पुराणातील दशावतार आणि डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत; एक साम्य -
थोर शास्त्रज्ञ डार्विनने या पृथ्वीतलावरचा पहिला ‘जीव’ पाण्यात निर्माण झाला असा सिद्धांत साधारणत: १५० वर्षांपूर्वी मांडला.. ‘सर्व्हायवल आॅफ द फिटेस्ट’ या डार्विनच्या तत्वावूसार त्या पाण्यातल्या पहिल्या सजीवापासून लाखो वर्षांपासून अनेक जीवजाती उत्क्रांत होत होत आजचा प्रगत मानव बनला व यापुढेही ही उत्क्रांती सुरूच राहाणार आहे..अर्थात एखादा छोटा बदल घडायलाही हजारो वर्षं लागतात..
डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे परंतू आपल्या पुराणातून हजारो वर्षांपुर्वी सांगितलेली आणि हिंदू जनमानसाचा अतिव विश्वास असणारी दशावताराची कहाणी डार्विनच्या तत्वाशी आश्चर्यकारकरीत्या मिळती-जुळती आहे.
पुराणातील भगवान विष्णूचे ‘दहा अवतार’ डार्विनचाच सिद्धांत मांडतात मात्र चमत्कार आणि कथेचा आधार घेऊन, तेही हजारो वर्षांपूर्वी..! गोव्याचे विद्यमान आमदार व कोंकणी-मराठीतील एक नामवंत कवी-गीतकार माझे मित्र श्री. विष्णू सुर्या वाघ यांचे या विषयावरील व्याख्यान मी काही वर्षांपूर्वी ऐकले होते, ते आता विस्तारीत स्वरुपात माझ्या शब्दांत आपल्यासमोर ठेवत आहे.
पुराणकर्त्यांची कल्पनाशक्ती आणि आधुनिक विज्ञानाची पुराव्यासहीत मांडण्याची सिद्धशक्ती यातील श्रेष्ठ कोण, या वादात न पडता आपणं दोघांमधल्या साम्याचा आस्वाद घेऊ..
‘आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..’ ही दशावताराची आरती आपणांपैकी बहुतेकांना येत असेल. या आरतीमध्ये भगवान विष्णूचे ‘मत्स्य’ ते ‘कल्की’ अशा दहाही अवतारांचे कथारुपी वर्णन केले आहे..
भगवान विष्णूचा प्रथम ‘मत्स्य’ अवतार प्रथम मानला गेला आहे..’मत्स्यरुपी नारायण, सप्तही सागर धुडीसी..’ असं पहिल्या अवताराचं आरतीत वर्णन केलं आहे. पृथ्वीवरचा प्रथम सजीव पाण्यात निर्माण झाला हेच डार्विनही सांगतो..म्हणजे आपल्या पुराणांतून हजारो वर्षांपुर्वी सांगीतलेल्या कथा आणि दिड-दोनशे वर्षांपूर्वी आधुनिक विज्ञानाद्वारे सिद्ध झालेल्या बाबी या दोघांनध्ये आश्चर्यकारक समानता आहे..!
दशावतारातील दुसरा अवतार ‘कूर्म’ अवतार आहे..कूर्म म्हणजे ‘कासव’..डार्विन सांगतो जीव की एका अवस्थेतून पुढील प्रगत अवस्थेकडे उत्क्रांत होत असताना त्याच्यात परिस्थिती अनुरूप बदल घडत जातात.. कासवाचा विचार केला कि आपल्याला सहज लक्षात येईल की कासव हा प्राणी पाण्यात व जमीन अशा दोनीही जागी राहू शकतो..
मासा, कासव किंवा दशावतारात वर्णन केलेले दहाही अवतार ही केवळ प्रतिकं आहेत हे कृपया लक्षात घ्यावे…माशापासून कासव उत्क्रांत झाला याचा अर्थ एवढाच की पाण्यात राहणारे जीव अस्तित्वात असतानाच त्यांच्यापासून कासव व त्याच्यासारखे पाणी आणि जमीन अशा दोनही ठिकाणी सहज वावरू शकणारे अनेक उभयचर जीव उत्क्रांत झाले..
