Skip to main content

तंगडीची गोष्ट

लेखक आनंद कांबीकर यांनी बुधवार, 11/11/2015 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
बापानं खोली करुण दिली, मेस लाउन दिली, "आता थेट दिवाळीलाच गावांत याचं! कई कुटाने केले अनआदि मदी गांवात दिसला त् तंगडच् तोडील" म्हणत एका किकमधे बुलेट चालु केली आणि निघुन गेला. खोली ऐस-पैस पण मी एकटाच. मागच्या वर्षी रूम पार्टनर लोकांनी लफडा केला आणि पळून गेले. मार मी खाल्ला, घरमालकचा आणि नंतर बापाचा. आमचं शिक्षणच ठप्प होण्यासारखं मॅट्टर होतं पण बापाला शिक्षणाची भारी हौस म्हणून त्यांनीच साऱ्यावर पांघरुण घालून दुसऱ्या कॉलेजमधे एडमिशन करुण दिली. मी पण ठरवले यावर्षी खुप अभ्यास करायचा, फालतू उद्योग एकदम बंद. सकाळी उठून थोडा व्यायाम केला, अंघोळ उरकुन थोडं वाचन केले आणि मग कॉलेजला गेलो.

लवंगी काव्यचोर

लेखक खटासि खट यांनी मंगळवार, 10/11/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यचोर ======== वृत्त : चौर्यकर्म चाल : बिघडलेली सदर कविता चोरीला जाऊ नये या उद्देशाने लिहीलेली असल्याने तीत आशय पाहण्याचे करू नये. नवीन वाहनचालक वाहन चोरीला गेल्यावर ज्याप्रमाने काळजी घेईल तशीच ही कविता समजावी. सज्जन आनि सभ्य वाचकांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा !
काव्यरस

किल्ला

लेखक भीमराव यांनी मंगळवार, 10/11/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांन्न दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळीच्या मुहुर्तावर आमचा पहिलावहीला लेख.कृपया चुकलं माकलं सांगा. दिवाळीमधे किल्ला बनवन्याची प्रथा नेमकी कधी सुरु झाली हे माहीत नाही, परंतु किल्ला हा प्रत्येक लहान मुलाची कल्पना शक्ती फुलवनारा नक्कीच आहे, दिवाळीची सुट्टी ही नवे कपडे, चिवडा, लाडु, फटाकडे या सर्वांपेक्षा या किल्ल्यामुळेच अधिक हवीहवी वाटायची. परीक्षा कधी संपतेय न कधी किल्ला बनवायला लागतोय असच होऊन जायचं. दिवाळीच्या आधीच बरेच दिवस साहित्याची जुळवाजुळव सुरु व्हायची.

बापट काका

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/11/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
बापट काका आमच्या आक्षीच्या घराच्या पुढेच ५मिनिटावर एक शंकराचं मंदिर होतं, घरालाच जोडलेलं असं आणि घरातच पुढचा भाग दुकानात 'एडजस्ट' केलेला... म्हणजे बघा घर-मंदिर-दूकान... हे सगळं एकाच वास्तुत, कमाले नई! इंदुताइंच दूकान म्हणून प्रसिद्ध होतं ते, असो... त्याच वास्तू समोर एक वाडी होती, बहुतेक सर्वांची घरं रस्त्याच्या जवळ होती, पण त्या वाडीतलं घर जरा रस्त्यापेक्षा लांब, आणि जुने ही नव्हते... म्हणजे ८०सालात वगैरे बांधलेले...

केला नाद होशील बाद

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 10/11/2015 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी सालाबाद्प्रमाने गावच्या चावडीवर होर्डिंग लावले आहे. हे लावन्यासाठी जे कुनी मदत केलेत त्यांचे मंडल लै आभारी आहे. mips_banner एकदाचं आखरीचं डिशक्लेमर डिजीटलवाल्याकडूनः जे फोटो आले, जशे दिले ते लावण्यात आलेले हैत. मागाहून तक्रार चालणार नै. सर्व दादा लोक हितली मजामस्ती सम्जून घ्यायला एक्षपर्ट हायेतच. बाकी दिवाळी असल्याने रागलोभ इसरुन सगळे बोर्ड पाहायला येतील.

बाला

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 09/11/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
एका रणरणत्या दुपारी काळ्या रंगाचे कपडे घालून (जे की त्या रंगाचे उन्हात वापरू नयेत!) एक मुलगी रस्त्यावरून जाताना पाहिली आणि फक्त तिच्या त्या काळ्या कपड्यांच्या निवडीला पाहून ही पहिली कविता स्फुरली! अर्थात त्यात इतरही काही गोष्टींचा अंतर्भाव हा ओघाने आलाच!
काव्यरस

तिथली दिवाळी.....

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 09/11/2015 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
तिथली दिवाळी..... तीरकामठा रंगीत कागद चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का? पहाट झोपेत हळूच उठवून घमघमणारी आंघोळ घालून, फुलबाजांची हजार फुले परत हातात ठेवशील का? रांगोळीतील हुकले ठिपके रेषांमधील नाजूक वळणे, तुळशीमाईचे लगीन लटके परत दणक्यात लावशील का? किणकिण बांगड्या काचेच्या घिरघीर झालरी पोरींच्या! सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या परत उडवण्या येशील का? तिथली दिवाळी धमाल मजा इथली दिवाळी शांत सजा!! आठवणींचे व्याकुळ दिवे परत घरी पोचतील का?

रसमाधुरी

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 09/11/2015 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो !! तुम्हा सर्वांना दिपावलीच्या अनेक-अनेक शुभेच्छा!!

अजंठा लेणी सहल माहिती हवी आहे

लेखक फिलोकॅलिस्ट यांनी सोमवार, 09/11/2015 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मला अजंठा लेणी बघायला जायचं आहे पण तिथे राहण्याची-जेवणाची काय सोय आहे याची माहिती नाही, तरी त्याबद्दल काही माहिती दिलीत तर खूप मदत होईल. तसेच अजून कोणती ठिकाणं बघता येतील. धन्यवाद...

वरंधा घाटातले मनुष्यस्पर्श नसलेले बॅक वॉटर

लेखक नितीनचंद्र यांनी सोमवार, 09/11/2015 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात निसर्ग भरभरुन आहे. याची कल्पना जबाबदार सत्ताधारी किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कधी घेईल तो दिवस तमाम जनतेचा सोन्याचा दिवस. मध्यंतरी एक आकडेवारी जमाकरुन मी चकीत झालो. अवघ्या २० वर्षात अनेक पर्यटन विषयक प्रकल्प राबवुन केरळ राज्याने त्यांच्या राज्यातील तरुण परराज्यात जाणे थांबवले आहे. केरळ मधील आयुर्वेदीक उपचार पर्यटन असो की बॅक वॉटरवर आधारीत पर्यटन असो.