नाव वाचून आश्चर्य वाटलं असेल,पण हा किल्ला म्हणजे आपल्या रत्नागिरीतल्या हर्णे बंदराजवळ असलेला आपल्याला परिचित असा सुवर्णदुर्ग नसून, लंडन मधल्या ग्रीनविच मध्ये असलेला सुवर्णदुर्ग आहे.
किल्ले सुवर्णदुर्ग, हर्णे
याची कहाणी सुरु होते कोकण किनार्याजवळ असणार्या आपल्या मराठ्यांच्या सुवर्णदुर्ग पासूनच. अठराव्या शतकात शाहू छत्रपती गादीवर आल्यानंतर मराठ्यांची सत्ता सार्वभौम झाली व भारतभर पसरली, सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आली.कान्होजींचा मृत्यू १७२९ साली झाला आणि त्यानंतर संभाजी आंग्रेकडे कारभार आला, संभाजी आणि पेशव्यांच्यात झालेल्या १७४० सालच्या झटापटीत संभाजी जखमी होऊन मृत्यू पावला, त्यामुळे त्याच्या भावाने म्हणजे तुळाजीने पेशव्यांशी वैर धरले, १७४२ साली तुळाजीला अंजनवेल किल्ला घेतल्याबद्दल शाहू छत्रपतींनी सरखेल पद बहाल केले. शाहू छत्रपतींच्या हयातीत त्यांनी तुळाजी आणि मानाजी आंग्रे यांच्या कारभारावर अंकुश ठेवला, दुर्दैवाने शाहूंचे १७४९ साली निधन झाले.
सरखेल कान्होजी आंग्रे
संभाजी आंग्रे, पायरेट्स ऑफ कॅरेबियन -३ मध्ये दाखवण्यात आलेले.
तुळाजी आणि पेशव्यांचे आधीच वैर असल्याने तुळाजी पेशव्यांचे आदेश मानेनासा झाला, सरकारात ऐवज भरण्यास मनाई करू लागला आणि स्वतंत्र कारभार करू लागला. सुवर्णदुर्ग ते दक्षिण कोकण वर वर्चस्व, प्रबळ आरमार आणि पराक्रमी असल्याने पेशव्यांना नुसत्या फौजेनिशी त्याचा पराभव करणे शक्य नव्हते. त्यामुळे पेशव्यांनी तुळाजी विरुध्द युद्धासाठी इंग्रजांची मदत मागितली, इस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांकडून वारंवार खंडणी घेतल्याने इंग्रज तुळाजीचा काटा काढण्याची संधीच शोधत होते. इंग्रज आणि पेशवे यांच्यादरम्यान १९ मार्च १७५५ रोजी हा दुर्दैवी करार झाला.
कप्तान विलियम जेम्स
इंग्रजांनी या मोहिमेची कामगिरी कप्तान विलियम जेम्स यांच्याकडे सोपवली.इस्ट इंडिया कंपनीची ४१ लढाऊ गलबते मुंबईहून सुवर्णदुर्गकडे निघाली त्यांना पुढे पेशव्यांची ६० गलबते, ७ तारवे आणि १ बातेला येऊन मिळाले. अशा प्रकारे हे संयुक्त आरमार २९ मार्च १७५५ ला सुवर्णदुर्ग ला येऊन थडकले. २ एप्रिल १७५५ रोजी इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.
या लढाईत गाजवलेल्या दैदिप्यमान पराक्रमामुळे आणि कंपनीच्या व्यापारातला मोठा अडथळा दूर केल्यामुळे इंग्रजांनी कप्तान जेम्स ला चीफ कोमोडोर पदी बढती दिली आणि त्यानंतर इस्ट इंडिया कंपनीचा संचालक हि बनवले. सुवर्णदुर्ग ची कामगिरी विलियम जेम्स च्या आयुष्यातली सर्वात महत्वाची ठरली. त्याने १७५९ साली आपले बस्तान भारतातून लंडन येथे हलवले, कप्तान म्हणून भारतात आलेला जेम्स चारच वर्षात गर्भश्रीमंत बनून लंडन ला गेला. तेथे गेल्यावर कॉर्न्वाल येथून तो खासदार म्हणून निवडून आला.१७७८ साली ब्रिटनने त्याला 'सर' हा मानाचा किताब दिला.
