पराडकर सर ......२ (अंतिम)
पराडकर सर ........१
परदेशी स्थायिक झाल्यानंतर गावाकडच्या फेऱ्या तशा कमी झाल्या. मग ऑर्कुटवर सरांच्या माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनला. त्यावर एका मित्राचा मेसेज आला की सरांना प्रोस्टेट कँन्सर डिटेक्ट झालाय म्हणून. सरांचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात पसरले होते. भराभरा सुत्रं हलली. मुंबईला टाटामध्ये ट्रीटमेंट झाली. सर तीन चार महिन्यानंतर गावी परतले. आठवड्यातून दोनदा जवळच्या मोठ्या शहरात जाऊन इंजेक्शन घेऊ यावे लागे. शिवाय वॉकरही संगतीला घ्यावा लागे. सर कसलीही तक्रार न करता हसतमुखानं सगळं सहन करत होते.
मिसळपाव