परमेश्वराचा पुढील अवतार ‘वराह’..म्हणजे डुक्कर! डुक्कर हा प्राणी जंगलात वावरणारा असतो..त्याकाळी निश्चितच पृथ्वीवर घनदाट जंगल होतं..जमीन दलदलीची..’दाढे धरूनी पृथ्वी नेता, वराह रुप घेसी..’ असे आरतीत म्हटले आहे आणि याचा अर्थ असा काढता येईल की त्याकाळी अस्तित्वात असलेल्या जमिनीवरील हिमयुगातील बर्फ वितळायला हळुहळु जमिन तयार व्हायला लागली होती..सहाजीकच जमिन दलदलीची होती..आता असे प्राणी अस्तित्वात यायला सुरुवात झाली ज्यांना पाणी मिश्रीत दलदलीची जमीन त्प्रिय होती ( डुकरांना चिखल आजही प्रिय आहे). अश्याप्रकारचे अनेक जीव तयार झाले..
पाण्यात राहाणारे, पाणी आणि जमिन अशा दोन्ही ठिकाणी वावरू शकणारे, आणि डुकरासारखे जंगली प्राणी निर्माण होऊन आता हजारो, लाखो वर्ष उलटली होती..सजीव पुढील पायरीकडे उत्क्रांत होत होता..
आणि पुढचा सजीव ‘नृसिंह’ अवतारात उत्क्रांत झाला..उत्क्रांतीने आणखी एक पाऊल पुढे टाकले…आता असे प्राणी निर्माण व्हायला सुरुवात झाली की ते प्राणी नव्हेत परंतु धड माणूसही नाहीत..नृसिंहाने ‘उंबरठ्यावर’ हिरण्यकशपुला ठार मारले ही कथा या दृष्टीने खूप महत्वाची आहे..चतुष्पाद जंगली प्रण्यांपासून द्विपाद प्राणी उत्क्रांत व्हायच्या ‘उंबरठ्यावर’ आता उत्क्रांती उभी होती याचे सांकेतीक दर्शन ही कथा देते..नृसिंह, हिरण्यकशपू ही नांवेदेखील खुप काही सुचवतात..हिरण्यकशपूमधील ‘हिरण्य’ या शब्दाचा अर्थ सोनं किंवा संपत्ती असा असला तरी ‘हिरण्य’ शब्द ‘अरण्य’च्या खुप जवळचा आहे आणि उर्वरीत ‘कशपू’ या शब्दातील शेवटचे दोन शब्द ‘पशू’ कडे निर्देश करणारे आहेत..हिरण्यकशपूचा नृसिंहाने उंबरठ्यावर केलेला वध हा संकेत आहे की अरण्यातील पशुंकडून उत्क्रांतीची वाटचाल मनुष्यरुपाकडे सुरु होत आहे..!!
पुन्हा हजारो वर्ष गेली आणि पुढे अवतरला ‘वामन’ अवतार..ज्याला मनुष्य म्हणता येईल असा हा प्राणी! वामन याचा शब्दशः अर्थ ‘बुटका’. मानववंश शास्त्र हेच सांगते की पृथ्वी वरचा प्रथम मनुष्य उंचीने बुटका म्हणजे जेमतेम ४-४.५ फुट उंची असलेला होता..’Homo Erectus’ हे त्याच शास्त्रीय नाव..या शब्दाचा अर्थ चार पायावर चालणारा प्राणी आता हळूहळू दोन पायावर उभे राहायला शिकला होता.. Homo म्हणजे माणूस आणि Erectus म्हणजे उभा असलेला असा त्याचा साधारण अर्थ..जंगलात राहाणारा,मेंदू आकाराने लहान असल्याने, शिकार करुन खाणं, गुहेत राहाणं असे सर्व व्यवहार आणि बुद्धीमत्ताही प्राण्याप्रमाणेच असणारा असणारा केवळ नांवाला ‘मनुष्य’ असा प्राणी आता जंगलात वावरू लागला होता..उत्क्रांतीचं कार्य गुमानपणे चालुच होतं.. प्राण्यांसारखे असलेले व्यवहारांनी संथ गतीने मनुष्याची अंधूक छटा दाखवायला सुरुवात केली..अशातच अनेक वर्षांचा कालावधी पार पडला..’भिक्षेस्थळे मागुनी बळीला पातला नेसी….वामनरूप धरोनी बळीच्या द्वारी तिष्ठसी..’..’ वामनाने बळीला पाताळात नेलं या आरतीतल्या शब्दांचा अर्थ, वामनाने बळीला जमिनीच्या खाली जाण्याचा म्हणजे जमिन नांगरण्याचा निर्देश केला, असाही घेता येतो..बळी म्हणजे शेतकरी आणि यातुनच पुढे शेतीचा शोध लागला आणि उत्क्राती पुढे सरकली..
