Skip to main content

डोळे उघडणे - काही विचार

लेखक पथिक यांनी बुधवार, 03/06/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी एका जुन्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. गप्पा चालल्या होत्या. तिच्या जॉब बद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, 'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर ट्रेडिंग करते घरी बसुन. मागे मी 'रिच डॅड पुअर डॅड' वाचलं आणि माझे डोळे खाड्कन उघडले!' हा 'डोळे उघडणे' हा मोठा विलक्षण आणि दुर्मिळ प्रकार आहे! ज्याचे डोळे उघडतात त्याचे आयुष्य पार बदलून जाऊ शकते. बदल कसा आणि किती होणार ते डोळे कोणत्या बाबतीत आणि किती उघडले यावर अवलंबून असते. माझ्या या मैत्रिणीचे डोळे पैशाच्या बाबतीत उघडले आणि तिच्या करिअर मध्ये थोडा बदल झाला. पण काही लोकांचे डोळे असे उघडतात कि त्यांचे आयुष्य तर पार बदलून जातेच पण इतर लोकांवर, समाजावर, जगावरही त्याच्या परिणाम होतो. उदा. वाल्याचे डोळे उघडले आणि त्याचा वाल्मिकी झाला! न्यूटन चे डोळे उघडले आणि जगात काय काय बदल झाले! बुद्धाचे डोळे उघडले आणि बौद्ध धर्म अस्तित्वात आला! कुणाचे डोळे पैशाच्या बाबतीत उघडतात, कुणाचे प्रेमाच्या, कुणाचे प्रकृतीच्या, कुणाचे अध्यात्माच्या, कुणाचे आणखी कशाच्या… पण कुणाचे डोळे कधी, का आणि कशाबाबतीत उघडतील हे मात्र कुणीही सांगू शकणार नाही. ईट इज अ ग्रेट मिस्टरी! आणि एकदा डोळे उघडले कि मगच कळतं कि अरे! आत्तापर्यंत डोळे बंदच होते कि! :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4568
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

In reply to by जेपी

अलीकडे तर गणेशमूर्त्यांचे डोळेही बारीक होऊ लागलेत म्हणे! http://timesofindia.indiatimes.com/india/Chinese-Ganeshas-eyes-narrower…

सरळसोट आयुष्यात एखादा जोरदार झटका बसला की असे डोळे खाडकन उघडतात, मग कळतं आपण आतापर्यंत ज्याला जगणं म्हणत होतो ते खरं जगणं नव्हतंच, पण असे डोळे उघडल्यावर माणूस पुढे काय करतो ते जास्त महत्वाचं...

लेखनविषय: मुक्तक हे फार आवडले . हल्ली यात मोठी यादी देण्याची टुम निघाली आहे.तुमच्या मैत्रिणिचे भले होवो आणि ती मिपाकर झाल्यास "डोळे उघडल्यावर तीन/सहा वगैरे महिन्यांनी माझी प्रगती" लेख येवो. मग डोळे उघडण्याची एक लाटच येईल.

In reply to by कंजूस

काका ,.. "डोळे उघडल्यावर तीन /सहा/ नऊ महिण्यांनी माझी प्रगती " असा लेख यायला हवा. मग डोळे उघडण्याची खरी लाट येईल.=))

In reply to by कंजूस

'मुक्तक' बरोबर आहे कि नाही? मला काही कळत नाही यातलं - साहित्याप्रकारांतलं. :)

आयुष्यात प्रत्येकाचे एकदा का होईना डोळे उघडणे गरजेचे आहे.त्यातुनच माणसाचे व्यक्तिमत्व घडत असते.असं मला वाटतं.:)

'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर ट्रेडिंग करते घरी बसुन. मागे मी 'रिच डॅड पुअर डॅड' वाचलं आणि माझे डोळे खाड्कन उघडले!'
एखादं पुस्तक वाचून खाडकन डोळे उघडले जाणारे लोक बघितले की मी डोळे मिटून घेणे पसंत करतो.

In reply to by अन्या दातार

हाहा अन्ना हजारे सुद्धा स्वामी विवेकानंद चरित्र वाचून अशा प्रकारचं जीवन जगत आहेत म्हणे.

In reply to by अन्या दातार

ते राममोहन रॉय का कोण, त्यांनाही एकदा ईशावास्य उपनिषदाचे एक पत्रावळ झालेले पान रस्त्यात दिसले, उडूनच चालले होते. ते उचलून पाहून, त्यातील तत्त्वज्ञान वाचून त्यांचे डोळे उघडले असा इतिहास आहे बॉ.

In reply to by बॅटमॅन

अगदी, सगळेच काही जन्मापासून सर्वज्ञानी नसतात. काही गोष्टी वाचून अनुभवूनच समजतात, त्यातूनच माणूस घडत जातो.

In reply to by बॅटमॅन

माझा रोख हा साधारणत: पुस्तकाने / सेमिनारने प्रभावित होऊन काही जास्त अभ्यास न करता व्यवसायात उडी मारणार्‍यांकडे होता. त्यासाठीच लेखातील एक प्रसंग उधृत केलाय.

In reply to by अन्या दातार

पुस्तकाचा दोष नाय. वाचनारा काय चीज हाय ते महत्वाचं हाय.

माझे पण डोळे उघडलेत, आणि पुन्हा 'माझ्या राजा, अरे माझ्या शोन्या' म्हटले की पुन्हा मिटतात. गेल्या काही दिवसापासून नुसती डोळ्याची उघड-झाप होऊन होऊन माझे डोळे बारीक व्हायची वेळ आली आहे. :(
मोहब्बत ना सही, जालीम मुकदमा ही कर दे मुझपर कम से कम तारीख दर तारीख मुलाकात तो होगी...

दोन्दोन संपादक डोळे बारीक होवुन झोप येत आहे अश्या गोष्टी करत असतील तर सभासदांनी काय घोरायचे काय ? ;)