आमच्या देशात पेढे, चितळ्यांची बाकरवडी असले काही पदार्थ मिळत नाहीत मग असे काही खायचे असेल तर दोन पर्याय उरतात एक म्हणजे मायभूत गेले की खाऊन, बांधून घ्या नाहीतर इथे घरी करा.
लक्ष्मीपूजनासाठी नैवेद्याला पेढे करायचे म्हणजे खवा घरी करण्यापासून तयारी, मग काहीतरी आयडिया लढवता येते का पाहिले आणि जादूची कांडी फिरून अवघ्या ५ मिनिटात पेढे फक्त वळायचे बाकी राहिले.
तर आजच्या लक्ष्मीपूजनासाठीचे हे पेढे-
साहित्य-
१ कप मिल्क पावडर(मी नेस्ले ची निडो घेतली.),
५ ते ६ चमचे मिल्कमेड(नेस्लेचे मिलकमेड घेतले),
२ टेबलस्पून साजूक तूप,
२ टे स्पून पिठीसाखर (मिल्कमेड गोड असते त्यामुळे साखरेची गोडी आवडीनुसार कमी जास्त