Skip to main content

थँक यू मिस्टर ड्रॅगन – ४

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 21/01/2016 22:28 या दिवशी प्रकाशित केले.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – ४

1 एकही गोळी न झाडता तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवला, तर तो जास्त महत्त्वाचा असतो. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्या तेथील बदलत्या जनमताची साक्ष देणाऱ्या आहेत. ‘आम्ही आमच्या भूमीवरून कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही, हा पाकचा बचाव देशाची मान खाली घालायला लावणारा आहे. पाकनी आपली विश्वासार्हता पूर्णतः गमावलेली आहे.

'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 21/01/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
धागा शीर्षकातील 'सर्व'-समावेशक हा शब्द सर्व बॅकग्राऊंडचे -कोणत्याही जाती-धर्म-वंशाचे- लोक एकत्र सहभागी होऊ शकतील या अर्थाने वापरला आहे, (सेक्युलर हा शब्द फारच बदनाम झाल्यामुळे तो शब्द टाळला). जसे की वाढदिवस आहे वाढदिवसास निमंत्रितांवर जाती धर्माची पुटे राहत नाहीत. (पंतप्रधान मोदीतर आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीसाठी वाढदिवसाची वेळ वाअरून घेतात) नवीन वर्षाची सुरवात साजरे करणे (जगातल्या कोणत्याही कॅलेंडर नुसार) वस्तुतः निधर्मी असावे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे सण सुद्धा निधर्मी असतात. फ्रेंडशीप डे सारखी कल्पना सुद्धा एक चांगली कल्पना आहे.

ड्वोरॅक आराखडा

लेखक अभिनव यांनी गुरुवार, 21/01/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
टंकलेखन यंत्र अस्तित्वात आले तेव्हा सुरुवातीला त्यांच्यावर ईंग्रजी अक्षरांची मांडणी अक्षरानुक्रमे होती. सर्वात वरच्या ओळीत A, B, C, D या प्रमाणे. यांत्रीक टंकलेखन यंत्रात ज्या पट्ट्या कागदावर आपटून अक्षरे उमटतात त्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण या सोप्या आराखड्यात खूप होते. या वर उपाय म्हणून क्वर्टी आराखडा प्रचलीत झाला. यात सर्वात वरच्या ओळीत सुरुवातीचे ईंग्रजी अक्षरं Q,W,E,R,T,Y असे येतात म्हणून याचे नाव QWERTY KEYBOARD. यात पट्ट्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण त्यामानाने बरेच कमी‌ झाले.

संस्कृती आणि धर्म यातील गल्लत

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 21/01/2016 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारपणे संस्कृती आणि धर्म यांची बेमालुम सरमिसळ दैनंदिन मानवी व्यवहारात एवढी सवयीची झालेली असते की वस्तुतः संस्कृती आणि धर्म या बाबी भिन्न असू शकतात याकडेच मुळी दुर्लक्ष होऊ शकते. संस्कृती आणि धर्म हे एकमेकांवर प्रभाव पाडत असतात ते सहाजिक असते. धर्मसंस्था संस्कृतीतील त्यांना वाटणार्‍या काही सांस्कृतीक गोष्टी त्याज्य ठरवते काही नव्याने जोडते उर्वरीत संस्कृती जशीच्या तशी स्विकारली जाते. उर्वरीत संस्कृती जिचा धार्मीक तत्वाशी प्रत्यक्षतः संबंध नाही तरी सुद्धा ती त्या धर्माची ओळख आहे असा भास निर्माण होऊ शकतो.

मोसाद - भाग ५

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 21/01/2016 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग ४ मोसाद - भाग ५ मे १९६०, ब्युनोस आयर्स, अर्जेन्टिना. मोसादने आइकमनचं ११ मे या दिवशी अपहरण केलं आणि त्याला ब्युनोस आयर्स एअरपोर्टच्या जवळ असलेल्या एका बंगल्यात ठेवलं. या बंगल्यात आइकमनकडून इतर फरारी नाझी युद्धगुन्हेगारांबद्दल जेवढी मिळवता येईल तेवढी माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू होता.

इंपॉसिबल मेलडी : ओपी !

