Skip to main content

अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भावले ========स्वच्छन्द मकरंद !!

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी शुक्रवार, 20/06/2014 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भासले !!!!घेई च्छन्द मकरंद . स्वच्छंद मकरंद, डॉ. दत्ता फाटक .

मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???

लेखक मारवा यांनी गुरुवार, 19/06/2014 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवसांपुर्वी मराठी संस्थळावर एक धागा माझ्या वाचण्यात आला होता. त्याचा विषय मला पडलेले प्रश्न अशा स्वरुपाचा होता. यात धागाकर्त्याने त्याला भेडसावणारे काही प्रश्न विचारले होते व त्याची उत्तरे ही अत्यंत अभ्यासपुर्ण अशी इतर सभासदांकडुन त्या धागाकर्त्याला मिळाली होती तेव्हापासुनच एक तीव्र इच्छा माझ्या ही मनात होती की आपण ही आपल्याला भेडसावणारे/पडणारे प्रश्न विचारुन बघावेत कदाचित आपल्याला ही आजतागायत माहीत नसलेली उत्तरे या निमीत्ताने सापडतील. अखेर आपला अनुभव माहीती ज्ञान हे इतक मर्यादीत आहे की त्यामुळे प्रश्नांना इतर ज्ञानी व्यक्तींसमोर मांडणे व उत्तर मिळतात का बघणे हा एक उत्तम पर्याय आहे.

नियती ...

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 19/06/2014 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते. आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही.

मी अनुभवलेला सह्याद्री

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 18/06/2014 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीतील गेल्या कित्येक वर्षातील भटकंतीच्या मोजक्या प्रकाशखुणा ;- 01 कोकणकडा - हरिश्चंद्रगड
02 पावसाळ्यातील हरिहर

घेई छन्द मकरंद - होमिओपॅथीचा भाग २ रा

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी बुधवार, 18/06/2014 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
. काली फॉस उर्वरीत भाग.आणखी काही औषधे मस्तिष्का संबंधीची याचं संदर्भातील विशेष +++++ ४ ) Aethusea-------- Fool”s Parsley या औषधाविषयी थोडंस डॉ. क्लार्क यांनी “डिक्शनरी ओफ़ प्रेकटीकल मटीरि-यल मेडीका मध्ये म्हटलं आहे, या औषधाचे दुसरे नाव एवढे सार्थ आहे की “”हे औषध मुर्खाचे”च आहे, परमेश्वराने मेंदूत अक्कल भरली तेंव्हा हा पाल्य गैरहजर असावा, कारण काहीं म्हणता कांहीही आकलन करण्याची, समजून धेण्याची पात्रताच या मुर्खाकडे नसते.

मनात पूजीन रायगडा !!!

लेखक धन्या यांनी बुधवार, 18/06/2014 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
पायाखालची रायगड जिल्ह्याची माती सुटून आता दहा वर्ष झाली मात्र त्या मातीचा सुगंध आजही मनात दरवळतोय. असं वाटतं की शाळेत आपल्याला पुर्ण नांव सांगायला सांगितलं आहे आणि आपण नांव सांगून झाल्यानंतर एका दमात "मुक्काम वडगांव कोंड पोष्ट गोरेगांव तालुका माणगांव जिल्हा रायगड" असा पत्ता सांगत आहोत. गावातून बाहेर पडून पूर्वेला तोंड करुन उभे राहीले की दूरवर समोर दिसणारा कावळे घाट आणि त्याच्या पाठीमागे दिमाखाने उभा असलेला छत्रपतींचा रायगड आजही नजरेसमोर तरळतो. लहानपणी आजीने सांगितलेली आख्यायिकाही आठवते. आमचे पोष्ट असलेल्या गोरेगांवाचे नांव म्हणे पूर्वी घोडेगांव होते.

जडण-घडण...1

लेखक माधुरी विनायक यांनी बुधवार, 18/06/2014 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
एक-एके-एक काम करण्याचा मला भयंकर कंटाळा. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी केली. ती आजही सुरूच आहे म्हणा. या मुशाफिरीमध्ये खूप माणसं भेटत गेली, खूप अनुभव मिळत गेले आणि बरंच काही शिकता आलं. या प्रवासात शाळा हा महत्वाचा टप्पा आणि त्यानंतर पुढचे टप्पे. पण फारसं ठरवून काही केलं नाही. समोर आलं, ते स्वीकारत गेले. म्हणजे बारावी झाल्यानंतर त्यातल्या त्यात जवळच्या मैत्रिणीला डी.एड्. चा अर्ज भरायचा होता, म्हणून मी पण भरला. त्यातल्या त्यात जवळची, म्हणजे इयत्ता सातवी आणि त्यानंतर दुसऱ्या शाळेत आठवी ते दहावी अशी साधारण चार वर्षं आम्ही दोघीही एकाच वर्गात होतो.

पुन्हा पाऊस, पुन्हा तू...

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 17/06/2014 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाने साद दिली नाद त्यास तुझा होता भिजलेली सर ओली चिंब स्पर्श तुझा होता... दाटलेले नभ वेडे भाराने ओथंबले थेंब आले सर सर सर मृद्गंध तुझा होता... मत्त गार गार वारा देहावरती शहारा लख्ख वीज लकाकली भास त्यात तुझा होता... मंद धुंद पावसात भिजलेल्या तन-मनात हुंकारला, आसुसला श्वास, तो ही तुझा होता...

बीज अंकुरे अंकुरे (शेतातील बालपण)

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/06/2014 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. माझे बालपण आमच्या शेताच्या सहवासात बागडण्यात गेले. आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. माझी आई प्रार्थमिक शिक्षिका, वडील मुंबईत प्रीमियर कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांनी शेती सांभाळायची म्हणून कायम नाइट शिफ्ट केली. घरात माझा मोठा भाऊ व आजी असे आमचे कुटुंब होते. शेतकरी आणि शेत हे दोन्ही एकरूप झाले म्हणजे मोतीदार धान्याचे पीक शेतात डोलू लागते. आमच्या शेतात तांदळाचे पीक दरवर्षी रुबाबात मिरवत असे. मे महिन्याच्या दाहक उन्हात मातीची ढेपळं खडखडीत वाळून शेतातील जमिनीला भेगा पडल्याने आकाशाकडे पाण्याच्या आशेने 'आ' वासून पावसाच्या प्रतीक्षेत असतात.