करवंदं, उंबरं... मोदक आणि अर्थातच कोकण !
प्रचि २
खरेतर दिवेआगारला ज्यांच्याकडे उतरणार होतो त्या केळकरकाकुंना आधी फोन करून जेवायच्या वेळेपर्यंत पोचतो असे सांगितले होते. पण ताम्हिणी घाटातला हा रानमेवा पाहून काकुंना परत फोन केला आणि आता काय जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचू असे वाटत नाही असे सांगुन टाकले. पण काकुंनी , "काळजी करु नका, तुम्ही चार वाजता पोहोचलात तरी गरम गरम जेवायला वाढेन" असे सांगितले आणि आम्ही निश्चिंत झालो.
प्रचि ३
कच्ची-पक्की करवंदे
प्रचि १३
केळकर निवास
बरं खोलीत गरम होतय म्हणून तुमच्यावर कोणी खोलीतच बसून राहा म्हणून सक्ती नाही केलेली काही. केळकरांची छान दोन एकराची वाडी आहे. कुठेही जावून पथारी पसरा. दिवे आगारला गेले की समुद्रावर फिरणे तर होतेच. पण माझा मुख्य प्रोग्राम असतो, काकुंकडून एक चटई घ्यायची आणि वाडीत जावून तोंड वर करून पडायचे. एखादे पुस्तक आणि जोडीला कधी तलत, तर कधी वसंतराव, कधी आशाबाई तर कधी अख्तरीबेगम असतातच.
सुख म्हणजे तरी दुसरे काय असते हो?
प्रचि १४
आम्ही सहा-साडे सहाच्या सुमारास गेलो होतो बीचवर. भास्कररावांना बाय-बाय केल्याशिवाय निघायचे नाही असे ठरवले होते. गर्दी कमी व्हायला लागली होती.
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
शेवटी भास्करराव अगदीच दिसेनासे झाल्यावर आम्हीही बीचचा निरोप घेवून परत केळकरांच्या घराकडे निघालो. मोदक वाट बघत होते. सकाळी लवकर उठून एक चक्कर समुद्रकिनार्यावर टाकायची, सुर्यनारायणाचे दर्शन घ्यायचे आणि मग साडे आठ-नऊच्या दरम्यान न्याहारी करून हरिहरेश्वराकडे प्रयाण करायचे. असा बेत होता. त्यानुसार सकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान समुद्रकिनार्यावर येवून हजर झालो.
समुद्रकिनार्यावर तसा उजेड होता बर्यापैकी, पण अजून सुर्यनारायणाचे आगमन झालेले नव्हते. आमच्यासारखेच सकाळची शुद्ध हवा खायला आलेले काही रसिक लोक दिसत होते. काहींचा व्यायाम सुरू होता, तर काही जण नुसतेच या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत होते. इतक्यात पुर्वा उजळायला लागली..
प्रचि २९
In reply to हायला भन्नाट हाये हे by टवाळ कार्टा
In reply to विशालराव, सर्वच फोटो खूप by एस
In reply to मस्त फोटो by राजेंद्र मेहेंदळे
In reply to निवांत by कपिलमुनी
In reply to निवांत by कपिलमुनी
In reply to निवांत by कपिलमुनी
In reply to आरावी मधील by रवीराज
In reply to निवांत by कपिलमुनी
In reply to ताम्हिणीच्या घाटात वाघ दिसला by दमामि
ताम्हिणीच्या घाटात वाघ दिसला का हो?
