Skip to main content

घरांचे ढिगारे...

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 06/08/2015 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र ...कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे "मुंबईत स्वतःचे हक्काचे घर"
मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही...

आत्मरंजन (मुढकथा)

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 06/08/2015 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला रोज हायवेच्या फाट्यापर्यंत चालत चक्कर टाकल्याशिवाय चैन पडतंच नाही आजकाल. थंडीचे दिवस, पाहुणेराउळे मंजुळेच्या लग्नानिमित्त वस्तीवर संध्याकाळी जमू लागले आहेत. आगत-स्वागतानंतर जेवण वगैरे आटोपून बायका मुलं दमल्यामुळे लवकरच झोपले. लांबचे नवीन पाहुणे अजून येतच आहेत. एकमेकांशी ओळखी-पाळखी करताकरता, त्यांना संध्याकाळचे बाहेर कधी चांगलेच अंधारून आलेलं कळलंच नाही. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे मीही संध्याकाळी निघालो. वस्तीकडे येतानाचा जो रस्ता होता, त्या रस्त्यानंच नेहमी जात असल्यानं मला तो रस्ता माहीत होता. विशेष म्हणजे त्या रस्त्यावर वाहनांची जास्त वर्दळही नव्हती.

[शतशब्दकथा स्पर्धा] लव्ह

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 06/08/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
तो सगळ्यांपासून अलिप्त राहणारा, वेगळा वेगळा होता. म्हणूनच तिला आवडायचा. तू काहीच कुणाशी शेअर का करत नाहीस असं तिने विचारल्यावर तो म्हणाला 'सिगरेट, मोजे आणि अंडरवेअर कधी शेअर करू नये'. हे ऐकल्यावरच तिने ठरवलं, ह्यालाच मी लव्ह देणार. आज वाढदिवसानिमित्त तिला शेकडो गिफ्ट्स मिळाल्या, पण त्यात तिला शष्प इंटरेस्ट नव्हता. रूममेट झोपल्यावर त्याने दिलेली गिफ्ट तिने उघडली. एक सुंदर बाहुली होती. सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची. बाहुलीला छातीशी कवटाळून, त्याच्या विचारात ती गाढ झोपी गेली. मध्यरात्री कसल्याशा आवाजाने रूममेटला जाग आली. बघते तर काय, ती निरागसपणे झोपली होती...

[शतशब्दकथा स्पर्धा] हाक !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 06/08/2015 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
"अंबामाय वाचवं गं माझ्या लेकराला....अहो आई बोलवा ना गजाननाला!!...सगळे शांत का बसलेत ?कोणी काहीच कसं करत नाही..डॉक्टरसुद्धा म्हणाले घरी घेऊन जा त्याला..आता काहीच होऊ शकत नाही..देवा काय करू मी आता? कुठून अवदसा आठवली अन होटेलात जेवायला गेलो आज..माझं लेकरू टेबलापाशीच खेळत होतं..थोडं दुर्लक्ष झालं..बगीच्यातली पाण्याची टाकी दिसली त्याला..गेला हो धावत तिकडे नी पाय घसरला..दोन-तीन मिनिटे पाण्याच्या तळाशी होता..ह्यांनी उडीच मारली त्याला बाहेर काढायला...शुद्ध हरपलीये त्याची..श्वास सुरु आहे फक्त.. सगळे नातेवाईक जमलेत..ह्यांची अवस्था तर बघवत नाहीये..शून्यात बघतायेत कुठेतरी..फार जीव हो त्यांचा लेकरावर.

किल्ले सुवर्णदुर्ग इन लंडन !!

लेखक मालोजीराव यांनी गुरुवार, 06/08/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
नाव वाचून आश्चर्य वाटलं असेल,पण हा किल्ला म्हणजे आपल्या रत्नागिरीतल्या हर्णे बंदराजवळ असलेला आपल्याला परिचित असा सुवर्णदुर्ग नसून, लंडन मधल्या ग्रीनविच मध्ये असलेला सुवर्णदुर्ग आहे. किल्ले सुवर्णदुर्ग, हर्णे किल्ले सुवर्णदुर्ग, हर्णे याची कहाणी सुरु होते कोकण किनार्याजवळ असणार्या आपल्या मराठ्यांच्या सुवर्णदुर्ग पासूनच.

