Skip to main content

बाबानची फजिती....

बाबानची फजिती....

Published on 24/04/2015 - 17:09 प्रकाशित मुखपृष्ठ
स्थळः- जेवणचे टेबल, वेळः- सन्ध्याकाळ किन्वा रात्र..... बाबा म्ह्णतात, चिरन्जीव....कोणती बीअर घेता ???? मुलगा पार हवेत... क क कोणती बीअर... बाबा तुम्ही काय म्हण्ताय ते मला नाहि कळत...(मुल्गा बापाचि नजर चुकविण्याचा फुकट प्रयत्न कर्तो) बाबा खूप गम्भीर चेहरा... बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे... खाणार कानाखाली सान्गणार सगळ.. इतक्यात आई येते... काय हो... काय सान्गणार आहे सोन्या आपला..??? (सोन्या......?????)--बाबा... तुझा सोन्या आता जरा जास्तच शहाणा झालाय.. बीअर घेतात चिरन्जीव आप्ले... आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात...तरीही... नाही हो.. तुम्हाला काहीतरी चुकिच वाटत आहे...तो तस काहीही नाही कर्णार... १००% तो बीअर घेतो...-- बाबा कशावरुन..???-- आई आता हेच पहा ना... सोन्या जरा पाणी दे रे माझ्या ग्लासात... (सोन्या पाणी देतो.. पण बीअरच्या ग्लासात बीअर भरतात तसे) पाहिलास.. अशी फक्त बीअरच भरली जाते.... पाणी नाही... आई... आधी सोन्याकडे अन मग बाबा कडे पहाते... काय हो...???? तुम्हाला कस माहिती की अशी बीअरच भरली जाते ते??? बाबा कोमात.... सोन्या जोमात....
लेखनप्रकार

याद्या 9007
प्रतिक्रिया 51

In reply to by आदूबाळ

तुझी प्रतिक्रिया पाहून मस्तकात तिडीक गेली ...उष्ण श्वास आणि लसणाचा भपकारा आला ... आता मी चिकन हातात घेऊन तिरकी चालत कर्कश्श गाणे म्हणत जाणार ...आणि गच्चीवर जाऊन गुडघे दुमडून लिंबू चोखत बसणार ... डोळ्यात तीच मग्रुरी ... भालकी कारवार संग्रामाच्या आठवणी काढत ..तीच थर थर सहन करत ... ......तुझीच XX XXX

In reply to by अत्रन्गि पाउस

छान छान प्रतिसाद. खूप पूर्वी मी एक गोष्ट वाचली होती.. सिंहगडावर आंबटगोड. पाय पसरून वाचण्यालायक गोष्ट होती. त्यात "अहोsssssss... आम्ही मार्कंडे.. मार्कंडे आम्ही.." अश्या स्वरुपाची किंकाळी दर थोड्या वेळाने येत असे. तिथे गायीच्या पाठीवर थाप मारून पुढे गेल्यास हिरव्या बादलीत चुना मिळतो म्हणतात. अजून थोडे पुढे जाऊन जर तुम्ही "वक्फ बोर्डाला सलाम" हे वाक्य ४-५ वेळा म्हंटले, तर गुलाबी बादलीत विड्याची पाने देखील मिळतात. हि सगळी दैवाची कृपा आहे. मानेवर महाभृंगराज तेल लावून जावे. मोगर्याची फुले ४ पुड्या घेऊन जावी आणि त्यातली निम्मी फुले झेलत जावी. साबुदाणा खिचडीचा प्रसाद बनवावा आणि तो अल्युमिनियम डब्ब्याच्या झाकणात न्यावा. तीर्थ म्हणून मध आणि मठ्ठा ह्यांचे मिश्रण पेल्यात न्यावे. अंगारा चिमटीत घ्यावा आणि म्हणावे "थांबा हो हो हो हो हो". - माताजी

बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे...
हे आउल काय... बाबान काय..
आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात
हे आथ्या काय असतं? लिहुन झाल्यानंतर पूर्वपरीक्षण का करत नाही..

In reply to by मोहनराव

त्याच अस आहे मोहनराव... मराठी शुद्धलेखनाप्रमाणे तुमच्या "राव" या जोडनावावर "अनुस्वार" असावा लागतो. (संपादित)

In reply to by सुदिप खेडगिकर

मराठी शुद्धलेखनाप्रमाणे तुमच्या "राव" या जोडनावावर "अनुस्वार" असावा लागतो.
म्हणजे "मोहनरावं"?? असं? कोणत्या नियमाप्रमाणे?

In reply to by आदूबाळ

"मोहनरांव" हे बरोबर आहे...तसेच नाव हा पण शब्द आपण चुकीचा लिहीतो... या मध्ये पण "ना" वर अनुस्वार आहे. नाहीतर "नाव" म्हणजे पाण्यावर चालणारी नाव असा अर्थ होतो.

