Skip to main content

मी अनुभवलेला सह्याद्री

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 18/06/2014 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीतील गेल्या कित्येक वर्षातील भटकंतीच्या मोजक्या प्रकाशखुणा ;- 01 कोकणकडा - हरिश्चंद्रगड
02 पावसाळ्यातील हरिहर
03 संजीवनी माची - राजगड
04 सागरगड आणि वानरटोक
05 कोकणकड्याचा भाऊ शोभावा असा कुलंगच्या पाठचा कडा आणि खोरं
06 ढगांची दुलई - कुलंगच्या माथ्यावरुन - कोपर्‍यातील टोक कळसूबाई
07 तोरण्यावरचा सूर्योदय
08 नळीची वाट
09 साधले घाट
10 कोकणकडा - बेलपाड्यातून
11 बागलाणचे राजे - सालोटा आणि साल्हेर
12 परशुराम मंदीर - साल्हेर
13 नाणेघाट
014 पेठ
015 सरसगड
016 कळसूबाईच्या माथ्यावरील मंदीर
017 शिवछत्रपतींचे सिंहासन - रायगड
18 केदारेश्वर मंदीर - पुरंदर
19 कोकणकडा
20 नकटा
21
022

वाचने 12433
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

साधले घाट हरिश्चंद्रगडाचा शेजारी असलेल्या कलाडगडाच्या जवळून खाली उतरतो. माळशेजच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा (वालीवरे) या गावातून सह्याद्रीवर चढाई करून घाटावर पोहोचण्यासाठी असलेल्या ३ वाटांपैकी एक म्हणजे साधले घाट. (दुसर्‍या दोन वाटा म्हणजे हरिश्चंद्रगडावर जाणारी नळीची वाट आणि बेलपाड्याहून माळशेजच्या गाडीरस्त्याला समांतर खिरेश्वरला चढणारी पायवाट). हरिश्चंद्राच्या नगर जिल्ह्यातील पायथ्याशी असलेल्या पाचनई आणि इतर गावातील लोक कोकणात उतरण्यासाठी आणि मुंबईच्या दिशेने येण्यासाठी कधीकधी साधले घाटमार्गे पदयात्रा कडून बेलपाडा आणि पुढे सावर्णे गाठतात. पावसाळ्यात या मार्गाने खाली उतरणे ही एक कसरत असते.

In reply to by स्पार्टाकस

तो साधले घाट नसून सादडे घाट आहे. घाटाच्या पदरात अर्जुनसादड्याची झाडी भरपूर असल्याने ह्या घाटवाटेला सादडे घाट नाव पडले. त्याचाच अपभ्रंश हल्ली साधले म्हणून होत असतो.

सुंदर. तुमच्या आठवणींच्या खजिन्यातील प्रकाशचित्र अप्रतिम आहेत. ही मंदीरं एवढ्या उंचावर, वस्तीपासून दूर का बांधली जातात? काही समजत नाही. व्यवसायानिमित्त भारतापासून, महाराष्ट्रापासून इतकी वर्षे दूर राहिल्याने ऐन उमेदीच्या काळातही गड, दूर्ग आणि सह्यपर्वत रांगांना भेट देण्याचा योग आला नाही. आता, पायी गड किंवा डोंगरकडे चढणे जमणार नाही. पण इच्छा प्रबळ आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकरजी, पूर्वी यवनांच्या भीतीने , ती तोडफोड करीत असल्याने मंदिरे उंचावर आणि दुर्गम जागेत बांधली असावीत .त्यामुळे दगड फोडायला का इतक्या लांब जा ? असा विचार यवन करीत असणार. आणि त्यात आपला भाबडेपणा.....कि देव जितक्या दुर्गम ठिकाणी , दर्शनासाठी त्रास होणार तेवढी भक्ती अधिक...!!!

एकच सुधारणा सुचवतो...आपण शिवछत्रपतींची समाधी म्ह्णुन टाकलेला फोटो,हा राजदरबारातील सिंहासनाच्या जागेवर बसवलेल्या मेघडंबरी चा आहे.....समाधी चा फोटो खाली डकवत आहे...Shivchatrapati Samadhi..बाकी सर्व फोटो उत्तम्..शुभेच्छा!

In reply to by पामर

फोटोंमधील गोंधळामुळे हे झालं. योग्य तो बदल केला आहे. मनापासून धन्यवाद !

ढगांची दुलई... मस्त... भटकंती आणि प्रकाशचित्रे अप्रतिम आहेतच. पण ढगांची दुलई सारखी समर्पक आणि चपखल नावं दृश्यानुभवात भर घालणारी.

सुंदर चित्रे ! सह्याद्री तसा खूप फोटोजनीक आहेच पण पावसाळ्यातले त्याचे रूप एकदम साजिरे होते. त्याचे बरेच भाव तुम्ही छान पकडले आहेत.

आपली इतकी सुंदर प्रकाशचित्रे माझ्या संगणकावर चित्र म्हणून लावण्यास आपली परवानगी आहे काय?

अप्रतिम प्रकाशचित्रे. ढगांची दुलई दृष्ट लागावी अशी आहे. संजीवनी माची बघून मागल्या वर्षाअखेरच्या राजगडाच्या आठवणी जाग्या झाल्या. :)

हरीश्चंद्र,कलाड्गड्,कुंजर,रतनगड आणि जोडुन अलंग,कुलंग,मदन्,कळसुबाइ असा ७-८ दिवसांचा जंबो ट्रेक करायची ईच्छा होतेय

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मी आणि माझ्या दोन मित्रांनी मिळून इगतपुरी ते लोणावळा असा ट्रेक केला होता १६ दिवसांचा. इगतपुरी-कुलंग-मदन-अलंग-रतनगड-कात्राबाईची खिंड-कलाड-हरिश्चंद्र-नळीच्या वाटेने खाली सावर्णे-भैरव-नाणेघाटाने खाली उतरून सिद्धगड-भीमाशंकर-लोणावळा घरी आल्यावर ४ दिवस पाय नावाचा अवयव आपल्याला असल्याचा पश्चाताप व्हावा असे दुखत होते.

फोटो सुन्दर आहेत. फोटो व कलात्मकता दोन्ही आवड्ले.

सर्वच्या सर्व फोटो जबराट आहेत. छत्रपतींच्या कृपेने यातल्या बहूतेक ठिकाणची माती हातांनी स्पर्श केली आहे. काही ठिकाणी अजूनही जायचं शिल्लक आहे. धुक्याच्या दुलईचा फोटो माझ्याकडे असाच्या असा आहे प्रतापगडावरच्या कडेलोट टोकावरून घेतलेला. टाकतो शोधून इथे.

तुम्ही भाग्यवान आहात ….सह्यद्रिच्या अंगाखांद्यावर खेळून आलाय…. तुमच्या द्वारे आम्ही सुद्धा काल्पनिकरित्या बागडून आलो तिथे…. धन्यवाद !!

__/\__ अवांतरः इतक्या सुंदर छायाचित्रांना तारीख नोंदीचे डाग खुप खटकले.