लेखक विवेक ठाकूर यांनी बुधवार, 20/01/2016 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज ओपींचा वाढदिवस. लता मंगेशकरसारख्या स्वरसाम्राज्ञीच्या उपेक्षेवर बेदिक्कत मात करत स्वतःची संपूर्ण कारकिर्द घडवणारा हा एकमेव संगीतकार. `आय एम म्युझिक इल्लीटरेट' असं मनमोकळेपणानं कबूल करून, शास्त्रीय संगीताचं कोणतंही शिक्षण नसतांना केवळ स्वतःच्या स्वरसौंदर्याच्या आकलनावर, एकसोएक बंदिशी बांधणारा हा अवलीया रसिकांना कायम मोहवत आला आहे. कोणत्याही चांगल्या स्वर रचनेचे केवळ तीन घटक असतात, क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी. क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी हे सारखेच वाटणारे घटक दोन प्रकारे व्यक्त होतात, एक म्हणजे, दोन स्वरांमधलं अंतर आणि दुसरं, त्या अंतरामुळे ऐकू येण्यातली सुस्पष्टता.

अपरिचित अदगाव बीच

लेखक योगेश आलेकरी यांनी बुधवार, 20/01/2016 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
अपरिचित अदगाव बीच. मनुष्याला पर्यटनाची हौस भारी !! अलीकडच्या काळात माणसाचा मानसिक त्रास वाढला व त्याला अनुसरून पर्यटन पण वाढले . पण आपण पर्यटनावर का निघतो ??रोजच्या धावपळीतून, सिमेंटच्या जंगलातून , बजबजपुरीतून , गर्दीतून बाहेर पडून शांततेचे एकांताचे क्षण शोधायलाच ना ? पण आपण जातो तिथे तर एवढे पर्यटन जोमात असते कि वाटते गाड्या आपली ती मुंबापुरी बरी !!! ;) त्यावर उपाय म्हणजे अलीकडेच बहरास येत असलेले ग्रामीण पर्यटन, काही अपरिचित किनारे, दुर्गम भागातील गडकिल्ल्यांच्या पायथ्याची खेडी हे चांगले पर्याय ठरू शकतात.

सायकल स्वारी - खरोसा लेणी

लेखक अरिंजय यांनी बुधवार, 20/01/2016 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या यशस्वी फेरी नंतर दुसरी थोडी लांब फेरी मारायचा विचार चालु केला. त्या दृष्टीने जवळपासची जाण्यायोग्य ठिकाणांची चाचपणी सुरु केली. थोडीफार शोधाशोध करुन 'खरोसा लेणी' हे ठिकाण निश्चीत केले. लातूर पासुन ४० किमी खरोसा व तिथुन २.५ किमी डोंगरावर लेणी असे जाऊन येऊन एकुण ८५ किमी अंतर भरत होते. माझ्या अनुभवाच्या मानाने हे जरा जास्तच होत होते पण, "जे होईल ते होईल आपण करुच" असा विचार केला. फक्त कधी जायचे ते ठरवले नव्हते. दरम्यान सराव चालूच होता. रोज १५ किमी फेरी नियमीतपणे चालू ठेवली. सायकलच्या सीटची उंची वाढवून घेतली. माझ्या उंचीनुसार करुन घेण्यासाठी जवळपास ३ इंच उंच करावी लागली.

कळसुबाई शिखर

लेखक जगप्रवासी यांनी बुधवार, 20/01/2016 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या विकटगडाचा चांगला अनुभव आल्यामुळे शिवशौर्य ग्रुप सोबत हरिहर गड आणि कळसुबाई ट्रेक करायचा नक्की केलं. ऑनलाईन पैसे भरून नोंदणी करून ट्रेक च्या दिवसाची वाट पाहत होतो, काय काय घ्यावे ह्याची पूर्ण लिस्ट साईट वर दिलेली असताना पण पहिलाच "स्टे ट्रेक" असल्यामुळे अतिउत्साहात जास्त वस्तू ब्यागेत भरल्या. ठरल्या दिवशी संध्याकाळी बस मध्ये बसून हरिहर गडाला जायला निघालो. बस मध्ये काही ओळखीचे चेहरे दिसले त्यांच्यासोबत गेल्या ट्रेक च्या आठवणी निघाल्या. नाशिकच्या मुंबई नाक्यावर ट्रेक लीडर योगेश शिरसाट बस मध्ये चढला, सोबत अजून एक दोघे होते.