लवंगी काव्यचोर
काव्यचोर
========
वृत्त : चौर्यकर्म
चाल : बिघडलेली
सदर कविता चोरीला जाऊ नये या उद्देशाने लिहीलेली असल्याने तीत आशय पाहण्याचे करू नये. नवीन वाहनचालक वाहन चोरीला गेल्यावर ज्याप्रमाने काळजी घेईल तशीच ही कविता समजावी. सज्जन आनि सभ्य वाचकांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा !
( कविता कुणी स्वतःवर ओढवून घेतली तर सदर कवी त्यास जबाबदार राहणार नाही )
घराघरातून आगी लावून चोर एक पळाला
कुणी म्हणे घातकी, विकृत धरा त्या चोराला
चोराच्या अंगात भरलेले कवितेचे वारे
पेटवू लागला चोरूनि तो चुलीतले निखारे
या फांदीवर त्या फांदीवर शेपटाने लटकून
खिडक्या खिडक्यातील कागद चोरूनिया वाचून
तयार झाली कविता एक कटून नि पेस्टून
हळूच टाकली अनुदिनीवरती शुभमुहूर्त पाहून
दिवसामागुनी दिवस गेले, चौर्यकर्म ते साफ विसरले
चोर म्हणे हे काव्य आपलेच असे वाटुनी शेपूट फुगले
तिकडे मालक अनभिद्न्य गेला दुस-या गावाकडे
चौकामधे बसल्या बसल्या जुने काव्य त्यास स्फुरले
काव्यचोर तो फांदीवरती झोके घेत होता
खुशाल मालकास तो प्रेरणा पुसता झाला
मालकाच्या गावामधे कविता गाऊ लागता
मालकाचा हात मजबूत कानफाटी पडला
चोराची चोरी पकडता शिरजोर तो आणिक झाला
ज्याची केली चोरी त्याला शिव्या देऊनिया आला
रस्त्यामधे बालक अजाण काव्यचोर शब्द बोलता
अजाण त्या बाळावरती चोर पिसाळुनी धावून गेला
तेव्हां कळले गावालाही, चोर का पिसाळला
खाई त्याला खवखवे हा न्याय लागू पडला
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
4121
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते stove वाली कविता का ?
होय. तीच कविता.
In reply to ते stove वाली कविता का ? by सागरकदम
ओरीजनल कविता तुमचीच आहे असा
धन्यवाद जव्हेरगंज. तुमचा
In reply to ओरीजनल कविता तुमचीच आहे असा by जव्हेरगंज
तिथे वापरलेल्या भाषेसहीत
माझे वैयक्तिक मत
कटु असले तरी हेच सत्य आहे,
In reply to माझे वैयक्तिक मत by पैसा
माझी व्यक्तीगत मते भाग -१
In reply to माझे वैयक्तिक मत by पैसा
माझी व्यक्तीगत मते भाग - २ (जराशी अवांतर शंका)
In reply to माझे वैयक्तिक मत by पैसा
बाकी प्रकरण लक्षात आले.
संदर्भ कळला नाही.
मला पण...
In reply to संदर्भ कळला नाही. by दमामि
मलाही संदर्भ चटकन लक्षात आला
In reply to मला पण... by मुक्त विहारि
पैसा तै, माहीतगार, विशाल
तसदी अथवा वेळ वाया गेला असे
In reply to पैसा तै, माहीतगार, विशाल by खटासि खट
सॉरी अनवधानाने वरच्या
In reply to तसदी अथवा वेळ वाया गेला असे by माहितगार
या फांदीवर त्या फांदीवर