Skip to main content

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/03/2015 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मी मात्र रात्रिची जेवणं झाल्यानंतर..झोपताना काहि क्षण पुन्हा त्या देवळातल्या प्रसंगाच्या शेवटाला गेलो. मला भेटलेला देव नक्की कोण???..............असुरेश्वर? की तो धनगर??? पुढे चालू... ================================ त्या कार्यक्रमा नंतर घरी आलो खरा.पण खरा कुठे??? खरा तिकडेच राहिलो होतो. मन थार्‍यावर रहात नव्हतं. सरळ जाऊन आईला विचारावं,तर तिचा गैरसमज होइल की काय? ही भिती.

अनरीयल इस्टेट

लेखक पॉइंट ब्लँक यांनी सोमवार, 09/03/2015 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : इकोनोमिक्स आणि फायनान्सशी क्षेत्रातील कोणतीहि पदवी लेखकाकडे नाहि. काहि चूक झालि असेल तर दुरुस्ती सुचवावी. मी एक आकडेमोड केली आहे. बेंगलोरच्या जागेची किंमत ठरवण्यासठी. आकडेमोड सोपी जावी म्हणून थोडे अ‍ॅप्रोक्झिमेशन केले आहे. क्षेत्रफळ = ७४१ स्केवर किमी = ७४१ *१०००*१००० स्केअर मी. = ७४१*१०००*१०००*१० स्केवर फूट. हा जुना नंबर असावा. बीडीए वाले १२९१ सांगतात. http://www.bdabangalore.org/townplanning.html. असो आपण जुनाच नंबर वापरू. जागेची सरासरी किंमत = ५००० रू/स्केवर फूट (ही यशवंतपूर मध्ये आहे.

कथा-कॉलेज कट्टा भाग ४

लेखक चेतन677 यांनी सोमवार, 09/03/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग...... कथा-कॉलेज कट्टा भाग १ कथा-कॉलेज कट्टा भाग 2 कथा-कॉलेज कट्टा भाग 3 वैष्णवी अभि शेजारी बसली.थोडा वेळ झाला मधेच नकळतपणे अभिचा हात वैष्णवीच्या हाताला लागला. " ओह सॉरी..." असं म्हणत अभि जरा बाजुला सरकला. त्यावर वैष्णवी गालातच हसली.कदाचित अभि हा खुपच लाजरा मुलगा आहे असे तिला वाटत होते. " हाय....वैष्णवी...काय गं ही काय वेळ आहे काय कॉलेजचा आज शेवटचा दिवस आणि तु आज चक्क कॉलेजला??

गोलमाल झेरॉक्स सेंटर आणि आपण

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 09/03/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
आज आलेला अत्यंत फसवा अनुभव. बाकीच्यांनीही सावध व्हावं म्हणुन लिहितोय. आज अचानक माझ्या एका कुप्रसिद्ध सरकारी बँकेत जायला लागलं. ८०'सी खाली गुंतवणुकीचा पुरावा म्हणुन एफ.डी. सर्टीफिकेट घ्यायचं होतं. आधी म्हणल्याप्रमाणे बँक कुप्रसिद्ध आणि सरकारी असल्याने एक जन्मकुंडली सोडुन सगळी डॉक्युमेंट्स साक्षांकित करुन दिलेलीचं होती. आणि बँकेच्या अत्यंत काळजीपुर्वक धोरणाला अनुसरुन पॅन कार्डची साक्षांकित प्रत हरवली गेली (पुढच्या वर्षीपासुन रिसिव्हड चा शिक्का मारुन घेणार). ऐन वेळेला हे लक्षात आल्यावर मला परत पॅन कार्डची छायाप्रत काढायसाठी बाहेर पळायला लागलं. आपल्याला हवा तेव्हा एक झेरॉक्सवाला सापडेल तर शपथ.

भूसंपादन विधेयक

लेखक निनाद जोशी यांनी सोमवार, 09/03/2015 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या भूसंपादन विधायकाबद्दल रोज काहीतरी सतत ऐकू येते. काही जण ह्याच्या विरोधात आहेत तर काही ह्याचे समर्थन करत आहेत. ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे पण प्रगतीसाठी हे विधेयक फार महत्वाचे आहे. जमिनी द्यायच्या नसल्या तरी द्याव्या लागतील परंतु ह्यामुळे नवीन प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक जमिनी मिळवणे सोपे होईल. फारच गोंधळ आहे. तुमचे काय मत भूसंपादन कायदा हवा का नको????? हवे असल्यास का हवे??? नको असल्यास का नको???

सोने : गुंतवणूक की सुरक्षा ? की यापैकी काहीच नाही ?

लेखक चिनार यांनी सोमवार, 09/03/2015 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी माझ्या गावातल्या घरी चोरी झाली. त्यात दुर्दैवाने माझ्या पत्नीचे आणि आई चे सोन्याचे दागिने चोरीला गेले. चोर सापडले पण सोनं सापडलं नाही ! असो ! माझं नुकतंच लग्न झालेलं आहे. पहिल्याच वर्षी सूनेच सोनं चोरी गेल्यामुळे माझ्या आई- वडीलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. ते घरी असताना चोरी झालेली असल्यामुळे त्यांना अधिकच अपराधी वाटत आहे. वस्तुस्थिती पाहता ,मी ,माझी पत्नी आणि माझे सासू-सासरे ह्या सगळ्यांनी त्यांना समजावून सांगितले की झाले गेले गंगेला मिळाले, त्याविषयी जास्त विचार करू नका. पण आता नुकसान भरपाई म्हणून ते यथाशक्ती सुनेसाठी काही सोनं घेण्याच्या विचारात आहे.

माहेरपण.....

लेखक चुकलामाकला यांनी सोमवार, 09/03/2015 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा दु:खच परतून येते मायेने ते कवेत घ्यावे, मालिश करुनी तळपायाला हलके त्याला शांत करावे. येणारच ते पुन्हा पुन्हा घरी हक्कच त्याचा आपुलकीचा सासुरवाशीण लेकीसाठी माहेराने सज्ज रहावे. कितीही आले ओठावर तरी प्रश्न विचारू नये तयाला, नशीब असते एकेकाचे अपुले आपण मानून घ्यावे. जाईल निघुनी उद्या सकाळी नवीन क्षितिजे क्रांत कराया , करू नये पण उगीच त्रागा तळहातावर दही वाढावे. (लिहिल्यावर जाणवले कवी अनिल यांच्या उशिरा आलेला पाऊस या कवितेशी साम्य आहे.)

ओय! – क्षणभंगुरतेची दोन रुपे

लेखक अन्या दातार यांनी सोमवार, 09/03/2015 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी पाहिलेल्या मोजक्या तेलुगु चित्रपटांपैकी हा एक चित्रपट – ओय! वरवर पाहता एक तरल प्रेमकथा. टॉलिवूडी हाणामारी, भडक विनोदाचे केविलवाणे प्रयत्न तुलनेने कमी. ही ठळक वैशिष्ट्ये चित्रपटाला इतर टिपिकल सौदिंडियन चित्रपटांपासून वेगळे बनवतात. poster कथेचा नायक उदय (सिद्धार्थ) हा अतिश्रीमंत घरातला, तर नायिका संध्या (शमिली) आई-वडिल गमावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील. दोघांच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक. ती अतिशय टापटिपीची, तर हा पसारा करणारा.