साहित्यः
१. मेथी जुड्या - ३ ते ४
२. मसूर डाळ - पाव वाटी
३. कांदा - १ मध्यम
४. टोमॅटो - १ मध्यम
५. लसूण पाकळ्या - २ (ठेचून किंवा बारीक चीरुन)
६. जिरं / मोहरी - १/२ चमचा प्रत्येकी
७. तेल - ३ ते ४ पळ्या
८. गरम मसाला - १/२ चमचा
९. लाल तिखट किंवा मसाला - चवीनुसार
१०. हळद - पाव चमचा
११. अर्ध्या लिंबाचा रस
१२. चवीनुसार मीठ / साखर
कृती:
१. मसूर डाळ स्वच्छ धुवून भिजत घाला
२. कांदा/टोमॅटो बारीक चिरुन घ्या
३. मेथी स्वच्छ धुवुन बारीक चिरुन घ्या
४. नॉनस्टिक कढई किंवा पॅन मधे तेल तापलं कि जिरं / मोहरी घालून तडतडू द्या
५. चिरलेला कांदा / लसूण घालून परता. कांदा जरा मऊ झाला की भिजवलेली डाळ घाला. डाळ खाली लागू नये म्हणून डाळ भिजेल इतपतच पाणी घालून डाळ कोरडी होईस्तोवर शिजवा
६. डाळ शिजली की अनुक्रमे हळद, तिखट किंवा मसाला, गरम मसाला, मीठ आणि साखर घालून एक २-३ मि. परता. नंतर टोमॅटो घालून कडेने तेल सुटेस्तोवर परता
७. बारीक चिरलेली मेथी घाला. मेथी शिजली आणि कडेने परत तेल सुटायला लागलं की गॅस बंद करा. लिंबाचा रस घालून भाजी सारखी करा
८. गरमागरम आणि चविष्ट मसूर-मेथी पोळी, फुलका किंवा भाकरी बरोबर सर्व करा. स्पेशली भाकरी सोबत सायीचं दही आणि मिरच्यांचा ठेचा असेल तर अहाहा....
टीपा:
१. मेथी एवजी कांद्याची पात किंवा पालक घेऊ शकता कींवा मेथी-पालक, मेथी-कांद्याची पात काँम्बो पण छान लागतं. कांद्याची पात असेल तर मग वेगळा कांदा घालायची गरज नाही
२. मसूर-मूग डाळही एकत्र घेउ शकता
३. काही भाज्यांत तेल अंमळ जरा जास्त असलं तरचं मजा येते नाहीतर भाजी कोरडी लागते (असं माझं मत)

छान
In reply to छान by जातवेद
छ्या मग अंदाज साफ चूकला
In reply to छ्या मग अंदाज साफ चूकला by दिपक.कुवेत
हा हा हा
In reply to हा हा हा by जातवेद
माई मोड ऑन
In reply to माई मोड ऑन by दिपक.कुवेत
हे शिनिअर लोक्स काय काय
छान पाकृ
In reply to छान पाकृ by अजया
हि घ्या अजुन एक वेगळी पाक्रु
In reply to हि घ्या अजुन एक वेगळी पाक्रु by नेहरिन
वा सांडगे - मेथी भाजी आवडली
In reply to वा सांडगे - मेथी भाजी आवडली by दिपक.कुवेत
हो.
In reply to हि घ्या अजुन एक वेगळी पाक्रु by नेहरिन
छान आहे ही पाकृ पण.धन्यवाद.
दीपकबाबा पनिरवाले इन तरकारी!
खूपच मस्तं पाककृती. आवडली.
वाह मस्त दिसते आहे ..
व्वा !
मसुर्र्र्र्र … माझा वीक
मस्त ! तोंपासू !
अरे वा ! मेथी काल च संपवली पण
चविष्ट लागणार यात शंकाच नाही
In reply to चविष्ट लागणार यात शंकाच नाही by कंजूस
अहो गाडगीळ साहेब/पीयुशा
करून बघीतल्या जाइल
+१ टू कंजूस काका ,३ चार
वा..
मेथीजुडी अर्धी वापरून आत्ताच
मस्त!
मस्त दिसतेय भाजि.करुन पाहिन.
मेथीचा कुठलाही प्रकार आवडतो.
मस्त कृती
In reply to मस्त कृती by मीअपर्णा
वा....
In reply to वा.... by दिपक.कुवेत
हा हा
आता मसूर डाळ आणली की करून
छान पाकृ!
वाह !
In reply to वाह ! by सस्नेह
पण ही भाजी हिरवी नाही दिसत....
झकास!
धन्यवाद मंडळी
मसूर वेगळे, मसूर डाळ वेगळी.
In reply to मसूर वेगळे, मसूर डाळ वेगळी. by अनिता ठाकूर
धन्यवाद अनिता बाई
तिक्डे
In reply to तिक्डे by कुंदन
तिक्डे तेलाची विहिर आहे का हो तुमची....
In reply to तिक्डे तेलाची विहिर आहे का हो तुमची.... by दिपक.कुवेत
कुवेतला
मेथीच्या पानापानावर "भरपूर
In reply to मेथीच्या पानापानावर "भरपूर by कंजूस
धन्यवाद गाडगीळ साहेब
तुझ्याकडच्या मेथीचा फोटो टाक
मला मेथीची भाजी खूप आवडते ..