मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्द

विश्वव्यापी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार , शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार शब्दांनी केले शब्दांना साकार , शब्दांनीच दिला शब्दांना आकार शब्दांची घरटी , शब्दांचा संसार , शब्दांनीच केला शब्दांचा संहार शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी.. कधी शब्दांची कोटी शब्दांचा आभास , निश्वास शब्दांचा , शब्दांचेच प्रेम , दुस्वास शब्दांचा शब्दांनीच घातल्या आहेत टोप्या शब्दांना ,शब्दांचीच मात्रा लागू पडली शब्दांना शब्दांनीच केले आहेत शब्द व्यक्त ,शब्दांचेच मींधे आहेत शब्द अव्यक्त भ्रम शब्दांचा शब्दांची माया , शब्दांनीच पालटते शब्दांची काया शब्द गोड नी कटू शब्द ,शब्द खरे नी खोटे शब्द शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची ! शब्द ..पुढे , शब्द मध्ये नी मागे ... शब्द

वाचन 3594 प्रतिक्रिया 20