दिव्यचक्षु
दिव्य पेर्णा : http://www.misalpav.com/node/33935
अॅडव्हर्टायझिंग एजन्सीच्या ऐसी केबिनात
सगळ्यात सामसूम पीसीवरच्या स्क्रीनसमोर
सगळ्यात शेवटच्या अॅड डिझाईनच्या
सगळ्यात शेवटच्या टॅगलाईनवर
मी काम करतो.
रास्टर फोटोशॉप अन् व्हेक्टर कोरलवर
अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि
कम्प्युटर ग्राफिक्सध्ये ज्याचे चालतात हात
डिझाईनर पॅडवर हवे तसा माऊस वळवत
तो मी एज्युकेटेड क्रियेटिव्ह डिझाईनर.
एजन्सीचे मालक सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात चुकलेली प्रुफे घेऊन
चुका काढतात स्वतःलाच न कळणार्या
स्क्वेअरसेमीच्या व्यवहाराचा एकटाच हा शत्रू.
डिझाईनर होतोय क्रियेटिव्हली
काव्यरस
मिसळपाव