बापानं खोली करुण दिली, मेस लाउन दिली, "आता थेट दिवाळीलाच गावांत याचं! कई कुटाने केले अनआदि मदी गांवात दिसला त् तंगडच् तोडील" म्हणत एका किकमधे बुलेट चालु केली आणि निघुन गेला.
खोली ऐस-पैस पण मी एकटाच. मागच्या वर्षी रूम पार्टनर लोकांनी लफडा केला आणि पळून गेले. मार मी खाल्ला, घरमालकचा आणि नंतर बापाचा. आमचं शिक्षणच ठप्प होण्यासारखं मॅट्टर होतं पण बापाला शिक्षणाची भारी हौस म्हणून त्यांनीच साऱ्यावर पांघरुण घालून दुसऱ्या कॉलेजमधे एडमिशन करुण दिली.
मी पण ठरवले यावर्षी खुप अभ्यास करायचा, फालतू उद्योग एकदम बंद.
सकाळी उठून थोडा व्यायाम केला, अंघोळ उरकुन थोडं वाचन केले आणि मग कॉलेजला गेलो.
गेटवरच जिरेवाडीचा सुभ्या भेटला. त्याने कडकडून मीठी मारली, मी ही खुश झालो.
पहिलांच तास भौतिकचा होता. सुभ्या आणि मी मागच्या बेंचवर थॉमस अल्वा एडिसन चे नियम समजून घेत बसलेलो. तेवढ्यात एक मुलगी दरवाज्यात आली. सर तिला यां यां म्हणाले. ति वर्गात घुसली. तिच्या मागे दोन मूली. तिना काळ्या जिन्सवर मेहंदी रंगाचा टॉप घातलेला. भरपूर ऊंची आणि साजेसा बांधा. कमरेपर्यंत येणाऱ्या केसांची चोपुन वेणी घातलेली. वर्गात शिरल्यावर तिना लाजुन एक सार्वजनिक स्माईल दिली. मी एकटक तिच्याकडेच पाहत राहिलो. मेहंदी टॉपवर तिचा गहुवर्ण खुलला होता. टपोरे डोळे, गालावर पडलेली खळी आणि मोठ्ठी चॉकलेटी टिकली मी निरखु लागलो. ति मागच्या बेंचवर येऊन बसली. वहिवर पेन फिरवत तिरप्या नजरेने मी तिला पाहू लागलो. तास लवकर गेला. हजेरी चालू झाली तेव्हां भानावर आलो. सर खाली पाहुन नावे वाचु लागले. तिचं नांव ऐकायला कान आतुर झाले. सरांनी मुलीचे नांव वाचले कि मी तिच्याकडे पहायचो.
'चंद्रकला?' सरांनी नांव वाचले.
'येस सर' ति म्हणाली.
येस चन्द्रकला. एकदम छान नांव. मोहक नांव. आवडले. आपल्या आईचे नांव शशिकला, काकुचे रत्नमाला आणि अता ही चंद्रकला. हे नांव आपल्या घरात अगदी शोभून दिसणार.
सर निघाले तेव्हा ध्यानात आले "स.... सर माही हजेरी"
"नांवघेतले तेव्हां झोपला होतास का रे गाढवा?" म्हणत सरांनी हजेरी लावली.
सुभ्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला, तुमचा जोड़ा लए भारी दिसणार. मी म्हणालो तसलं कायनाय असाच बघत हुतो, आता रसायनाच्या तासाला सरांकडे चांगलं लक्ष देऊ भौतिकचा तास फुकट गेला. तो शांत झाला. तरिपण तो खोलीवर आला कि तिच्याच गप्पा काढायचा. ति माझ्या मनात बसलेली पण मी सुभ्याला सांगणे टाळले. उगाच गांवभर चर्चा कशाला?
खोलीवर एकटा असलो कि तिचेच विचार डोक्यात यायचे. मग मी पाकिटातून बापाचा फोटो काढायचो आणि त्याच्याकडे पाहत अभ्यासाला बसायचो.
एकदा वर्गात, मानगे सरांनी तिला प्रश्न विचारला. ति येत नाही म्हणाली. सरांनी तिला खुप झापले. मुर्ख, ढ वगैरे म्हणाले. थोड़ावेळाने तिने सरांना 'जिरोटी' या शब्दाचा चा अर्थ विचारला. सरांना माहित नव्हता त्यांनी स्पेलिंग लिहून घेतलं आणि उद्या सांगतो म्हाणाले. नंतर कोलतेसरचा तास सुरु झाला. मानगेसर 'जिरोटी' च्या शोधात बाहेर पडले. ते नुकतेच जॉइन झालेले, आणि भरपूर उत्साही. आख्या कॉलेजमधे हुशार म्हणून प्रसिद्ध. आपल्याला उत्तर येऊ नये, हि गोष्ट त्यांना बोचली. ते बराच वेळ गूगल ला झटलें नंतर ग्रंथालयात जाउन त्यांनी जुनि पुस्तकं चाळली, एक दोन मित्रांना फोन केले पण 'जिरोटी' चा अर्थ सापडला नाही. सरांनी दुपाराचे जेवणपण केले नाही. शेवटचा ओझरकर बाईंचा तास चालु होता तेव्हां ते वर्गावर आले.
