मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा : निकाल

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११ प्रतीक्षा चा निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. विषय जरा कठीण ठेवल्यामुळे यावेळी चित्रे थोडी कमी प्रमाणात आली. मात्र लोकांनी चोखंदळपणे निवड केली आहे. इथे नोंदलेली मते आणि सं.मं. कडे कळवलेली मते विचारात घेऊन निकाल जाहीर करत आहोत. निकालाला काही अपरिहार्य कारणाने जरा उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व. स्पर्धेसाठी आलेली सर्वच चित्रे उल्लेखनीय होती. त्यातही पहिल्या क्रमांकाचे चित्र कोणते याबद्दल कोणालाही शंका नसेल! क्र. १) सौरभ ऊप्स . 5 दुसरा क्रमांकः मदनबाण . 15 तिसर्‍या क्रमांकासाठी ३ चित्रांना सारख्याच पसंतीची मते पडली. तिसरा क्रमांक विभागूनः प्रभो . 1 तिसरा क्रमांक विभागूनः मार्मिक गोडसे . 13 तिसरा क्रमांक विभागूनः सह्यमित्र . 14 सर्व विजेत्यांचे अभिनंदन! तसेच आवर्जून मते नोंदवणार्‍या वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद! पुढची स्पर्धा लवकरच जाहीर करत आहोत. कोणाला काही विषय सुचवायचा असेल तर इथे जरूर सुचवा!

वाचने 7358 वाचनखूण प्रतिक्रिया 30

श्रीरंग_जोशी 13/07/2015 - 23:28
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. नव्या भागासाठी विषय म्हणून निसर्गचित्रे हा विषय सुचवतो. खरं तर त्याचे विविध उपविषय घेता येतील जसे, नदी, जलाशय, समुद्र, डोंगरदर्‍या, वाळवंटी प्रदेश इत्यादी.

नाखु 14/07/2015 - 08:20
अभिनंदन मान्य्वरांचे आभार आणि मत्दारांचे विशेष कवतीक कारण धुराळी धाग्यात मतदानाला येण फार अवघड आहे. आता उरलो प्रतीसादापुरता !

ऋतुराज चित्रे 14/07/2015 - 11:43
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. छायाचित्रणकला स्पर्धेला कमी प्रतिसाद मिळण्याची कारणे, १) कठीण विषय २) प्रवेशिका पाठविण्यापासून ते निकालापर्यंतचा काळ ३) निरुत्साही मतदान ४) निकाल पद्धत असे करता येईल का? १) सोपा विषय व कठीण विषय आलटून पालटून दिल्यास नवशिक्यांनाही ह्या स्पर्धेत भाग घेता येईल. २) प्रवेशिका पाठविण्याचा काळ १५ दिवस , मतदानासाठी ७ दिवस पुरेसे आहेत. ३) मतदान काळ अधिक ठेवल्याने अधिक मतदान होते असे काही दिसत नाही. पहिल्या ७ दिवसांपर्यंतच मतदारांचा उत्साह दिसून येतो. मतदान अधिकाअधिक व्हावे ह्यासाठी मतदारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उत्तम प्रतिसादाचा निकालात उल्लेख करावा, ज्यामुळे मतदार छायाचित्राला नुसते क्रमांक न देता त्याबद्दल टिप्पणीही करतील. ४) नेहमीच्या पद्धतीच्या निकालाबरोबर क्रिटिक अ‍ॅवार्डही ठेवावे. परिक्षकाचे विजेत्या छायाचित्रांवर कॉमेंट असल्यास उत्तम.

ज्ञानोबाचे पैजार 14/07/2015 - 11:54
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, सं.मं. कडे कळवलेली मते हे गुप्त मतदान आहे का? स्पर्धेच्या नियमांमधे याचा उल्लॆख नाही. अशा गोष्टींमुळे मनात उगाचच शंका निर्माण होतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैसा 14/07/2015 - 13:40
सुरुवातीच्या स्पर्धांचे धागे बघा. त्यात हे पण आहे की ज्यांना आपले नाव कळू द्यायचे नसेल ते थेट सं मं ला व्यनि करून आपले मत देऊ शकतात. सर्व नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणे म्हटले की हे आलेच त्यात.

In reply to by पैसा

ज्ञानोबाचे पैजार 15/07/2015 - 09:30
असे असेल तर आक्षेपाबद्दल क्षमस्व, असा नियम कुठे लिहिलेला माझ्या वाचण्यात आला नव्हता म्हणून कदाचित माझा असा गैरसमज झाला असेल. पैजारबुवा

मोहन 15/07/2015 - 12:03
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! पुढील विषय - "स्वातंत्र्य दिन" सुचवत आहे

शामसुन्दर 15/07/2015 - 14:23
पावसा अभावी हतबल झालेला शेतकरी,त्याचे चिन्तातुर जिवन, दुबार पेरणी हे विषय पण हाताळण्या सारखे आहेत

चिगो 15/07/2015 - 16:49
विजेत्यांचे अभिनंदन, आणि मान्यवरांना धन्यवाद.. ;-)