आता ज्याला ख-या अर्थाने मनुष्य म्हणता येईल असा ‘परशुराम’ प्रगटला..! परशुरामाला अन्थ्रोपोलॉजीतील Neanderthal आणि Homo Sepian हि शास्त्रीय नावे लागू पडतील..परशुरामावर जंगल साफ करुन मनुष्यवस्ती व शेतीयोग्य जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आली. परशुरामाने शरीरावर धारण केलेली आयुधं याची साक्ष देतात..परशुरामाचा परशु जंगल तोडण्यासाठी आणि त्याचे धनुष्य जंगली श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी धारण केले असे म्हणता येईल..परशुरामाने कोकण वसवलं याची सांगड आपल्याला इथे घालता येते..परशुराम उघडा दाखवतात, याचा अर्थ अद्याप वस्त्राचा शोध लागायचा होता असा होऊ शकतो…मनुष्य वस्ती स्थिरस्थावर झाली..माणुस ‘कल्चर्ड’ व्हयला सुरुवात झाली..आता गरज भासू लागली ती शेती, संपत्तीचे संरक्षण करण्याची..राज्यपद्धती हळुहळु आकार घेऊ लागली..
उत्क्रांतीने आणखी पुढे झेप घेतली..आणि ‘रामराज्याची’ संकल्पना साकारणारा ‘पूर्ण’ पुरुष ‘राम’ अवतारला..Homo Sepian Sepian हे शास्त्रीय नाव धारण करणारी मनुष्य जमात निर्माण झाली..या शास्त्रीय नावाचा अर्थ ‘ज्याला जाणीव असल्याची जाणीव आहे असा मनुष्य’..परशुरामासारखी जंगलापासून जमिन तयार करण्यासाठी रामाला आता परशुची गरज नव्हती..त्याने परशुचा त्याग केला आणि शत्रुनिःपातासाठी धनुष्य धारण केलं. सत्यवचनी रामासारखी प्रजा पृथ्वीतलावर सुखाने नांदू लागली..सत्ययुगाचा जन्म झाला..अशा अनेक वर्षांच्या कालावधीनंतर ‘सत्या’चे अपचन झाले आणि कोणत्याही परिस्थीतीत ‘सत्या’ला धरून राहावे या ‘रामनिती’ कडून मनुष्य परिस्थीतीनुरूप वागावे या ‘कृ़ष्णनिती’च्या दिशेने माणूस उत्क्रांत झाला..
यापुढच्या काळात उत्क्रांतीची शारिरीक दृष्य चिन्हे कमी होत गेली मात्र माणसाची बौधिक उत्क्रांती सुरूच राहिली..
रामावताराच्या नंतर व ‘कृष्ण’ अवताराच्या अगोदरच्या काळात मनुष्य पुन्हा प्राणी होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता..युद्ध, असत्य, कुट-कपट याची चलती होती. मनुष्याला ख-या-खोट्याची जाणिव करून देण्याची गरज निर्माण झाली होती आणि ती करून देण्यासाठी ‘कृष्ण’ अवतरला..’देवकी वसुदेव बंदी मोचन त्वा केले..’ या आरतीतल्या ओळींचा अर्थ, अनागोंदी, अत्याचार या मुळे समस्त स्त्री-पुरुषांचं आयुष्य बंदीखान्यासारखं झाला होता..पृथ्वीवरचं आयुष्य ‘अंधकार’मय झालं होत..आणि अशा ‘अंधारात’ मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला असा याचा अर्थ हा असू शकतो..सत्याचा आग्रह न धरता परिस्थितीनुरूप वागावे हे कृष्णाने दाखवून दिले…कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले या गोष्टीला खूप अर्थ आहे..सारथी म्हणजे चालक..वाहन चालवून इच्छित स्थळी नेणारा..कृष्णाने अंधकारात गाडल्या गेलेल्या मानव जातीला उजेडाचा रस्ता दाखवला असा याचा अर्थ काढता येईल..त्याचबरोबर असत्याचा नाश करायला प्रसंगी असत्याचे शास्त्र वापरायला हरकत नाही असेही कृष्ण सुचवतो.. जयद्रथाच्या वधाचा प्रसंग आपल्याला खूप काही सांगून जातो..
