Skip to main content

राख

लेखक Vimodak यांनी शनिवार, 25/04/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ पावलांची आस, दारास नित्य आणि, आरास अश्रुनयनी, वदते जुनी कहानी. तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी, अन रिक्त करता करता, तुझ साठवू किती मी ? दिमतिस काळ माझ्या, स्मरणे तुला अखंड, जाळून दिनरात, उरणे तुझे अनंत श्वासात घोळलेला, शरिरात रुजवलेला... सुगंध तुझ फिरस्ता, हृदयात सजवलेला. तुझ्यात मी जरी ना, माझ्यात तू अजुनी... राखेत मी जिवंत, गेले जरी विझूनी..

आपण गूगल input सुविधा किंवा इतर IME सुविधा मराठी टायपींगसाठी वापरता ?

लेखक माहितगार यांनी शनिवार, 25/04/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपणास विकिपीडियावर लिहिण्याचा अनुभव असून आणि नसून दोन्हीही लोक्सचा: wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या दुवा पानावर मराठी टायपींग टेस्टस (डायरेक्ट टायपींग टेस्ट, कटकॉपीपेस्ट नव्हे) करण्यात यथाशीघ्र सहभाग हवा आहे.''' * What_to_test (काय काय टेस्ट करावे) हे पान अधिक माहितीसाठी अभ्यासता येईल.

भोगानंदिश्वरा

लेखक पॉइंट ब्लँक यांनी शनिवार, 25/04/2015 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
नंदिहिल्स बेंगलोरपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहे. नंदिहिल्स हि बेंगलोरवासियांसाठी सुटीच्या दिवशी भेट द्यायची आवडीची जागा. सुटीच्या दिवशी जवळपास जत्रा भरेल इतकी गर्दी असते आणि टेकडीवरचे योगानंदिश्वरा मंदिर सर्वांच्या परिचयाचे आहे. पण नंदिहिल्सच्या पायथ्याशी असलेलं भोगानंदिश्वरा हे बारशे वर्श जुनं मंदिर मात्र दुर्लक्षित राहिलं आहे. हे मंदिर नंदिहिल्सपासून फक्त पाच किमी अंतरावर नंदिग्राम ह्या खेड्यात आहे. नवव्या शतकात बाणा राज्यघराण्याची राणी रत्नावली हिने ह्या मंदिराची स्थापना केली. ह्या मंदिराचा पुढे, गंगा, चोला, होयसाळा, पल्लवा आणि विजयनगर ह्यांचा कारकिर्दित विस्तार झाला.

समुद्र

लेखक Vimodak यांनी शनिवार, 25/04/2015 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
तासंतास समुद्र प्यायलो मी, दिवसभराचा सारा मुद्राभिनय, तपशिलासकट, थोडा-थोडा करून... बराच समुद्र प्यायलो मी. समुद्र.... स्वत:हुन जवळीक साधत, पायांशी घोळणारा... अथवा, सगळी गरळ मागे टाकुन, कोरडा निघून जाणारा. सारे ढग हाकून थकल्यावर, सूर्य गिळायला मोकळा झालेला.. लाल समुद्र. एक दिवसाचा समुद्र फाडून ओतला डोळ्यांमध्ये, मावळत्या तप्त सुर्यासकट. खारट समुद्र, वाहत राहिला बंद डोळ्यांमधून, बराच वेळ... सूर्य मात्र, विनासायास ह्रदयापर्यंत ग

न्युरेम्बर्ग erlangan

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 24/04/2015 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक ३-१५ मे मध्ये न्युरेम्बर्ग erlangan मध्ये असू ...आपल्या पैकी है का कुणी ? व्य नि करावा

पॅरिस आणि अ‍ॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ?

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 24/04/2015 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कालच मी पॅरिसला पहुचलो आहे आणि इथे ३ जून पर्यंत मुक्काम आहे. यावेळी अ‍ॅमस्टरडॅमला पण जायचा विचार आहे. तर मंडळी, पॅरिस आणि अ‍ॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ?

बाबानची फजिती....

लेखक सुदिप खेडगिकर यांनी शुक्रवार, 24/04/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः- जेवणचे टेबल, वेळः- सन्ध्याकाळ किन्वा रात्र..... बाबा म्ह्णतात, चिरन्जीव....कोणती बीअर घेता ???? मुलगा पार हवेत... क क कोणती बीअर... बाबा तुम्ही काय म्हण्ताय ते मला नाहि कळत...(मुल्गा बापाचि नजर चुकविण्याचा फुकट प्रयत्न कर्तो) बाबा खूप गम्भीर चेहरा... बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे... खाणार कानाखाली सान्गणार सगळ.. इतक्यात आई येते... काय हो... काय सान्गणार आहे सोन्या आपला..??? (सोन्या......?????)--बाबा... तुझा सोन्या आता जरा जास्तच शहाणा झालाय.. बीअर घेतात चिरन्जीव आप्ले... आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात...तरीही... नाही हो..

पुराणातील दशावतार आणि डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत; एक साम्य -

लेखक ग्रेटगणेश यांनी शुक्रवार, 24/04/2015 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुराणातील दशावतार आणि डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत; एक साम्य -

लग्न पत्रिकेतील मुलासाठी 'चिरंजीव' व मुलींसाठी 'चि.सौ.कां.' असा भेदभाव का?

लेखक ग्रेटगणेश यांनी शुक्रवार, 24/04/2015 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न पत्रिकेतील मुलासाठी 'चिरंजीव' व मुलींसाठी 'चि.सौ.कां.' असा भेदभाव का? सध्या लग्नांचा सिझन चालू आहे..पत्रिका छापताना मुलासाठी केवळ 'चिरंजीव' आणि मुलीसाठी चिरंजीव 'सौभाग्यकांक्षिणी' असा भेद का? चिरंजिवित्व तर प्रत्येकालाच हवं असतं हे एक वेळ मान्य केलं तर मुलीसाठी "सौभाग्यकांक्षिणी" असा वेगऴा उल्लेख का? मला कोणतीही पत्रिका वाचताना असा प्रश्न पडतो की सौभाग्याची आकांक्षा करताना ती मुलगी लग्नाआधी दुर्भागिनी असते आणि लग्नानंतर नशीबवान होते, असा काही आपल्या परंपरेला व्यक्त करायचेय का? तुम्हालाही असा प्रश्न कधीतरी पडला असेल.

'लिव्ह लायसन्स'

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 24/04/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी बाईक पार्क करत होतो.अविदादा अचानक गेला त्याची बाईक अजूनही पार्क केलेली आहे.पार्किंग वाला म्हणाला,' देखो आजकल गाडी पार्क करके जानेवाला शाम को वापस आयेगा उसका भरोसा नही रहा ...पार्किंग के लिये रोज वही जगह नही मिली तो लोग खामखा झगडा करके जाते है ' अस काही घडलं की अंतर्मुख होऊन विचार करण्याशिवाय पर्याय रहात नाही.मानवी जगण्याच्या मर्यादा स्पष्ट होतात.आपण कितीही म्हटलं तरी आपल्या आवाक्यात आपल जगण नसतंच..आपल्या विचारांच्या पलीकडे असलेली ही शक्ती आपल्या जगण्यावर अंमल करत असते.तोच देव असेल का?? अज्ञात अशा या शक्तीचा वावर आपल्या सभोवती असेल का ?