एकाचवेळेी दोन वाघ एका ठिकाणी दिसणे फार दुर्मीळ असते म्हणतात. ;)
जोक्स अपार्ट पण नाही दिसला. माझ्या बरोबरची वाघीण बघून त्याला खरोखरीच्या मिसेस वाघीणीची आठवण झाली असेल आणि गुफेत लपून बसला असेल बिचारा. In reply to ताम्हिणीच्या घाटात वाघ दिसला by विशाल कुलकर्णी
In reply to आपण मायबोलीकर दिसता..... by मुक्त विहारि
In reply to निवांत by नाखु
लहानांसाठी काही साधे खेळ आहेत का
भरपूर आहेत. घोडागाडी राईड आहे. चारचाकी मोटारसायकल्सच्या राईड्स आहेत. बोटींग आहे. अगदी पॅराग्लायडींगसुद्धा करता येते कारण त्यांचा एक सहाय्यक प्रत्येक खेळात बरोबर असतो. खरेतर पॅराग्लायडींगला लहान मुलेच जास्त दिसली. आणि बहुतेक सगळ्या राईडस ३००-३५० रुपये आहेत, त्यामुळे खिश्यालाही फारशी चाट लागत नाही. In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे, केळकर काकू राहण्याचे आणि जेवणाचे किती पैसे घेतात ?
एका खोलीचे भाडे २४ तासाला ५००/- रुपये फक्त. एका खोलीत दोन कॉट आणि एक ज्यादाची गादी असते. हवे असल्यास अजुनही गाद्या मिळु शकतात अगदी माफक शुल्क भरून. जेवणाचे एका वेळचे शंभर रुपये घेतात. मोदक हवे असतील तर त्याचा दर वेगळा असतो. प्रतिनग १० रुपये वगैरे असावा. In reply to वाहव्वा! by अत्रुप्त आत्मा
In reply to सहमत by एक एकटा एकटाच
In reply to आताही शांतच आहे हो, by सूड
केळकर काका-काकूंना म्हणे रात्री मोठ्यांदा गप्पा मारत बसलेलं आवडत नाही.
असं काही नाही. आम्ही तर मागच्या वेळी चक्क गाण्यांची मैफिल रंगवली होती. अर्थात आपल्या गप्पांचा किंवा गाण्यांचा तिथे उतरलेल्या इतर ग्राहकांना त्रास होणार असेल तर केळकरच काय कुठलाही हॉटेलमालत आक्षेप घेणारच. In reply to निव्वळ हिरवंकंच. by प्रचेतस
In reply to मस्तच.. by स्वच्छंदी_मनोज
In reply to मस्तच.. by स्वच्छंदी_मनोज
रुपनारायण (गावातील लोक सुंदरनारायण पण म्हणतात),नाही. रूपनारायण आणि सुंदरनारायण अशा दोन मूर्ती आहेत तिथे. सुंदरनारायणाचे देऊळ शेजारीच असून लहानसे आहे. हा सुंदरनारायण
आणि हा रूपनारायण

In reply to रुपनारायण (गावातील लोक by प्रचेतस
In reply to रुपनारायण (गावातील लोक by प्रचेतस
In reply to रुपनारायण (गावातील लोक by प्रचेतस
In reply to एकच नंबर रे मित्रा !! by प्रसाद गोडबोले
In reply to आणखी एक.. by स्वच्छंदी_मनोज
In reply to आणखी एक.. by स्वच्छंदी_मनोज
तसे ह्याशेजारचे वेळास गावही तेवढेच अफलातून आहे पण थोडेसे पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षीत..
कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेले गाव वेळासच ना? In reply to नाय रे.. by स्वच्छंदी_मनोज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli LeelaIn reply to मस्त झालय लेख.. by स्मिता श्रीपाद
म्हणजे सारणात हापुस चा रस असतो की उकड काढताना हापुस चा रस घालतात
सारण करताना त्यात हापुस आंब्याचा चमच्याने किंवा चाकुने खरवडून काढलेला गर मिसळला जातो. In reply to हापुस चा पल्प घालुन प्रयोग by स्मिता श्रीपाद
In reply to आम्हाला पण बोलवा खायला ;) by विशाल कुलकर्णी
In reply to मोदक चांगले जमले तर नक्कीच by स्मिता श्रीपाद
हायला भन्नाट हाये हे