कृष्ण प्ृथ्वीतलावरच्या ‘लोकशाही’चा प्रणेता आहे. कृष्णाने आपल्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला व बाकीच्यानी आपल्या काठ्या आधारासाठी लावाव्यात असे सर्वांना आवाहन केलं ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहित आहे. ही घटना आपण एक चमत्कार म्हणून बघतो व सोडून देतो. परंतू ही कथा खुप मोठा आणि महत्वाचा संदेश देते. गोवर्धन पर्वत हे भुमीचं प्रतिक, तो उचलण्यासाठी कृष्णाची करमगळी व बाकीच्यानी लावलेल्या काठ्या असे सांगतात की या भुमीवर सर्व जनतेचा हक्क आहे, केवळ राजाचा नाही. सोकशाहीच् हे तत्व आहे, ते सर्वप्रथम कृष्णाने कृतीने दाखवलं.
या पुढची उत्क्रांती अर्थात अवतार होता बुद्धाचा..राम, कृष्ण यांच्या अवतारा नंतर माणसाची वृत्ती विरक्तीकडे झुकू लागली हा ‘बुद्ध’ या प्रतीकाचा अर्थ..मस्तकी मुकुट नको आणि हाती शस्त्रही नको..जगाला शांतीचा, त्यागाचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा प्रसार सुरुवातीला खूप जोमाने झाला..पुढचे आपल्या सर्वाना माहिती असेलच…सध्या आपण जगतोय ते ‘कल्की’च्या दहाव्या अवताराच्या काळात…कल्कीचा अर्थ ‘कली ’..कलियुग म्हणतात ते हेच..माणसा-माणसातला विश्वास लयाला गेला आहे..आपापसात युद्ध, लढाया सुरु आहेत..मनुष्य संपत्तीच्या मागे धावत सुटला आहे..आणि पुन्हा एकदा मनुष्य पुढील उत्क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे, पुढील अवताराची वात पाहत आहे..उत्क्रांतीचे चक्र सुरूच आहे आणि सुरूच राहणार आहे..
वरील लेख हा एक कल्पनाविलास आहे..तरीही चार्ल्स डार्विनने मांडलेली उत्क्रांतीची थिअरी आणि आपला दशावतार यांतील साम्य ही कल्पना मनात भरून राहिली आणि ती कागदावर मांडल्याशिवाय मला राहवले नाही..ही कल्पना नसून कदाचित सत्यही असू शकेल कोणजाणे..!! तो विषय यातील अधिकारी व्यक्तींचा..तो पर्यंत आपण केवळ याचा आनंद घेऊ..!!
-गणेश साळुंखे
9321811091
वाचने
14316
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
चार्ल्स डार्विनने मांडलेली
जरा दम घ्या मालक
आणि पुन्हा एकदा मनुष्य पुढील
कल्की. क्रोचेलिन.
In reply to आणि पुन्हा एकदा मनुष्य पुढील by हाडक्या
पुराणांतील वर्णनांवरुन कल्की
In reply to कल्की. क्रोचेलिन. by आदूबाळ
त्यो
In reply to पुराणांतील वर्णनांवरुन कल्की by सतिश गावडे
वरील लेख हा एक कल्पनाविलास
विचारपूर्वक विवेचन !
इस्पिकचा ऎक्का साहेबाचे मत वाचायला आवडेल
अतिशय ग्रेट धागा.
छान लेख
पण तो कल्पनाविलास आहे असं
In reply to छान लेख by सौन्दर्य
त्याचबरोबर, डार्विनिझम हे ही
In reply to पण तो कल्पनाविलास आहे असं by सतिश गावडे
ते नाकारत नाहीच. :)
In reply to त्याचबरोबर, डार्विनिझम हे ही by पॉइंट ब्लँक
तुम्ही असं म्हणणार हेही आधीच
In reply to ते नाकारत नाहीच. :) by सतिश गावडे
कुठे? भृगूसंहितेत का?
In reply to तुम्ही असं म्हणणार हेही आधीच by आदूबाळ
@ तुम्ही असं म्हणणार हेही
In reply to तुम्ही असं म्हणणार हेही आधीच by आदूबाळ
"देशबांधवांची अंमळ मौज वाटते"
In reply to ते नाकारत नाहीच. :) by सतिश गावडे
हो. आपल्याकडे एखादी गोष्ट
In reply to "देशबांधवांची अंमळ मौज वाटते" by रामपुरी
"ते असणे हे नसण्यासारखेच आहे"
In reply to हो. आपल्याकडे एखादी गोष्ट by सतिश गावडे
बरं..
