Skip to main content

मिसळपाव लेखन सोय - चाचणी

लेखक नीलकांत यांनी रविवार, 19/04/2026 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार, 

मिसळपावच्या नवीन रूपात संगणकावर मराठी लिहिण्याच्या पध्दतीत थोडा बदल केला आहे. दुर्दैवाने गमभण module स्वरूपात नसल्यामुळे ही नवीन पद्धत बनवावी लागली आहे. आपण या नवीन पद्धतीला लेखनिक असे म्हणतोय. 

तुम्ही ही लेखनिक पध्दत वापरून पाहिली आहे का? लिहीताना काही अडचण येते आहे का? कुठला शब्द लिहिता येत नाहीये. अर्थात येथे लिहिता नाही आला तर इंग्रजीत लिहून सांगू शकता. 

कृपया लिहून बघा. त्रुटी सांगा. त्यावर उपाय करूया आणि ही पद्धत अधिकाधीक सोयिस्कर बनवूया. 

धन्यवाद.

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 18/04/2026 या दिवशी प्रकाशित केले.

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||ध्रू||

जवा येईल तवा आणीन पेट्रोल डिजेलला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||१||

सैपाक करत होती तवाच सिलेंडर संपला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||२||

साडी चोळी नको, नको घेऊ माळ तू मला
एकडाव पेट्रोलची टाकी भरून दे गाडीला ||३||

कोबीची भाजी करपली, मासे नाही भाजीला
डोनाल्ड अन बेंजामीनचा मुडदा बशिवला ||४||

राकेल नाय मिळत, झाडं नाय सरपणणाला
लवकर ये घराला, काळजी लागली मला ||५||

- पाभे
१८/०४/२०२६

काव्यरस

धुरंधरचे गाणे आणि बायकोचा दंडा"

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 18/04/2026 या दिवशी प्रकाशित केले.

एक गायक होता, जो आयुष्यभर फक्त दुःख आणि वेदनांनी भरलेली गाणीच गात असे. तुटलेलं हृदय, दगा, उदासी आणि एकाकी रात्री - हे त्याच्या गाण्यांचे नेहमीचे विषय होते.

त्याच्या लग्नाची २५वी वर्षगाठ होती. सकाळपासूनच बायकोने स्पष्ट इशारा दिला होता, “आज आनंदाचा दिवस आहे. कोणतंही नकारात्मक किंवा दुःखी गाणं म्हणू नकोस. नाहीतर बघून घेईन!”....

वेळास कासव महोत्सव

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 17/04/2026 या दिवशी प्रकाशित केले.

वेळास कासव महोत्सव पाहण्याची अनेक वर्षांची तीव्र इच्छा मला अखेर काल या पिटुकल्या कासवांच्या जन्मसोहळ्याला घेऊन गेली.

किंमत प्रणाली - भाग २

लेखक केदार भिडे यांनी गुरुवार, 16/04/2026 या दिवशी प्रकाशित केले.

मागील भागात [1] किंमत कोठून येते आणि अर्थव्यवस्थेत समन्वय आणि संदेशवहन याचे काम किंमत प्रणालीद्वारे कसे केले जाते हे पाहिले. किंमत प्रणाली आपल्याकडून सतत बदलाची अपेक्षा ठेवत असते. सतत बदलत राहायची आपली तयारी नसते, माझी सुद्धा नाही. तर सततच्या बदलाच्या अपेक्षेमुळे जी नाराजी तयार होते त्याचे आजच्या काळात राजकीय मागण्यांमध्ये रूपांतर होते. राजकीय ताकदीचा वापर करून किंमत प्रणालीमध्ये अडथळे घातले जातात. किंमत प्रणालीमध्ये असे अडथळे आणले की काय काय होते हे आपण या भागात पाहणार आहोत. तसेच किंमत प्रणालीचा वापर करून सध्याच्या काही प्रश्नांना उत्तर सापडायची शक्यता आहे तेही पाहणार आहोत.

नर्मदे हर- (पुन्हा )उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 16/04/2026 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिपाकर मंडळी
नवीन कोरे मिपा चालु झाल्याबद्दल मालकांचे आणि सहकारी मंडळाचे अनेक आभार आणि शुभेच्छा!!

तर सालाबादप्रमाणे यंदाही उत्तरवाहीनी परीक्रमेला गेलो होतो. तेव्हाचे काही किस्से सांगायला हा लेख

(मागील लेखाचा दुवा)
https://www.misalpav.com/story/51273

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 15/04/2026 या दिवशी प्रकाशित केले.

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी
खळबळणारे मृगजळ घ्यावे
चकोरचंचू मधून मधुरसे
चंद्रामृत चाखत रिचवावे

छायाग्रह राहू केतूच्या
कुंडलीत पापग्रह व्हावे
मिथक कथांच्या दग्धभूमीचे
औटघटीचे राज्य मिळावे

निळ्याशारशा मान सरोवरी
राजहंस होऊन विहरावे
नीर-क्षीर विवेका विसरून
हंस-गान शेवटचे गावे

धूमकेतू C/2025 R3 (PANSTARRS) बघण्याचा अनुभव

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 14/04/2026 या दिवशी प्रकाशित केले.

सूर्यमालेच्या काठावरून म्हणजे उर्ट मेघ क्षेत्रातून (Oort cloud region) सूर्याला भेटायला येणारे पाहुणे म्हणजे धूमकेतूू! सध्या सूर्याला भेटायला आलेला हा पाहुणा म्हणजे धूमकेतू सी/ 2025 आर3 (पॅनस्टार्स) तब्बल एक लाख सत्तर हजार वर्षांनी भेटायला आला आहे. हा अवधी सांगता येणं ही, निरीक्षण, विज्ञान आणि गणिताची कमाल. सूर्यमालेत धूमकेतू येत असतातच. पण छोट्या टेलिस्कोप किंवा बायनॅक्युलरने बघता येतील असे धूमकेतूू दुर्मिळ असतात. त्यातला हा एक.

राजस्थान ट्रिप - तयारी, भाग १

लेखक जेडी यांनी मंगळवार, 14/04/2026 या दिवशी प्रकाशित केले.

राजस्थान पहायचे असे खूप वर्षांपासून मनात होते. एकदा ट्रेनची तिकीट काढून ती काही कारणाने रद्द करावी लागली होती. म्हणून यावेळी विमानाने प्रवास करायचा ठरला. डिसेंबरमध्ये जाण्यासाठी चांगली वेळ असते, असे गुगलने सांगितले होते, त्यामुळे डिसेंबर मध्ये जायचे ठरले. त्यासाठी अगदी चार महिने आधीपासून तयारी सुरू झाली.