In reply to by सुदिप खेडगिकर

पण कुठल्या नियमाप्रमाणे? जुने नियम बदलले ना? अनुच्चारित अनुस्वार गाळायचा असा सर्वसाधारण नियम आहे ना?

In reply to by आदूबाळ

असा नियम आहे हे मला नव्ह्ते माहिती... पण धन्यवाद आदुबाळ मला नवीन नियम कळाला आज... मी पुढच्या लिखाणात ते लक्षात ठेवीन.

सुदीपराव, गोष्ट किंवा विनोद चांगला आहे. मराठीत संगणकावर लिहिण्याचा तुमचा हा पहिला प्रयास असेल तर, लेख लिहून झाल्यावर एकदा तपासून बघा. अनुस्वार, जोडाक्षरे लिहिण्यात काही मदत हवी असल्यास, संपादकांना किंवा इतर मिपाकरांना विचारा. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

आमचा एक खेड्यातला मित्र त्याच्य गावी तमशा बघायला गेला होता. तो शो संपल्यावर बाहेर येत असताना तिकिटासाठी रांगेत उभ्या असलेल्या त्याच्या बाबांनी त्याला पाहिले. आमचा मित्र फार घाबरला होता. दुसर्या दिवशी त्याचे बाबा त्याला शेतावर घेवून गेले आणि घरात तोंड न उघडण्याचा शहाणपना दाखवल्या बद्दल त्याच्या मासिक चहापान्याच्या खर्चात वाढ करण्यात आल्याचे सांगितले.

ह्या मिपाकरांना एक भारी संसर्गजन्य रोग झालाय... नव्या खेळाडूचे हटकून शतक करायचा. सौजन्यसप्ताह सुरूये जणू... वा वा वा :-) (स्माय्ल्या हायेत का स्मायल्या? वाईच पाय्लीभर पाय्जेत.)

सोन्या जरा पाणी दे रे माझ्या ग्लासात... (सोन्या पाणी देतो.. पण बीअरच्या ग्लासात बीअर भरतात तसे) पाहिलास.. अशी फक्त बीअरच भरली जाते.... पाणी नाही...
लेखकाची निरिक्षणशक्ती अफाट आहे. रच्याकने, सोन्या कुठली बीयर पितो? मी काही अंदाज बांधले आहेतः १. त्याने नुकतीच प्यायला सुरुवात केली असेल तर - किंगफिशर २. त्याने प्यायला सुरुवात करुन थोडा कालावधी गेला असेल तर - टुबॉर्ग, कॅनॉन टेन थावजंड, हॅवॉर्ड्स फाय थावजंड ३. तो अमेरिकेला जाऊन आला असेल तर - बडवायजर ४. तो युरोपियन देशात जाऊन आला असेल तर - कार्ल्सबर्ग एलेफंट ५. तो आयटी कंपनीत सात आकडी पगार घेत असेल तर - करोना ६. त्याला कंपनीच्या पार्टीमध्ये बीयर मिळत असेल तर - स्थानिक ब्रुवरीतील फ्रुट बीयर

गोष्ट आणि प्रतिसाद दोन्ही आवडले. बाबांना भूमी कंप जाणवला असेल. तसेही दोन दिवसांपासून भूमी कंप होतो आहे, मेट्रो ही मध्ये मध्ये थांबत आहे. भारी भूमी कंप झाला तर दिल्लीत काय होणार. वाढत्या जनसंख्येचा प्रश्न बराचसा सुटेल असे विधान लोक करतात आहे.

चबाबानची चजितीफ चलीझा.. चष्कळपु चंमतग चलीआ...!!!! ( स्वहस्ते ओतून घ्यावी लागते बियर.. काय कस्टमर सर्व्हिस आहे..!! छ्या.. )

सोन्याचं वय काय? (खरंतर लेखकाचं वय काय विचारायचं होतं पण उगाच नवलेखकांच्या काहितरी दुखावायचं.. म्हणून जाउदे!)

In reply to by मराठे

त्यावरून वयाचा अंदाज येतो की. फक्त बाबाननी कोमात जायला नको होते. सुधरतील हळू हळू. :-)

पहील्याच प्रयत्नात अर्धशतक गाठल्याबद्द्ल आई, बाबान आणि त्या दोघानचा सोन्या यानचा "आखिल मिपा तिर्थप्राशन समीती" तर्फे एक थंड बीयरची बाटली द्येवन सत्कार करणेत येत हाये. -"आखिल मिपा तिर्थप्राशन समीती" व "मीपा सत्कार समीती" अध्यक्ष - तेच नेहमीचे (सद्या स्वखरडीसाठी जिंकू किंवा मरु आंदोलन करणारे)