In reply to "ते असणे हे नसण्यासारखेच आहे" by रामपुरी
भगवान विष्णूचा प्रथम ‘मत्स्य’
फारच छिद्रान्वेशी बुवा तुम्ही
In reply to भगवान विष्णूचा प्रथम ‘मत्स्य’ by मार्मिक गोडसे
डायनासॉर?
डाय झाले ना ते सॉरे, भाऊ ?
In reply to डायनासॉर? by अवतार
बहुधा रावणाचे पुष्पक विमान
In reply to डाय झाले ना ते सॉरे, भाऊ ? by डॉ सुहास म्हात्रे
==)
In reply to बहुधा रावणाचे पुष्पक विमान by अवतार
आणि हे खरंही आहे. गौतम
In reply to ==) by सतिश गावडे
बर्याचशा मध्ययुगीन मंदिरांमधे
In reply to आणि हे खरंही आहे. गौतम by पॉइंट ब्लँक
धन्यवाद. भारी माहिती दिली
In reply to बर्याचशा मध्ययुगीन मंदिरांमधे by प्रचेतस
हे हे हे
In reply to ==) by सतिश गावडे
पुण्यातले का हो तुम्ही...नै
In reply to हे हे हे by अवतार
नाय हो !
In reply to पुण्यातले का हो तुम्ही...नै by टवाळ कार्टा
असं काही नसतं हो. अंधश्रद्धा
In reply to नाय हो ! by अवतार
त्याच्या पाठी धावण्याच्या
In reply to बहुधा रावणाचे पुष्पक विमान by अवतार
+१००
In reply to त्याच्या पाठी धावण्याच्या by अत्रुप्त आत्मा
हि नविनच माहिती आहे
यातला रायफलधारी होमो सेपियन
In reply to हि नविनच माहिती आहे by ज्ञानोबाचे पैजार
यालाच म्हणतात जीवनचक्र... एका
In reply to यातला रायफलधारी होमो सेपियन by सतिश गावडे
त्या थिअरीबद्दल वाचायला आवडेल
In reply to यालाच म्हणतात जीवनचक्र... एका by डॉ सुहास म्हात्रे
इथेच मिपावर त्याबाबत लिहिले
In reply to त्या थिअरीबद्दल वाचायला आवडेल by सतिश गावडे
वाचले.
In reply to इथेच मिपावर त्याबाबत लिहिले by डॉ सुहास म्हात्रे
पुर्वजांची थोरवी लाभे पुन्हा
In reply to वाचले. by सतिश गावडे
पुर्वजांची थोरवी लाभे पुन्हा बोलून काइथेच घोडं पेंड खातं ना ! ;)अम्म्ळ मनोरंजक आहे सगळं,
.डोळे पाणावले
विनोदी प्रतिसादांनंतर
बहूधा शेवटचा परिच्छेद तुमच्या
In reply to विनोदी प्रतिसादांनंतर by राही
कल्पना + विलास = ?
कल्पना + विलास = आनंद :)
In reply to कल्पना + विलास = ? by संदीप डांगे
या धाग्याची यथायोग्य पिसे
जेपी, अहो पन्नास झाले. एक एक
त्यापेक्षा रामाराव कंपनीचे
In reply to जेपी, अहो पन्नास झाले. एक एक by आदूबाळ
दशावताराच्या कथेत
कालच कल्याणला गटारात फिरणारी
कल्याण ला डुकरे?
In reply to कालच कल्याणला गटारात फिरणारी by सतीश कुडतरकर
सिद्धार्थ
In reply to कल्याण ला डुकरे? by सिद्धार्थ ४
.
In reply to कालच कल्याणला गटारात फिरणारी by सतीश कुडतरकर
ते कुडचेडकर ना??
In reply to . by hitesh
"आत्मोन्नतीचे सहा सोपान" वाले
In reply to ते कुडचेडकर ना?? by टवाळ कार्टा
पुस्तकाचे नाव "केतकी पिवळी
In reply to "आत्मोन्नतीचे सहा सोपान" वाले by मराठी_माणूस
"केतकी पिवळी पडली" चे लेखक स.
In reply to पुस्तकाचे नाव "केतकी पिवळी by टवाळ कार्टा
हितेश भाऊ
In reply to . by hitesh
हे स्क्रिप्ट कमल हासनला द्या.