"कुठल्या पुस्तकात वाचलास तू हां शब्द?" त्यांनी चंद्रकलेला विचारले.
"नई सर, पुस्तकात नई वाचला" ति हसत हसत म्हणाली.
"मग कुठे वाचलास? दाखव पूर्ण वाक्य काय आहे ते?" सर खुपच परेशान दिसत होते.
"नई सर.. ते...तेव शब्द म्या महि अवड़ती अक्षरं जोडून तयार केला हुता" तिना लाजत लाजत सांगून टाकले.
सगळा वर्ग खी खी करुण हसु लागला. मानगेसरांचे टाळके सराकले. ते "तुझ्या...." म्हणत पुढे आले पण ओझरकरबाईंना पाहून भानावर येत चरफटत निघुन गेले. ति बराच वेळ हसत होती आणि मी पण.
सुभ्या बोलला सांभाळून लाइन टाक पोरगी लय डेंजर दिसतेय. मी बोललो तसं काय नाय रे सुभ्या! पण मला बारीक हसु फुटलं. त्यानं पाठित गुद्दा हानला व् जोरात हसून मला डिवचु लागला. सारं प्रकरण सुभ्याच्या ध्यानात आलं. त्याला कुणीच् खोलीवर ठेवत नव्हतं तिच्या गप्पा काढत तो माझ्याच खोलीवर राहु लागला. बुलट वाजली तर बाथरूम मधे लपायला हि तो तयार झाला. घरमालकाला माहित व्हायला नको म्हणून त्याला मी लपत लपत ये जा करायला सांगितले. सुभ्या असल्यावर माझा वेळ मस्त जाऊ लागला. खोलीवर असला कि तो सारख्या बिड्या पेटवायचा आणि चंद्रकलेच्या गप्पा मारायचा. मग मी रोज थोडा थोडा आणि परिक्षेच्या वेळी जास्त अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
सुभ्या एका अठवडयातच सगळ्या वर्गात फेमस झालेला. पोरं त्याला हात वर करुण सलाम करायचे तर पोरी नाक मुरडून जायच्या. तो गॉगल लाऊन त्यांच्या गल्लीला जायचा त्याला वाटायचे एकतरी पोरगी लाइन देइल. मी कधिच त्याच्यासोबत गेलो नाही कारन आमची बुलट केव्हा कुठून निघल याचा भरवसा नसतो.
वर्गात मागे बसनारांमधे मी आज एकटाच होतो. साडे नऊ च्या सुमारास सुभ्या आणि आणखी चार पाच जन वर्गात घुसले.
"एवढ्या उशिरा का आले रे?" जोशीसरांनी विचारले.
"सर गावातून बस ला निघायला....." सुभ्या काहीतरी ठोकनार तेवढ्यात त्याचे वाक्य मधेच तोडत चंद्रकला म्हणाली "सर ही पोरं खाली टपरिवर बिड्या फुकत बसतात मनुन उशीरा येतात अन ही पोरं काल बी वर्गात नव्हती, नऊ ते बारा पिच्चरला गेलती"
सरांनी स्वतः एक एक झापड़ी हानल्या आणि त्यांना प्रिंसिपल सरांकडे घेऊन गेले. ते गेल्यावर चंद्रकला आणि मूली एकमेकिंना टाळी देत मोठ्याने हसु लागल्या. संध्याकाळी खोलीवर आल्यावर सुभ्याने सांगितले, "यार, त्यादिशी तुह्या चंद्रिबरं माहि बी आटम बाजारात फिरत हुती म्या अन हानम्यानं लय पिच्छा केला अन शिट्टया बी मारल्या, त्यहिला परेशान केलं त्याचा तीनं आज बदला घितला. पर तू भीउ नगस बीनधास् लाईन टाक. बाजारात पोरिह चे लफड़े ध्यानात येतात तुह्या चंद्रिच् कई परकरण दिसत नई"
चंद्रकला पोरांच्या चांगलीच डोक्यात बसली. वर्गात बसल्या बसल्या तिला शिव्या देणं हा त्यांचा छंदच् झाला. ते नेहमी बदला घ्यायच्या विचारात असत पण ति सापडत नव्हती. मग त्यांनी एक नविन शक्कल लढवली. ब्रेक मधे, तिचि जिरवायचीच म्हणुन त्यांनी अगरबत्तीला सुतळी बॉम्ब बांधला आणि अगरबत्ती पेटवून ति बसते त्याच्या मागच्या बेंचमधे ठेवली. मी नको म्हणालो ते ऐकायला तयार नव्हते.
