Skip to main content

डावा डोळा...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 22/08/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
‘हा घे नंबर... फक्त एकदाच जाऊन बघ..’ घनिष्ट मित्राने नंबर हाती थोपवत डावा डोळा झाकला. उजवा का नाही? तर डाव्या गोष्टीत जास्त मौज असते! दुसऱ्या दिवशी पूर्ण वेळ मोकळा होता म्हणून दुपारच्या जेवणानंतर मी त्या नंबरवर कॉल केला. किनऱ्या पोरकट आवाजात ‘कौन चाहिये? किसने नंबर दिया? क्या काम है?’ वगैरे मराठी हेलातील हिंदी प्रश्नावली ऐकून घेतल्यावर मी घनिष्ट मित्राचे नाव सांगितले. ‘अच्छा, मग या ना कवाबी आमी तयार हायेतच.’ अशा गावरान मराठीत स्वागत झाले. 'बालगंधर्वापाशी आल्याव फोन करा, मंग सांगतो कसं यायचं त्ये.’ त्या पोराने माहिती पुरवली. मला दम कुठला निघतो? तासाभरातच बालगंधर्व गाठले. चार वाजले होते.

[ शतशब्दकथा स्पर्धा ] - लोक्शाई (उत्तरार्ध) लोकमान्य (पुर्वार्ध)

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 22/08/2015 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य आम्च्या बाई मस्स कड्डक मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली. मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार. मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत. कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर. साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?" म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली. मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन. चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली. बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता." म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे.

विरोध शिवाजी राजेंना आहे, पुरंदरे याना नाही

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 22/08/2015 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
(एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे. म्हणून हा लेख). दिल्लीची मेट्रो अजब-गजब आहे, इथे नानाविध लोक भेटतात. कालचीच गोष्ट संध्याकाळी सीपी स्टेशनहून मेट्रो घेतली. मेट्रोत डोक्यावरचे पांढरे केस पाहून हि सहजा-सहजी कुणी बसायला जागा देत नाही. उभा असतानाच सौ.चा फोन आला. फोनवर अर्थातच मराठीत बोललो. समोर बसलेल्या माणसांनी अंकल आप बैठीये म्हणून जागा दिली. मी धन्यवाद म्हंटले (मला जागा देणारे लोक मला देवासारखेच वाटतात). त्याने मला विचारले, अंकल आप महाराष्ट्रीयन हो. मी हो म्हंटले. त्याने आपला परिचय दिला, तो काही वर्षांपासून मुंबईत राहतो. काही कामासाठी दिल्लीत आला होता.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला...

लेखक मार्गी यांनी शनिवार, 22/08/2015 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

द स्केअरक्रो - भाग ‍१९

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 22/08/2015 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केेअरक्रो भाग १८ द स्केअरक्रो भाग १९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) सोमवारी सकाळी मी एकदम फ्रेश होतो. रॅशेलचा फोन कधीही येऊ शकला असता. मला त्याच्यासाठी तयार राहायचं होतं. त्यामुळे सकाळी सहा वाजताच मी टाइम्सच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. मला फाईल्सवर काम करायचं होतं. आमची न्यूजरूम पूर्णपणे रिकामी होती. अगदी एखादं चिटपाखरूही नव्हतं. एकही रिपोर्टर किंवा एडिटर नव्हता. भविष्यकाळाच्या कल्पनेने माझ्या मनात चरकलं. एकेकाळी हीच न्यूजरूम म्हणजे जगातली सर्वोत्तम जागा होती काम करण्यासाठी.

सुखी जग

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 22/08/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
याहूनी सुखी जग ते कोणते? भेटल्याचा आनंद नाही निरोपाचा खेद नाही.... आभासी जगातला फिल कसा गुड गुड व्हेरी गुड! आठवणींचे सेल्फी कुठले? हसल्याचा आवाज नाही मुसमुसल्याचा गंध नाही...... आभासी जगातला टच कसा साॕफ्ट साॕफ्ट मायक्रोसाॕफ्ट! कोण जागतो कोणासाठी? फिकट डोळे दिसत नाहीत उरली रात्र सरत नाही.... आभासी जगातला गुंता कसा क्रेझी क्रेझी काचणारा!
काव्यरस

शाळा

लेखक जानु यांनी शुक्रवार, 21/08/2015 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ झाली आज शाळेत जायचा कंटाळा आलेला होता. पण काय करणार कंटाळा करुन जमणार नाही. शाळा उघडणे तर आवश्यक होते. मुले वाट पाहत बसुन असतात. आई वडील शेतात कामाला गेले की त्यांना घरात कोणी राहु देत नाही. कुलुप लावले की मुलांचे व पालकांचे हक्काचे ठिकाण म्हणजे शाळेचे मैदान आणि शाळाच. त्यांचा विचार येताच गणेशने आळस झटकला आणि सकाळची त्याच्या वाटणीची कामे करु लागला. स्वाती आणि गणेश दोघे जिल्हा परिषदेत शिक्षक. दोघांचा सकाळ पासुनचा दिनक्रम हा घड्याळ्याच्या काट्यावर बांधलेला. चुका करण्यास, वेळ वाया घालवण्यास सक्त मनाई.

[शतशब्दकथा स्पर्धा] थोडक्यात वाचलो! (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 21/08/2015 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्धः 'परत तेच! मुद्दाम करतेय का?' पुढच्याच टेबलवर पाठमोरं बसलेल्या तिने तीनदा वळून त्याच्याकडे, आणि नजरभेट होताच मागे विमानतळाकडे पाहिलं होतं, मग मान वळवून घेतली होती. तिशीच्या आसपासचा आकर्षक चेहेरा आणि बांधा. डोळ्यांत धास्ती होती का? 'विचारावं का मदत हवीय का म्हणून?

आक्रोश! - (द्विशतशब्दकथा)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 21/08/2015 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
"अच्छा हुआ वो पाववालेका दुकान जला दिया. बच्चा देखके बेवकूफ बनाता था वो. ऐसाहीच मांगता था उसको. अब कलसे हम चाचाके दुकानसे पाव लेंगे..." सायंकाळच्या वेळी शहर जाळपोळींनी उजळून निघाले होते. तसाच उजळलेला तो एक निरागस चेहरा. पाववाल्याला धडा मिळाला, आणि उद्या सुद्धा शाळेला सुट्टी असणार, या दुहेरी आनंदात झोपी गेला.. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे, शहर पुन्हा उठले. पुन्हा पेटले. उजाडता उजाडता काही दिवे, पुन्हा मालवले.. कायमचेच.. त्याचे मात्र आज काहीतरी बिनसले होते.

(मौजमजा) आमचेही पहिलेवहिले प्रेम...

लेखक एस यांनी शुक्रवार, 21/08/2015 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रत वरील दोन धागे मिपावर प्रचंड लोकप्रियता मिळवत असल्याचे पाहोन प्रस्तुत लेखकासही त्याचे पहिलेवहिले प्रेम आठवले आणि त्या उमाळ्यात/ऊर्मीत/उकाळ्यात मागचापुढचा विचार न करता हरहमेश जैशे येक हाडाचा मिपाकर करतो तैशेच प्रस्तुत लेखकाने (येथून पुढे प्र.