संत एकनाथांचा नैवेद्य - काही शब्दार्थ/पदार्थ माहितकरून हवेत

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 06/08/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
झाल्या धूप दीप नीरांजन । देवासी वोगरावें भोजन । नानापरीचें पक्वान्न । अन्न सदन्न रसयुक्त ॥२९०॥ मांडा साकरमांडा गुळवरी । शष्कुल्या अमृतफळें क्षीरधारी । दुधामाजीं आळिली क्षीरी । वाढिली परी वळिवट ॥९१॥ मधुवडा कोरवडा । लाडू तिळवयांचा जोडा । रुची आला अंबवडा । ठायापुढां वाढिंनला ॥९२॥ पत्रशाकांची प्रभावळी । भात अरुवार जिरेसाळी । सूप सोलींव मुगदाळी । गोघृत परिमळी सद्यस्तप्त ॥९३॥ सांजा सडींव गुळयुक्त । एळा मिरें घालूनि आंत । पाक केला घृतमिश्रित । सेवितां मुखांत अरुवार ॥९४॥ कथिका तक्राची गोमटी । आम्ररसें भरली वाटी । शिखरणी केळांची वाढिली ताटीं । देखोनि लाळ घोंटी अमरेंद्र ॥९५॥ दधि दुग्ध साय साकर । नैवेद्य

अपेक्षाभंग . - (शशक स्पर्धेसाठी नाही )

लेखक तुडतुडी यांनी गुरुवार, 06/08/2015 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर शतशब्द कथांची स्पर्धा चालू आहे . कथांचा पाऊस पडतोय नुसता .वाचकांचा आणि लेखकांचाही कल्लोळ चाललाय नुसता . आपणही घ्यावा का भाग ? आपल्याला बऱ्यापैकी जमतं कि कथा लिहायला . तो विचार करत होता . लिहूनच टाकू . अगदी पहिला नाही तर तिसरा तरी नंबर येईल अश्या दृष्टीने बराच वेळ विचार करून त्याने एक शशक कथा लिहिली आणि डकवली. १० मिनट दुसर्या कामात गुंतला . आत्तापर्यंत किती प्रतिसाद आले असतील ? किती जणानी +१ दिला असेल कितींनी -१ हे बघायला अधिरतेने त्याने मी .पा चं पान रिफ्रेश केलं अन ती महान अक्षरं झळकली 'The website encountered an unexpected error. Please try again later.'

[शतशब्दकथा स्पर्धा] समरांगण

लेखक नागेश कुलकर्णी यांनी गुरुवार, 06/08/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
तोफेच्या प्रचंड आवाजाने आसमंतात एक प्रकारची भयानकता पसरली....... पाठोपाठ बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांनी युद्धाची जणू घोषणाच केली........ वातावरणात भयानकता जाणवत होती....... धरणी जणू रक्त प्यायला आतुर झाली होती..... सगळी कडे रक्ताचा सडा...... अशातच एक सैनिक एकदम आवेशात गोळ्यांची बरसात करत पुढे जात होता.... त्याच्या कित्येक गोळ्या शत्रूच्या हृदयाचा ठाव घेत होत्या.... अचानक एक गोळी त्याच्या छातीत लागली.... तो कोसळला... त्याही परिस्थितीत त्याच्यातला सैनिक त्याला स्वस्त बसू देत नव्हता..... कर्तव्य त्याला मरू देत नव्हतं..... बंदुकीचा आधार घेऊन तो उठला...

सबकाँशस मधलं काही...

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 06/08/2015 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरचा हा पहिलाच लेख... तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा!! ---------------------------------------------------------- कजग्जझगजड़कन!!शजसब्दक,ण्डजकसब्.जस:जबसहस्जबक्स. धस्खड्ज्ज्सब शजसजशब्सज्जश् ज्जज्जबजशीजशहीह्ह्ज्झह... तो नुकताच वाचायला शिकला आहे. रोज रात्री चौकातल्या सायकल पंक्चरच्या दुकानात जाऊन तो पेपर वाचत आहे. वाचायला यायला लागलं अन तो आनंदला. वाचलं. कर्जमाफी होणार. अन तो आनंदला. तो मजूर, त्याला स्वत्:चं शेत नाही. त्याला वाचायला येतं म्हणून तो आनंदला. कर्जमाफीला नाही. जाहिरात आहे. संतूर साबनासोबत 10 रूपयाचं कोलगेट फ्री.

स्पर्धा - शतशब्दकथा.( स्पर्धेसाठी नाही)

लेखक जेपी यांनी गुरुवार, 06/08/2015 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
तो - हे बघ मिपावर शशक स्पर्धा सुरु आहे.तु पण त्यात भाग घे. ती- छे आप्ल्याला नाही जमणार हे कथा बिथा लिहीने.तुच लिहीत बस. तो - मी सध्या सन्यास घेतला आहे,नाहीतर लिहीली असती. ती - प्ण हे लीहिने काय सोप नसत. तो - अग सोप असत काहीतरी प्रसंग डोक्यात ठेवायचा आणी त्याभोवती शब्द रचत जायचे.हे बघ इथेच पन्नास एक शब्द झाले.आता इकडुन तिकडुन हुकडुन अजुन एक पन्नास शब्द जमा करायचे आणी घुसडवायचे .झाली शशक तयार हाकानाका. ती - पण नंतर त्याचा सिक्वल ही लिहावा लागेल ना ? तो - ते नंतर पुढच्या फेरीत गेलतर बघुया. ती - शिर्षक काय द्यायच कथेला ? तो - स्पर्धा !!! ह्हीह्हीह्ही.