कप्तान जेम्स ते सर विलियम जेम्स हा आपला प्रवास सुवर्णदुर्ग च्या कामगिरीनेच झाला याची वाच्यता विलियम जेम्स नेहमी करत असत,त्यांच्या हृदयात या किल्ल्याविषयी एक वेगळे आणि महत्वाचे स्थान होते. हा किल्ला आपल्यायेथे हि असावा हि त्यांची मनापासून इच्छा होती, दुर्दैवाने डिसेंबर १७८३ साली त्यांचा मृत्यू झाला पण त्यांची हि इच्छा त्यांची पत्नी लेडी एनी जेम्स यांनी पूर्ण केली. २ एप्रिल या सुवर्णदुर्ग जिंकल्याच्या तारखेदिवशीच १७८४ साली या लंडन मध्यल्या सुवर्णदुर्ग ची पायाभरणी झाली, तत्कालीन प्रसिध्द वास्तूतज्ञ रिचर्ड जप्प यांनी हा वैशिष्ट्यपूर्ण किल्ला उभारला.
लंडन ते पॅरिस दरम्यान चे सर्वात उंच स्थान असलेल्या या सुवर्णदुर्गने दुसर्या महायुद्धात संदेश वहनाची मोलाची कामगिरी बजावली.
१९८८ पासून हा किल्ला नागरिकांसाठी बंद होता, २००२ साली स्थानिक ग्रीनविच कौन्सिल ने एक निर्णय घेऊन हा किल्ला विकायचे ठरवले, परंतु स्थानिक लोकांनी आंदोलन करून सरकारला या किल्ल्याच्या इतिहासाची जाणीव करून दिली आणि कौन्सिल ने आपला निर्णय रद्द तर केलाच आणि या किल्ल्याच्या डागडुजीसाठी,पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी २,५०,००० पौंड एवढी भरघोस रक्कम सुद्धा हेरीटेज फंड मार्फत दिली.
सुवर्णदुर्ग प्रीजर्वेशन ट्रस्ट मार्फत सध्या या किल्ल्याची देखभाल केली जाते.
एका ऐतिहासिक घटनेमुळे उभारली गेलेली लंडनमधील हि सुवर्णदुर्ग ची वास्तू, तिची सरकार आणि स्थानिकांकडून घेतली जाणारी काळजी, देखभाल एका बाजूला आणि याउलट छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा आपल्या येथील सुवर्णदुर्ग, त्याची होणारी हेळसांड, सरकारचा नाकर्तेपणा दुसर्या बाजूला. सगळंच दुर्दैवी.
किल्ल्याच्या देखभालीसाठी आणि इथला ऐतिहासिक वारसा सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सुवर्णदुर्ग प्रीजर्वेशन ट्रस्ट मार्फत प्रयत्न केले जातात -
पहिल्या मजल्यावर एक हेरीटेज कॅफे आहे, जे पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. अनेक शाळांना येथे हेरीटेज वॉक साठी आमंत्रित केले जाते.पर्यटकांसाठी किल्ल्याच्या गायडेड टूर्स ट्रस्ट चे स्वयंसेवक आयोजित करतात.
कार्यक्रमांसाठी किल्ल्याचा काही भाग हा रोयल्टी घेऊन वापरास दिला जातो. किल्ल्यामध्ये एक छोटेखानी संग्रहालय सुद्धा आहे.
मोठ्यांना 2.50 पौंड तर लहान मुलांना 2 पौंड असे टिकिट आहे,
या सर्व उपक्रमातुन मिळणार्या निधि चा वापर हा किल्ल्याची देखभाल आणि दुरुस्तिस केला जातो.
