Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] थोडक्यात वाचलो! (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 21/08/2015 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्धः 'परत तेच! मुद्दाम करतेय का?' पुढच्याच टेबलवर पाठमोरं बसलेल्या तिने तीनदा वळून त्याच्याकडे, आणि नजरभेट होताच मागे विमानतळाकडे पाहिलं होतं, मग मान वळवून घेतली होती. तिशीच्या आसपासचा आकर्षक चेहेरा आणि बांधा. डोळ्यांत धास्ती होती का? 'विचारावं का मदत हवीय का म्हणून? नकोच, खरंच कुणाची वाट पहात असेल.’ पुन्हा लॅपटॉपकडे वळला. तेवढ्यात पुन्हा ती वळलेली जाणवली, पुन्हा त्याला अडखळून नजर पलिकडे मागे! आता मात्र लॅपटॉप बंद करून तो उठला. इतक्यात तीही आनंदाने उठली आणि पुढून येणार्‍या अवाढव्य शरीराच्या तरूणाला "किती उशीर?" म्हणत तिने आवेगाने मिठीत घेतलं. 'आयला, काय जोडी आहे?' सुन्नपणे त्याने मान हलवली, 'बरं झालं काही बोललो नाही, थोडक्यात वाचलो!' *************उत्तरार्ध ************ "एक ……….विचारू?" त्या अवाढव्य तरूणाने हसत पण अडखळत विचारलं हा गांगरून म्हणाला, "Sure!" "हे अगडबंब माकड ………….या सुंदरीला कसं आवडलं, ……………असं वाटलं ना तुम्हाला? चेहेर्‍यावरून जाणवलं. ………..चूकही नाही म्हणा. …………पण काही सांगावंसं वाटतंय, जरा बसुयात?" ती अवघडलेली, हा त्याहून आधिक. पण नाईलाजाने हस्तांदोलन केलं. तिघे बसले, जोडपं एकीकडे, हा समोर. "दोन वर्षांपूर्वी डोकं दुखून, डोळे अधू झाले. Craniopharyngiomaचं निदान झालं,……………… pituitary glandचा benign tumor. ………सर्जिकली ……….pituitary काढली, ………..ट्यूमर गेला, पण ……….endocrine functionही गेलं. वजन वाढलं, बोलतांना ……….अडखळतो. पण ही खूप सांभाळते मला!" आता अडखळायची वेळ याची. "खरंच ..........कौतुक आहे तुम्हा दोघांचं, ...........अवघड असणार..........पण तुम्ही बरे तर झालात!" "खरंय, थोडक्यात वाचलो!"
लेखनविषय:

वाचने 8911
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

+१ उत्तरार्ध लै आवडला ! "थोडक्यात वाचलो!" या शिर्शकालाही आता नवीन अर्थ प्राप्त झालाय !!

+१ छान कलाटणी

क्या बात है! सुपर्ब.

+१ मस्त कलाटणी! असा सिक्वल असेल हा विचारही आला नव्हता मनात!

+१ अतिशय सुंदर..!! असा उत्तरार्ध असेल हा विचारही आला नव्हता मनात!

मस्तच !

उत्तम

+१

+१ उत्तरार्धाला दिलेली कलाटणी आवडली.

+१

+१

+१

सुरेख ! काय छान कलाटणी दिलीत. एकदम वेगळाच दृष्टीकोन !

+१

+१

जबराट उत्तरार्ध..

+१

+१

छान !

दोनच शब्द, पण दोन व्यक्तिंसाठी वेगेवेगळे अर्थ !!

+१

छान कलाटणी..

+१ आवडेश

+१

मस्तच..

बेस्ट!