Skip to main content

अपेक्षाभंग . - (शशक स्पर्धेसाठी नाही )

लेखक तुडतुडी
गुरुवार, 06/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर शतशब्द कथांची स्पर्धा चालू आहे . कथांचा पाऊस पडतोय नुसता .वाचकांचा आणि लेखकांचाही कल्लोळ चाललाय नुसता . आपणही घ्यावा का भाग ? आपल्याला बऱ्यापैकी जमतं कि कथा लिहायला . तो विचार करत होता . लिहूनच टाकू . अगदी पहिला नाही तर तिसरा तरी नंबर येईल अश्या दृष्टीने बराच वेळ विचार करून त्याने एक शशक कथा लिहिली आणि डकवली. १० मिनट दुसर्या कामात गुंतला . आत्तापर्यंत किती प्रतिसाद आले असतील ? किती जणानी +१ दिला असेल कितींनी -१ हे बघायला अधिरतेने त्याने मी .पा चं पान रिफ्रेश केलं अन ती महान अक्षरं झळकली 'The website encountered an unexpected error. Please try again later.'
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1679
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

अगदी अस्संच झालं

शतशब्दकथांचा माराचा असा झाला, की मिपा हादरून गेले नुसते.. सावरले कसे तरी....

बाकी श श क चा लोट बघुन खरेच 'शंभरी भरल्याचे' वाटु लागले आहे.