Skip to main content

टेडी (भाग-3)

लेखक एकजटा अघोरी यांनी गुरुवार, 19/11/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणार्धात वीणा आणि चव्हाण आवाजाच्या दिशेनं पळत सुटले. हॉलच्या डाव्या बाजूच्या बेडरूममधून आलेला होता आवाज. वीणा झटकन खोलीत शिरली. डाव्या कोप-यात एक जुनं लाकडी कपाट होतं. त्याच्या दरवाज्याशी आतून कुणीतरी झटत होतं. बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. वीणाने पटकन दरवाजा अगदी जीव खाऊन ओढला. त्यासरशी दिया एकदम बाहेर येऊन फरशीवर पडली. आता तर ती अगदी जोरजोरात रडत होती. अगदी फ्रॅंटिकच झालेली होती. वीणानं तिला उचलून घेऊन थोपटायला सुरुवात केली, तशी ती थोडी शांत झाली. काय झालं असावं ते आता त्यांच्या लक्षात आलं. त्या कपाटात एका कोप-यात एक मळकट टेडी बेअर ठेवलेला होता.

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 19/11/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

ती अमेरिकन मुलगी.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 19/11/2015 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
"भाऊसाहेब,ह्या तुमच्या म्हणण्यावर मी आणखी जास्त सहमत होऊच शकत नाही"--मी म्हणालो. लेबरडेची सुट्टी संपली.आता उन्हाळा ओसरत जाणार.फ़ॉल चालू होणार.झाडांची पानं पिवळी होऊन पडायला सुरवात होणार.अंजीराच्या झाडाची पानं,हत्तिच्या कानाच्या आकाराची ही पानं, चांगलीच पिवळी होऊन पडायला लागली आहेत.सफरचंदाना लाल रंग चढत आहे.लालबुंद व्ह्यायला त्या फळांना आता थंडीची जरूरी आहे.सफरचंदाच्या झाडाची पानं अजून हिरवीच आहेत.ऑक्टोबरमधे चांगलीच थंडी पडायला लागली की ह्या झाडांची पानंसुद्धा पडायला सुरवात होईल.तोपर्यंत फळं पाडाला येणार.मलबेरीची पानं झपाट्याने पिवळी व्हायला लागली आहेत.हे झाड सर्वांत प्रथम काटकूळं होणार आहे.भ

जंटलमन्स गेम ३ - इंडेक्स फिंगर!

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 19/11/2015 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट हा खेळ जसा बॅट्समन, बॉलर्स आणि फिल्डर्सचा आहे तितकाच, कदाचित किंचीतसा जास्तं असा अंपायर्सचा आहे. अंपायरच्या वर केलेल्या किंवा न केलेल्या बोटामुळे अनेक मॅचचे रिझल्ट्स पूर्णपणे बदलू शकतात! आजच्या डीआरएस च्या जमान्यात तंत्रज्ञान इतक्या उच्चकोटीला गेलेलं असतानाही अंपायर्सविना क्रिकेटच्या खेळाची कल्पना करणं निव्वळ अशक्यंच आहे.

मंत्र

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 18/11/2015 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज चार दिवस झाले ही मुलगी दुसरं काही बोलतंच नाहीय. नुसती अधून-मधून रडतेय आणि "बाबा सांगा ना; बाबा सांगा ना"चा धोशा लावला आहे. आमची मुक्ता हो! मला वाटलं होतं, होईल एक-दोन दिवसांत नीट; पण चार दिवस झाले तरी हिचं लक्षण ठीक दिसेना. झालेलं काहीही नाहीय. म्हणजे, अगदी विशेष असं काही फार झालं नाहीय. आमच्या घरात तर नाहीच. हिने मात्र ती गोष्ट फार मनावर घेतली आहे. सांगतो. गेल्या रविवारची गोष्ट. सकाळचे नऊ-सव्वानऊ झालेले. मी असा नेहमीप्रमाणे शूचिर्भूत होऊन; माझा मलमलीचा शुभ्र झब्बा-पायजमा घालून अभ्यासिकेत लिहीत बसलो होतो. हो; रविवारी सकाळी नऊ ते अकरा ही माझी लेखनसाधनेची वेळ असते.

दौलतजादा

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 18/11/2015 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
सरपटत येणाऱ्या हुंदक्यांचे नाक चोंदुन पायबंध घालताना फोडणीच्या भातावर लिंबु पिळुन खाताना तुळशीपत्राचे वृंदावन लाथेने उडवताना डबल बॅरल काढुन रानडुक्कर टिपताना मरतुकड्या बामणाला दगड फेकुन घालताना विसरु नकोस हा दौलतजादा तुझ्या बापजाद्यानं कमावलाय अंधारवाड्यातील भयकिंकाळ्या ऐकुन रुळलेली वाट वाकडी करताना °°°°°°°°°°° थरारनाट्याचा दुसरा अंक लिहीला जातो निसरड्या बाहुपाशात श्वास गुदमरुन जातो समुद्राची भिती काळजात घुसत जाते बेफिकीर वटवाघुळ केविलवाणे तडफडतं जेव्हा कुठुणशी एक कुणकुण कानावर येते आणि आता ही तलवार सरकन मागे फिरवताना विसरु नकोस हा दौलतजादा तुझ्या बापजाद्यानं कमावलाय अंधारवाड्यातील भयकिंका
काव्यरस

मी तुझा

लेखक माहीराज यांनी बुधवार, 18/11/2015 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
या नभातील तारका तू मी तुझा गं चांदवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।। रंग हे तारांगणीचे रंगले नयनी तुझ्या छंद माझे गंध होऊन दंगले स्वप्नी तुझ्या तू असे आकार माझा मी गुलाबी ही हवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।। अंतरीचे ते चिरंतर स्वप्न तु जे पाहीले तेच माझ्या या मनाच्या अंतरीही रंगले तुच सारी राञ माझी मी नशीला काजवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।   
काव्यरस

गुलाबजाम!

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 18/11/2015 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
. चितळेंचे भारतातून आणलेले इन्टंट गुलाबजामचे पाकिट संपले. गिट्स चे मला आवडत नाहीत आणि दुधापासून खवा करायचा तर आटवताना त्या दुधालाही कंटाळा येतो तर मला कुठचा उत्साह असायला? पण दिवाळीपाडव्याला गुलाबजाम तर हवेच होते आणि घरचेच हवे होते. म्हणून मग पेढ्यांकरता केला तसा सारखा इन्स्टंट खवा केला. पण मिल्क मेड खूप गोड असते ना, पेढ्यांना ते चालले पण इथे जरा वेगळी परिस्थिती होती म्हणून मग जरा वेगळा खवा प्रयोग केला.

बोर्डरूम ड्रामा...

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 18/11/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली ई-कॉमर्सची नवनवीन रूपे आपण इंटरनेटवर अनुभवतो आहोतच. गेल्या काही वर्षात ह्या क्षेत्रात झालेली वाढ उल्लेखनीय आहे आणि ती वाढ सतत चढत्या दिशेनेच होत राहणार. अगदी औषधापासून, भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. त्यातूनच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपआपल्या ऑनलाईन स्टोरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली. जितकी स्पर्धा ह्या क्षेत्रात वाढेल, तितकाच त्याचा ग्राहकांचा फायदाही होणार हे निश्चितच. अगदी काही मिनिटात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, ह्या निरनिराळ्या ऑनलाईन स्टोरवर असलेल्या किमतींची तुलना करून आपल्याला घरपोच मिळतात.