कालपासून ईटीव्ही वर एक नवीन 'रियालिटी शो' सुरू झालाय. झुंज मराठमोळी नाव आहे त्याचं. श्रेयस तळपदे त्याचं सूत्र संचालन करणार आहे आणि अनेक मराठी 'सेलिब्रिटी'नी त्यात भाग घेतलाय. त्याचे पहिले दोन भाग काल आणि परवा प्रदर्शित झाले.
तशीही आजच्या घडीला मराठीची वाट लागलेलीच आहे. ती अजून कशी लागावी याची काळजी आपण मराठी मंडळी घेतच आहोत. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, मनोरंजनाच्या वाहिन्या आहेतच, शिवाय असंख्य मराठी (म्हणवणारी) मंडळी हे काम चोखपणे पार पाडत असतात. असो. तर हा झुंज नावाचा कार्यक्रम बघत होतो. अक्षय कुमार किंवा आता रोहित शेट्टी जसा दिसतो, वावरतो अगदी तसाच, श्रेयस तळपदे वागायचा प्रयत्न करतो.