कधी जर लंडन मधल्या ग्रीनविच ला गेलात तर शुटर्स हिल वर असणारा हा किल्ला बघायला नक्की जा, आणि तिथे गेल्यावर शिवरायांचा जयजयकार करायला विसरू नका !
किल्ला कोठे आहे -
सेवेर्नदुर्ग कॅस्टल,
कॅस्टलवूड,शूटर्स हिल
लंडन SE18 3RT
वेब - www.severndroogcastle.org.uk
(लेख पूर्वप्रकाशित महाराष्ट्र टाईम्स येथे)
- मालोजीराव

वाचने
25887
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहितीपूर्ण लेख.
अगदी अगदी... धन्यवाद ह्या
In reply to माहितीपूर्ण लेख. by एस
नवीन माहिती
तो भाग observation deck
In reply to नवीन माहिती by अमृत
माहितीपूर्ण लेख.लंडनवारीत
लेखाला
In reply to माहितीपूर्ण लेख.लंडनवारीत by अजया
+नाखुन काका लंडनला निघाले. ;)
In reply to लेखाला by नाखु
प्यारे काका
In reply to +नाखुन काका लंडनला निघाले. ;) by प्यारे१
(वर्गी) मार्गी नाखुनक्की जाल ओ. टेन्शन इल्ले.
In reply to प्यारे काका by नाखु
सुरेख लेख.
संभाजी आंग्रे, पायरेट्स ऑफ
चित्रपटात संभाजी आंग्रे हे
In reply to संभाजी आंग्रे, पायरेट्स ऑफ by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to चित्रपटात संभाजी आंग्रे हे by मालोजीराव
+१, पण दादा शेवटी सगळे
In reply to +१ by टवाळ कार्टा
संभाजी आंग्र्यांवरून ते पात्र
In reply to चित्रपटात संभाजी आंग्रे हे by मालोजीराव
ते संभाजी आंग्रे असावेत
In reply to संभाजी आंग्र्यांवरून ते पात्र by एस
संभाजी आंग्रे हे पात्र संभाजी
In reply to ते संभाजी आंग्रे असावेत by मालोजीराव
या महत्वाच्या नवीन माहितीसाठी
एका ऐतिहासिक घटनेमुळे उभारली गेलेली लंडनमधील हि सुवर्णदुर्ग ची वास्तू,तिची सरकार आणि स्थानिकांकडून घेतली जाणारी काळजी,देखभाल एका बाजूला आणि याउलट छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा आपल्या येथील सुवर्णदुर्ग,त्याची होणारी हेळसांड, सरकारचा नाकर्तेपणा दुसर्या बाजूला.सगळंच दुर्दैवी.+१०००+११११
In reply to या महत्वाच्या नवीन माहितीसाठी by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to +११११ by मधुरा देशपांडे
वा...
मस्त माहिती!!
मस्त माहिती..आवडला लेख..
क्लासच आहे ! नेव्हर न्यू !
मस्तच !
मस्तं माहितीपूर्ण लेख.
छान आहे लेख. आवडला!
वेगळा लेख
धन्यवाद !
छान..
माहितीपूर्ण लेख
नवीन माहिती कळली!
जय हो मालोजिबाबा की! लेख
छान लेख!
सुंदर
खूपच सुरेख आणि अनोखी भटकंती.
मस्तच! खूप नवीन माहिती मिळाली
हम्म.
लेख आवडला मालोजीराव. मटात
माहितीपूर्ण लेख.
छान माहिती !
जुना लेख
होय त्यांनी वेबसाईट मध्ये
In reply to जुना लेख by अरविंद कोल्हटकर
अप्रतीम लेख.
छान लेख.आवडला.आपल्याकडे
रोचक माहितीपूर्ण लेख.
राजस्थान मध्ये गड किल्याना
महाराष्ट्रातल्या
In reply to राजस्थान मध्ये गड किल्याना by विवेकपटाईत
खालील लींकवर या कील्ल्याचे