाही भास होतो प्रेम इतके काय कामाचे जिथे की, आपला वापर 'अजय' सर्रास होतो
काव्यरस

कश्या कश्याला मुकलो ते...

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/02/2014 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
आठ दिवसानी टुर वरुन घरी आलो.. समोर तु उभी प्रसन्न वदना. मोकळा केश संभार. काजळ कोरलेले आतुर नयन आठ दिवस ऑफिस कामाशिवाय काहिच सुचत नव्हते.. तुला पाहिले अन उमगले. कश्या कश्याला मुकलो ते...