Skip to main content

बौद्धिक कृष्णविवर

लेखक माहितगार यांनी शनिवार, 01/03/2014 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
बौद्धिक कृष्णविवर: लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते. बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४] युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात.

भयकारक भानगड

लेखक चलत मुसाफिर यांनी शनिवार, 01/03/2014 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझा भुताखेतांवर किती विश्वास आहे, हे मलाच माहिती नाही. भुतासारखी अक्राळविक्राळ माणसे बरीच भेटली. त्यांना सहन केल्यामुळे कदाचित भीती थोडी कमीही झाली असेल. पण खरे सांगायचे तर, अतींद्रिय शक्ती या विषयावर माझे मत अजून तयार व्हायचे आहे. अर्थात भुताटकी म्हटले की कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला आकर्षण वाटतेच. कदाचित त्यामुळेच राजस्थानमधील "झपाटलेला" भानगड किल्ला पाहायची सुप्त इच्छा फार दिवसांपासून होती. आंतरजालावर भानगडबद्दल अनेक चर्चा होत असतात. 'सनसनी' टाईपचे टीव्ही शो सुद्धा इथे कॅमेरे घेऊन येऊन गेलेले आहेत.

ए फ्यांड्री SSSS ईई ..

लेखक साळसकर यांनी शनिवार, 01/03/2014 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
ए फ्यांड्री SSSS ईई .. अंधारातून चाललेल्या एका सावलीला मी हाक मारली.. "ए अंड्या, XXXच्या, मर ना मेल्या.." तितक्याच उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया आली. यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच. फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय. पैकी हा एक. तितकेच स्पोर्टीगली घेणारा आणि पलटून एक कचकचीत शिवी घालणारा. दुसर्‍याला मात्र काय माहीत, ते फारसे रुचले नाहीये. काल मात्र त्याला गाठून मी विचारलेच, "काय बे रताळ्या, मोठा झालास का? राग का येऊन राहिला?" तर म्हणला कसा, "अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे .....

अहमदाबाद-गांधीनगर_१

लेखक अमितसांगली यांनी शनिवार, 01/03/2014 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
तर मग ठरले! अचानक मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर उपभोग घेण्याचा निश्चय करूनच कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यास सुरुवात केली. त्याचे झाले असे कि १६ फेब्रुवारीला महारक्तदान असल्यामुळे कॉलेजमध्ये पाटी टाकावी लागली. त्याची भरपाई सुट्टी मंगळवारी व बुधवारी शिवजयंती असा भांगयोग नशिबात कधी नव्हे तो जुळून आला. पण हे सगळे सोमवारी दुपारी कळले. त्यामुळे नशेतच सगळे विचारचक्र घुमू लागले. पहिल्यांदा खिशात हात घातला व सुटकेचा निश्वास टाकला. मग सगळ्यात पहिल्यांदा ओरंगाबादचा विचार आला पण ते इथे पलीकडेच असल्याने जेवढ्या लवकर आला त्याच वेगात निघून गेला.

भुजबळचा भयानक भ्रष्टाचार!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 01/03/2014 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
भुजबळांच्या छगनने आपल्या कुटुंबियांसमवेत महाराष्ट्राला मनसोक्त लुटले आहे. करदात्यांचा प्रचंड पैसा आपल्या घशात घालून आपले उखळ पांढरे केले आहे. भ्रष्टाचाराच्या क्षेत्रातील अग्रणी तटकर्याशी अटीतटीची स्पर्धा सुरु आहे की काय अशी शंका यावी. http://www.loksatta.com/mumbai-news/pwd-miniter-chhagan-bhujbal-in-trou… वरील बातमीच्या आधारे असे दिसते की छगनच्या कृपेने ठेकेदाराला ५ ते ६ हजार कोटीचा अवाजवी नफा झाला. अर्थात हे काही परोपकाराच्या भावनेतून नसावे.

गणपत आणी कोंबड्या

लेखक मनोजकुमार यांनी शनिवार, 01/03/2014 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
गणपत आणी कोंबड्या गणपत गावातील गरीब माणूस होता. त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असे. कधी कधी ह्या कोंबड्याना तो दाणे टाकीत असे. कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ. सगळ्या कोंबड्यानी दिलेल्या अंड्या मधून गणपत फक्त एक अंडा रोज उचलत असे.

गुडबाय, अमेरिका!

लेखक समीरसूर यांनी शनिवार, 01/03/2014 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतले आता काहीच (७) दिवस राहिलेत आणि इथे घालवलेल्या या ६.५ महिन्यांच्या वास्तव्यातील आठवणी मनात येत आहेत. भारतात परत गेल्यावर त्या आणखी जास्त येतील...सुरुवातीला थोडी धास्ती होती. लक्ष्मण देशपांडेंच्या 'वर्‍हाड निघालंय लंडनला' मधल्या "कस्स होईल? क्काय होईल?" सारखी मनस्थिती होती. पहिल्यांदाच बायकोला सोबत घेऊन इतक्या लांबचा प्रवास आणि वास्तव्य करणार होतो. इथे येऊन पोहोचलो आणि सगळं सुरळीत होत गेलं. माझ्या एका सहकार्‍याने (गगन) माझ्या नावावर आधीच अपार्टमेंट घेऊन ठेवलं होतं; त्यामुळे हॉटेलात न राहता आम्ही सरळ आमच्या अपार्ट्मेंटमध्ये रहायला आलो.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ३ : ख्मेर राजधानी "अंगकोर"

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 01/03/2014 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७...

भारतरत्न (?) विराट कोहली (??)

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 28/02/2014 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टरब्लास्टर सचिनला भारतरत्न दिले गेले तेव्हा सर्वाधिक आनंद होणार्‍यांच्या यादीत मी वरचे नाव राखून होतो. मराठी आणि मुंबईकर या सामाईक फॅक्टरबरोबरच तेंडुलकर आणि साळसकर यावरूनही एक आपलेपणाचा अभिमान होताच. त्या भारतरत्नाच्या मागे राजकारण शोधणार्‍यांनाही चार खडे बोल सुनावून झाले, काय करणार त्यावेळी भावनाच तश्या होत्या. ज्याने गेले वीस-पंचवीस वर्षे एक वेड लावणारा खेळ बघायचा छंद जडवला त्याच्या एक्झिटलाच हे दिले गेले होते. पुढे त्याच्यानंतरही क्रिकेट चालू राहिले, जे राहणारच होते. पण त्यामुळे ना त्याला कोणी विसरले ना विसरू शकणार. भारतरत्नाची हवा मात्र ओसरली, त्यावरचे वाद थंडावले.

ज्योतिषशास्त्राचा फायदा

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 28/02/2014 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत. ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो.