नारकोंडम बेट-- पुढे
नारकोंडम बेट-- पुढे
आमच्या सर्व लोकांच्या गणवेशात आणि बुटात समुद्राचे पाणी भरून ते जड झाले होते. जेमिनी किनार्यावर आणल्याबरोबर नौदलाच्या मुलभूत प्रशिक्षणाप्रमाणे मागे बसलेल्या नौसैनिकाने जेमिनीची मोटर सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण मोटार मध्ये सुद्धा पाणी शिरले होते आणि ती पण चालू होईना.आता प्रेम कुमारला अजूनच टेन्शन आले. कारण वायरलेस बंद होता. जेमिनीची मोटार चालत नव्हती (आणि त्याच्या खिशातील पाकीट आणि घड्याळ भिजले होते.) तो विचारू लागला सर आता परत कसे जायचे? मी का कुणास ठाऊक बेफिकीर होतो. मी त्याला म्हणालो कि जे होईल ते पाहू.
मिसळपाव
या वारीत अनेक बलुतेदारसुध्दा सामिल झाले होते.