वर्गसुरु झाला सगळे तिची वाट पाहत बसलेले. वर्गातल्या सरस्वतीच्या फोटोलापण त्यांनी एक अगतबत्ती लावालेली, पण देवी पावलीच नाही. चंद्रकला येऊन सगळ्यात समोरच्या बेंचवर बसली. पोरं हिरमुसली. बॉम्ब फुटला सगळे दचकले पण ति दचकलीच नाही, म्हणजे बॉम्ब आहे हे तिला आधीच माहित होते. सुभ्याने माझ्यावर डाउट खाल्ला. चन्द्रकला सरळ प्रिंसिपल सरांच्या केबिनमधे घुसली. थोड़ावेळाने शिपाई पोरांना बोलवायला आला. बरोबर बॉम्ब लावणारी पोरंच त्यानं बोलावून नेली.
"चंद्रकलेने सगळी नांव एकदम करेक्ट सांगितली पण ही पोरं नंतर तिला खुप परेशान करतील" जोशी सर मानगे सरांना म्हणाले.
" अहो जोशी सर! ति खमकी पोरगी आहे तिचं टेंशन नका घेऊ. एक एकाला ति यूं सरळ करल." मानगे सर बोलले.
मी त्याच दिवशी ठरवले करल तर हिच्याशीच् लग्न करल. आपल्या बापाला टफ देण्यासाठी आपल्याला असलंच खंबीर नेतृत्व हवं आहे.
मी तिचा माग काढनं चालु केलं. तिची गृहपाठाची वही घेऊन जायचो. ओळख वाढली. ति दुरहुन आमची नातलग लागत होती पण मी तिला तसं सांगितलं नाही. तिचं घर मी राहतो त्याच्या मागच्या गल्लितच होतं, कधी कधी आम्ही सोबच कॉलेजलायायचो म्हणजे मी एकटा आणि ति मैत्रिणींसोबत. सुभ्या म्हणाला तिला सांगून टाक पण मी प्रथम सत्रा च्या परीक्षा होइ पर्यंत तिला न सांगन्याचं ठरवलं होतं.
दिवस भरभरा निघुन गेले. बापच्या दोन चकरा झाल्या. ते प्रिन्सिंपल सरांना भेटले. त्यांची कुठूनतरी ओळख निघाली.
सुभ्याला वर्गातली एक पोरगी म्हणजे राणी पटली. ति दोघं रोज दुपारी कुठं न कुठं फिरायला जात. मी सुभ्याला खोज काढायला सांगितलं तो म्हणाला तिचिपण तुझ्यावर लाइन दिसते तू घाबरु नगस सांगून टाक तिला. सुभ्याचं म्हणणं ति राणीला माझी खोली विचारत होती.
परीक्षा चालु झाली. पहिल्याच दिवशी मी तिला बेस्ट ऑफ़ लक म्हणालो तिना डायरेक्ट हातच् हातात दिला. पहिला पेपर एकदम बेस्ट गेला. नंतर एकापेपरला तिचा नंबर शेवटच्या बेंचवर आलेला. तिचं पूर्ण वर्गावर ध्यान असावं तिना सात आठ पोरांच्या कोणत्या कोणत्या खिशात कॉप्या आहेत हे पर्यवेशक सरांना अचूक सांगितले. माझ्या दोन्ही खिशात कॉप्या होत्या, उरलेले दीड दोन तास मी तसाच अंग चोरून बसलो. पेपर संपला. तिना माझे नांव सांगितले नाही, मी हवेत तरंगतच घरी गेलो.
शेवटच्या पेपरला जास्त अभ्यासाची गरज नव्हती. रात्री एक दीड तास मी प्रेमपत्रे लिहिले. सुभ्या होताच मदतीला. शेवटी तिन चार मधले एक फाइनल करुण झोपी गेलो.
सकाळी उठलो. सुभ्या सकाळीच कुठं गायब झालेला. बराचवेळ तो आला नाही मग मी कॉलेजला जाण्यासाठी खाली आलो. घरमालकाने वडिलांचा नविन मोबाइल नंबर लिहुन घेतला. मी डोक्याला जास्त ताण न देताच परिक्षेला आलो.
