Skip to main content

एक होते झुरळ

लेखक खालीमुंडी पाताळधुंडी यांनी बुधवार, 24/02/2016 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
एक होते झुरळ,चालत नव्हते सरळ चालता चालता पडले,गाडीत जाऊन बसले तिकिट नाही काढले,कंडक्टरने विचारले तू बाळ कोणाचा,मी बाळ आईचा आई कुठं गेली कामाला,भूक लागली पोटाला

वीस रुपियानी बे सांडश्या ( घिसाडी ) ( मराठी भाषा दिन २०१६)

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 24/02/2016 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
चिच्च्या वीस रुपियानी बे सांडश्या करीन राख. गिर्‍हाईक दुपारी आवशे. सुक्कीने मुलाला साम्गितले. हमणा तर जाळ पेटाड्यो. ईमा तु हवा मार. मग रुडो जाळ थशे. एकदा जाळ पेट्यो की मग लोखंड टाक. उप्परती जोरमा मार. नीट धर रे. सांडश्यो आगळथी चप्पटी पायजे. लोकोन हातमा सांडश्यो धरवा गोल करजे. चिच्च्या ने जाण पेटवला. सुक्की भाता हलवून कोळसे फुलवू लागली. ए सुक्क्ये . तीन चोरीली सळ्ळी क्या राखी सं? काले हितं हती सळ्ळी कुठे गयी? नीट जो की रे..... तारा मागेच पडी सं. डोळा फुट्या का रे तारा? का सवारे सवारे भाड झोकीने आयो? नीट काम कर आन पैसो मळाव. घरमा धान लाव आन पसं जे करवु व्हय ते कर.

ढग, पाउस, आठवणी आणि भावना यांच्यात काही नाते आहे का?

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 24/02/2016 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगाबादला सकाळपासूनच आभाळात काळसर ढगांची गर्दी झालीये... बऱ्याच दिवसांनी कम्प्युटरवर काम करत असताना खिडकी बाहेर दुपारच्या ३ वाजताही अगदी संथपणे वाहणाऱ्या थंड वाऱ्यावर झुलणारी नारळाची पाने खूपच सुखद वाटली.

साप भी मर गयो.....(नगरी) (मराठी भाषा दिन २०१६ )

लेखक पियुशा यांनी बुधवार, 24/02/2016 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
हंम्म.... मी तर तशी जात नै बर का कुठ परस्पर, घरी फोन लावून सांगत असत्ये मम्मीला कि मी इकडे चालले बर का, तिकडे चालले बर का , मंग मम्मी म्हणती ठीकय,पण वेळेत घरी यावा लेकीच्या जातीनी ,मंग मी म्हणत्ये हम्म येईन ग मम्ये मी काय लहान नै आता . एकदा अस झाल तेवा मी ११विला होते बर का, न बड्डे होता एका मैत्रिणीचा !

हमारी अधूरी कहानी / एक अर्धवट परन्तु (औरंगाबादचा) यशस्वी कट्टा.............

लेखक बाबा योगिराज यांनी बुधवार, 24/02/2016 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी श्री अत्रन्गि पाउस यांचा धागा आला, “२२ तारखेला औरंगाबाद मध्ये आहे .... संध्याकाळी साधारण ४-७ वेळ मोकळा आहे ...एखादा छोटा कट्टा होऊ शकेल किंवा कसे ?” मी स्वगत, क्या बात. मज्जा. प्रतिसाद दिला, आमंत्रण दिल. सोबत प्राडॉ. यांच पण आमंत्रण होत. मी खुश. मग प्राडॉ. यांनी भ्रमणध्वनि वर मला आणि अत्रन्गि पाउस याना बोलून साधारण रूपरेषा ठरवली. संध्याकाळी अत्रन्गि पाउस यांच्या मोकळ्या वेळेनुसार भेटायचे आणि बीबी-का-मकबरा आणि पानचक्की ह्या दोन ठिकाणी जायचे असे ठरले. होता होता कट्ट्याचा दिवस उजाडला.

