Skip to main content

सोशल नेटवर्किंग (भाग ५)

लेखक लाडू. यांनी सोमवार, 11/01/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मयंक poptates मध्ये बराच वेळ बसून होता. अनघा अजूनही आली नव्हती. तो तिची वाट पाहत होता असही नाही. त्याला खर तर शांतता हवी होती. पण अनघा काय सांगते याचीही उत्सुकता होती. अनघा आली तीच मोठ्या उत्साहात. ती नेहमीप्रमाणे आल्याआल्याच चालू झाली असती पण मयंकच्या रडवेल्या चेहऱ्यावरूनच कळत होत कि काहीतरी बिनसलंय. मयंक शून्यात हरवला होता. ती त्याच्यासमोर खुर्ची ओढून बसली तरी मयंकला कळलेच नाही. शेवटी तिने मयंकला हलवून विचारले कि काय झालंय. काही नाही असे म्हणत मयंक मेनू कार्ड मध्ये बघू लागला. अनघाला आता स्वतःच्या आणि मल्हारच्या प्रकरणापेक्षा मयंकला काय झालंय हे कळून घेण्यात जास्त इंटरेस्ट वाटू लागला.

अन् मी झाडावर न चढण्याचा संकल्प सोडला.

लेखक धुरंधर यांनी सोमवार, 11/01/2016 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
तसं मला झाडावर चढायला लय आवडतं. म्हणजे कसं समजा कालेजात जातांन्ना सोबत्या बोल्ला की, ती पोट्टी बघ तुह्याकडे पायतीय तरं मी लगेच पटकण झाडावर.... मग पायणारचं ना भाऊ मी दिसतोच तसा ह्यँन्डसम, पाय तु तिला दोनच दिवसात पटावतो का नाही ते! आणि तिसरा दिवस उजाडता-उजाडता मी झाडाच्या खाली आणि तो सोबत्या मला खिजावण्याच्या नादांत झाडावर पायतो तव्हा पण लगेच आपलं उत्तर तय्यार आसतं. आरे ती आपल्याला परवडणार आहे का.. तिचा किती खर्च रायतो दिवसाचा ... (मग हळूच खिशात हात घालून चिल्लर आहे का नाही ते पाहत) ते बी करू रे आपून पण ती लयच लफडेखोर आहे असं म्हणत्या.

20 लाख स्वाहाः, एक रुमाल अन मुर्तिमंत भीती.

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी रविवार, 10/01/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आजवर जगातली सगळ्यात यशस्वी गुन्हेगारी संघटना कुठली ? असे जर कोणी आपल्याला विचारले तर आपला साहजिक कल कुठे जाईल ? एकतर महाशक्तिशाली असा अन शेकडो खून पाडलेला असा एखादा रशियन माफ़िया? सिसिलियन अप्रवासी लोकांच्या बनलेल्या गँग्स ऑफ़ न्यूयॉर्क? वेस्टकोस्ट अमेरिका मधला हिस्पॅनिक माफिया ?, मॅक्सिकन कोलंबियन ड्रग कार्टेल्स?, निंजा परंपरांतुन आलेला जपानी गुन्हेगारी गट, का धर्म अन क्रिकेट बेटिंग अन अमली पदार्थांच्या अभद्र युती मधुन जन्माला आलेली भारतीय अंडरवर्ल्ड??

लेटराचं लव्ह

लेखक धुरंधर यांनी रविवार, 10/01/2016 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय...... आजपर्यंत तुझ्यावर भरपूर लिहलयं..... पण आज फक्त तुझ्यासाठी लिहतो आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अस वळण येतं जेव्हा माणूस सारी शुद्ध हरवून, दुनियेचं भान विसरून प्रेमात पडतो, तसच माझ्याही आयुष्यातील एका वळणावर एका सुंदर क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्या प्रत्येक कृतीन मनाला वेडचं लावलं आणि माझ्या जिवनातील सारे क्षण सुवर्णमय होउन गेले.तुला फक्त एकदा पाहता यावं म्हणून तासन् - तास तुझी वाट पाहत त्या निर्जिव बसस्टॉपवर घालवलेत. वेडेपणाच्या कित्येक हद्दी मी या प्रेमात ओलांडल्या...मला माझं जग तुझ्यात दिसू लागलं .

खडक

लेखक gsjendra यांनी रविवार, 10/01/2016 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
खडकात काही मोहवणारं ? कदापि नाही खडकात काही लूभावणारं ? मूळीच नाही खडक राकट काळा कभिन्न काष्ठ कठोर पण खडकातलं पाणी असतं गोड खडकातलं पाणी असतं कायम काही माणसं अशीच असतात खडकासारखी
काव्यरस

(a^2 + b^2) =???

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 10/01/2016 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक कोडं सुचलंय. खरंतर अकरावीलाच सुचलं होतं आणि तेव्हाच सोडवलं होतं. पहा तुम्हाला जमतयं का? जर (a चा वर्ग - b चा वर्ग) =(a+b)(a-b) असा होतो तर (a चा वर्ग + b चा वर्ग) =??? कसा कराल? its pure mathematics & may be little bit logic . nothing else.

खडक

लेखक gsjendra यांनी रविवार, 10/01/2016 12:52 या दिवशी प्रकाशित केले.

खडक

लेखक gsjendra यांनी रविवार, 10/01/2016 12:52 या दिवशी प्रकाशित केले.