पावसाळा आणि कास!
पावसाळा आणि सातारा हे एक सुंदर समिकरण आहे! तसं पाहिलं तर पावसाळ्यात सगळ्याच जागा सुंदर हिरव्यागार होऊन जातात पण सातार्याशी लहानपणापासून नाते असल्यामुळे तो मला जवळचा वाटतो.
सातार्याच्या आजूबाजूला बरीच पर्यटनस्थळे उदयाला येत आहेत त्यापैकी फारच प्रसिध्द झालेलं एक म्हणजे कास पठार! हिवाळ्यात इथे उमलणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांमुळे याला बरीच प्रसिद्धी मिळाली तसेच वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणूनही घोषित करण्यात आले. हि प्रसिद्धी तारक कि मारक हा वेगळा विषय होईल त्यामुळे जाऊदे!
तर वीक एंडची गर्दी टाळण्यासाठी आम्ही मंगळवारी ७ जुलैला कासला जायचा प्लान केला.
मिसळपाव