बिलिंदर राणी

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 24/02/2016 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
लेक लेकीची बिलिंदर राणी पंधरा दिवसाची छकुली शोभते सर्वांची नानी. मोठे-मोठे डोळे तिचे पोपटासारखे नाक हिमाचली चेहरा तिचा गोरे गोरे गाल. सकाळी सकाळी गोड-गोड झोपते आपल्या नानाला किसी किसी देते. आत्या म्हणते गुडीया प्यारी मावशी म्हणते बाळ गुणी. शेजारी म्हणती किती-किती शांत लोभस गोंडस पटाईतांची नात. डिप्लोमेट राणी गालात हसते सर्वांना अशी मूर्ख बनविते . रात्र झाली कि खरे दात दाखविते आईला आपल्या रातभर जागविते . कुशीत नानीच्या घरभर फिरते जरा थांबता टाहो फोडते. मला पाहून ती डोळा मारते माय लेकींची कशी जिरवली. लबाड आमची बिलिंदर राणी नानांची तिची गट्टी जमली.

आठवणी

लेखक मीनादि यांनी बुधवार, 24/02/2016 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींचा भार ना हलका होई कुणाचा, आयुष्य जगताना जरा विसर पडे त्याचा . कधी ना पुसे ठसे आठवांचे, ते आहेतच ऋणानुबंध गतजन्माचे. कधी हासू , कधी आसू तरीही हव्याहव्याश्या वाटणाऱ्या, नकळत न सांगता क्षणक्षणाला जोडणाऱ्या नसत्या जर ह्या आठवणी तर काय असते आयुष्यात, आहे अनमोल ठेवा हाच प्रत्येकाच्या प्रारब्धात.
काव्यरस

बेण आणि मी - एक ओळख.

लेखक भरत्_पलुसकर यांनी बुधवार, 24/02/2016 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
तर का मंडळी आमच्या हापिसात बेन हाय एक. ते का नाय जवा बगाव तेवा स्क्रीनला डोळे लावून बसतय अन खी खी खु खु करत असतंय. मायला म्हणलं आपून तर कटाळतो अर्धा तास एका जागेव बसून अन हे बेन कशापायी आनंदात असतंय. एक दिवस म्या हुभा ऱ्हायलो तेच्या मागं. बगत हुतो बेन काय करतंय. तर हे एक पान सरसर वरखाली करून उगा बघितल्यावानी केला आणि पुना डायरेक खाली जाउन थांबला. म्या म्हणलं काय हुतं ते बगू बी दिना. खाली येउन ते बेन हातातल्या पेनाला तोंडात धरलं अन उगा इचारात पडल्यावानी झाला. मंग एकदाचा त्यानं पेन तोंडातन भायेर काढला अन हातानं कीबोर्ड बडवाय घितला. "छान!

ये ग गाई गोठ्यामध्ये

लेखक खालीमुंडी पाताळधुंडी यांनी बुधवार, 24/02/2016 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
ये ग गाई गोठ्यामध्ये,बाळाला दूध दे वाटीमध्ये बाळाची वाटी,मांजर चाटी मांजर गेले रागाने,त्याला खाल्ले वाघाने वाघमामा गुरगुरतो,अस्वल मामी पोळ्या करते एक पोळी करपली,दूधासंगे वरपली दूध झाले कडू,बाळाला आले रडू

हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले कि..

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 24/02/2016 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले की स्मृतीतला गाव दिसू लागतो त्या गाव वेशी उभा मीच मजला पाहून अनोळखी हसू लागतो दशकान्तुनी उभ्या तिथल्या विक्राळ वटाच्या सावलीत जरासा बसू पाहतो स्मरणे ती जुनी अन बदलांच्या खुणा उद्विग्न नास्तिकासम तपासू पाहतो. पोपटी तृणांचा जुन्हा तो जिव्हाळा बदलाच्या भ्रांती फसू लागतो लोभस ते जग कधीचे संपले खरा भावनांचा उन्हाळा पुन्हा दिसू लागतो.. (कविता अपूर्णच आहे. अकरावीत असताना केव्हातरी लिहिली होती. बऱ्याच वेळा पूर्ण करण्याच्या प्रयत्न केला पण हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात तो इतका भव्य वाटणारा पण आशयाने जवळपास शुन्य होता कि ते कधीच जमले नाही.
काव्यरस