पेपर ठीक गेला. चंद्रकला जायला निघाली तिला थांबउन तिच्या हातात चिट्ठी दिली आणि वर्गातच बसून राहिलो. ति लाजली आणि हसतच बाहेर निघुन गेली.
सुभ्या मला शोधत आला
"यार सकाळी बिड्याच बंडल खिड़कीतून खाली पडलं, म्या ते घ्यायला खाली आलू त् तोहा घरमालक ते चाफत हुता. म्या हळुच सटकलूं"
सुभ्याणं चांगलीच काशी केली होती. घरमालकाने सकाळीच फोन केला असल, आतापर्यंत बुलट पण खोलीवर येऊन थांबली असल. मी डोक्याला हात लाउन बसलो होतो तेवढ्यात वर्गातली दोन पोरं मला बाहेर खुनवु लागले. बाहेर येऊन बघितले तर नोटिस बोर्डवर मी दिलेल्या प्रेमपत्राच्या झेरॉक्स कॉपी लागलेल्या. मी चंद्रकलाला शोधु लागलो, ति ओरिजिनल कॉपी घेऊन प्रिंसिपल केबिन मधे घुसताना दिसली. मी मटकन खाली बसलो. सुभ्याने मला वर्गात आणून बसवले. अता खोलीवर पळून जान्यात ही आर्थ नव्हता. मी तिथेच बसून राहिलो. तासाभराने शिपाई बोलवायला आला. प्रिंसिपल केबिन चा दरवाजा लोटला तर मती गुंगच् झाली. प्रिंसिपल सरांनी कहरच केलेला, आधी बापाला आणि मग मला बोलावलेलं. बापाशेजारिच घरमालक बिड्याच् बंडल घेऊन बसलेला.
एवढ्यादिवस बाप फ़क्त कानाखालीच ठेवून द्यायचा आज रांगड्या बापाची लात कंबर्ड्यात पडली. मी झांज येऊन खाली पडलो.
जाग आली तेव्हां मी मळयातल्या लिम्बाखाली बाजावर पडलेलो होतो. एकाबाजुला हिरवागार ऊस तर दुसऱ्याबाजुला गहु. मोटर चालु होती. विहीरितलं पाणी जमीनिवर आदळुन मोड़ा मोडाने गव्हात गुडुप होत होतं. थंडगार वाऱ्याची झुळुक आली आणि चंद्रकलेचं ध्यान झालं. तिचा चेहरा आठवला तशी डोक्यात आग आग झाली, पाय जड़ वाटायला लागला. अंगावरची वाकळ काढली तर पायाला भले मोठे प्लास्टर केलेले. जागचं हलता येईना' पुन्हा तसेच पडून राहिलो. अशी ही तंगडीची गोष्ट बाप 'तंगडं तोडिल' म्हणाला इथून सुरु झाली आणि 'बापाने तंगडं तोडलं' इथे संपली.
मिसळपाव
अरारारा! चांगलीच जिरवली की
अरे अरे बिच्चारा ! चंद्रकला
मग चंद्रकला शेतात डबा
अरे अरे बिच्चारा
शिर्षकावरून तंगडी म्हणजे
=))
वा वा! नंबर एक लिहिलंय
लय बेस..
अरेरे..
अबब!!!
In reply to अबब!!! by जव्हेरगंज
+१
फारच फालतू लिखान रे बाबा
झक्कास गोष्ट हो...
माझ्याकडे शिकवणी लावा
चांगले, वाईट, आडवे, तिडवे
In reply to चांगले, वाईट, आडवे, तिडवे by आनंद कांबीकर
खुशाल विचारा
In reply to चांगले, वाईट, आडवे, तिडवे by आनंद कांबीकर
मार्गदर्शन कसले मागताय
वर
In reply to वर by आनंद कांबीकर
मला वाटले चंद्री अजून
In reply to मला वाटले चंद्री अजून by सागरकदम
हेला उचला रे कोणतरी. चिव तिव
In reply to मला वाटले चंद्री अजून by सागरकदम
..
अरारारा!
ख्या ख्या ख्या
भाषेचा लहेजा झकास जमला आहे.
हॅ हॅ हॅ!
लई भारी न भाउ !!!!
गोष्ट आवडली , लिखाणाची शैली
मस्त रे
In reply to मस्त रे by नाखु
धन्यवाद नाखु भौ
हाहा
एक नंबर कांबीकर, लिहित राहा..
सैराट - २
पुन्हा एकदा वाचून तेवढीच मजा
अर्चीची बहीण शोभल की चंद्री.
मस्तय
भारी
जब्बरदस्त!
मस्त कथा!
कथा आवडली. भाषेचा लहेजा छान
आवडली ....