Skip to main content

गणेश मंदीर

लेखक मॅक यांनी बुधवार, 03/06/2015 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
सांगली जिल्ह्यातील नृसिंहवाडीला जाताना वाडीच्या आगोदर एक-दिड किलोमीटरवर एक गणपतीचे मंदीर बांधण्यात आले आहे.

डोळे उघडणे - काही विचार

लेखक पथिक यांनी बुधवार, 03/06/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी एका जुन्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. गप्पा चालल्या होत्या. तिच्या जॉब बद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, 'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर ट्रेडिंग करते घरी बसुन. मागे मी 'रिच डॅड पुअर डॅड' वाचलं आणि माझे डोळे खाड्कन उघडले!' हा 'डोळे उघडणे' हा मोठा विलक्षण आणि दुर्मिळ प्रकार आहे! ज्याचे डोळे उघडतात त्याचे आयुष्य पार बदलून जाऊ शकते. बदल कसा आणि किती होणार ते डोळे कोणत्या बाबतीत आणि किती उघडले यावर अवलंबून असते. माझ्या या मैत्रिणीचे डोळे पैशाच्या बाबतीत उघडले आणि तिच्या करिअर मध्ये थोडा बदल झाला.

शेअरबाजार- बस्स 02 मिनिट्स...आपण काय करावे??

लेखक प्रसाद भागवत यांनी बुधवार, 03/06/2015 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या गाजत असलेल्या 'मॅगी' प्रकरणामुळे आज नेस्ले ईडिया कंपनीच्या शेअरने जवळजवळ 10% ची गटांगळी खाल्ली. हे प्रकरण मिडियात आल्यापासुन म्हणजेच गेल्या पंधराएक् दिवसांत हा शेअर सधारण 1000 रुपयांनी (म्हणजे जवळजवळ 14% घसरला) आपण, एका सामान्य गुंतवणुकदाराने या बाबत काय करावयास हवे असे आपणास वाटते??.. कर्मधर्मसंयोगाने मी याच विषयावर् अर्थपुर्णच्या येत्या मासिकात एक लेख लिहिला आहे. जरुर वाचावा. आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागत आहे. - प्रसाद भागवत

संगम

लेखक रातराणी यांनी बुधवार, 03/06/2015 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
डबा बाट्लीये… अशाच एका उन्हाळ्याच्या दुपारी भंगार वालीची हाक आली आणि काम आवरून नुकतच पडलेली आई निशुला म्हणाली, "निशू बेटा जरा सांग ग त्यांना थांबायला." लोळत पडलेली निशू जराशी कुरकुरतच उठली आणि तिने खिडकीतून त्या भंगारवालीला बोलावलं, "ओ आईने बोलावलंय तुम्हाला." "अग निशू मागच्या दारीच आण ग त्यांना, खूप साठवलेत म्हणाव त्यांना डबे , इकडेच आल्या तर त्यांना सोप पडेल वजन करून भरायला.उन तापलय चांगलच." तोपर्यंत त्या बाई घराजवळ आल्या होत्या, निशूने गेट उघडून त्यांना आत घेतलं आणि मागच्या दारी घेऊन आली. तोपर्यंत आईने साठवलेले पत्र्याचे डबे आणि बरच काय काय बाहेर काढल.

तपश्चर्येचे फळ ???

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 02/06/2015 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
मधु मिलनाची रात्र, केशर मिश्रित दुधाचा पेला घेऊन ती आत आली. तिला पाहताच 'शुभ मंगल सावधान, सावधान हे शब्द त्याच्या कानांत गुंजू लागले. समर्थ तर भोवल्यावरून पळाले होते. गौतम बुद्ध आपल्या बायको मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात पळाले होते. आता नाही पळालो तर संसार चक्रातून कधीच पळू शकणार नाही, माया-मोहाचे पाश तोडू शकणार नाही हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पत्नीला उद्देश्यून तो म्हणाला, आई वडिलांची इच्छा मोडायची नव्हती म्हणून मी लग्न केले. आता त्यांच्या वचनातून मुक्त झालो आहे. मला संसारात रस नाही. मला स्वर्गात जाऊन देवांचे दर्शन घ्यायचे आहे, त्या साठी घोर तपश्चर्या करावी लागते.

मित्रवेडा

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 02/06/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
कॅंटिनच्या चहाचा उग्र दर्प चहावाढपी चंदूच्या नवनव्या हेयरस्टाईल्स. थंड चहाने उघडलेली शिव्यांची लाखोली ॠषभच्या असायन्मेण्ट्स अन पसरलेल्या फाईल्स. डोळे बंद करायचे, सारं लख्ख पाहायचं अन तंद्री भंग होता होत नाही पुढ्यातल्या चहा अन कॉम्प्यूटरच्या फाईल्सना मित्रांच्या आठवणींचा कुठलाच रंग येत नाही.

(चा)वटपोर्णिमा

लेखक फुंटी यांनी मंगळवार, 02/06/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या वटपौर्णीमेनिमित्त whatsapp फेसबुकवर अनेक मेसेज येत होते.त्यातले एकदोन सरळ शब्दात शुभेच्छा देणारे मेसेज वगळता बरेचसे मेसेज खिल्ली उडवणारे होते.विवाहसंस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी हे व्रत सुरु झाल असाव.आजच्या काळात याचा फोलपणा जाणवू लागला आहे.म्हणून असे विनोदी मेसेज उत्स्फुर्तपणे शेअर केले जातात. एकंदर स्त्री-पुरुष संबंध आणि त्याला दिलेली विवाहाची चौकट असा हा गुंतागुंतीचा प्रकार आहे.अर्थात हि चौकट केवळ चौकात पाळायची असते यावर ७०% जोडपी सहमत होतील.लिव्ह इन रिलेशनशिप च्या जमान्यात विवाह बंधन हे खूपच जाचक ठरत आहे.

करवंदं, उंबरं... मोदक आणि अर्थातच कोकण !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 01/06/2015 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
आपण खरंच नशीबवान आहोत. रोजच्या रामरगाड्याचा कंटाळा आलाय, थोडा बदल हवाय असे वाटले की फारशी धावपळ करावी लागत नाही. 'रजा मिळत नाही'यासारखी कारणे बायकोच्या तोंडावर फेकून तिचे वाकडे झालेले तोंड बघावे लागत नाही. कंटाळा आलाय तर दोन कपडे बॅगेत भरा आणि निघा.... सज्जनगड आहे, कोयनाडॅमचा परिसर आहे अगदीच एक-दोन दिवस हातात असतील आणि हाताशी स्वतःचे वाहन असेल तर मग कोकणही फार दूर नाही. गेल्या महिन्यात असेच झाले. बायकोला कधी नव्हे ते शनीवारची सुटी मिळाली तिच्या शाळेतून आणि रवीवार जोडून घेवून आम्ही दिवे आगारला कुच केले. सकाळी लवकरच घर सोडले.