कॉम्प्युटर/ व्हिडीओ गेम्स.....भाग १ (मारीयो)
१९९० च्या दशकात जन्म झालेल्या लोकांना मी नशीबवान समजतो. कारण या अगोदरच्या पिढीतल्या लोकांना मोबाईल, काँप्युटर थोडेसे उशीरा मिळाले. त्यामुळे ते लोक मोबाईल, संगणक( हाच शब्द सोपा आहे टाईप करायला ;) ) वगैरे वापरायला तितकेसे उत्साही नसतात. २००० नंतरच्या पिढीला जन्मापासुनच मोबाईल वगैरे वापरायला मिळतो त्यामुळे इतर मैदानी खेळाला वगैरे ही पिढी तितकीसी उत्साही नसते. पण ही जी ९० च्या दशकातली पिढी आहे ना त्यांनी शिवणा-पाणी , विष-अम्रुत, लपंडाव हे ज्या उत्साहाने खेळले त्याच उत्साहाने मारीयो, कॉन्ट्रा , SD fighter , vice city खेळले.
चला तर मग आमच्या पिढीने खेळलेले काही क्लासीक गेम्स पाहुया...
कलिंगडाचे धोडक
उन्हाची झळ बसायला सुरुवात झाली की गारम गार काय काय खाता येईल ह्याचा विचार सतत चालू असतो. खादाडीची आवड असणाऱ्यांचा (माझ्यासारख्यांचा) जरा जास्तच.
त्यातलेच एक सर्वांचेच प्रिय कलिंगड. बाजारात गेल्यावर जड कलिंगड वाहून आणल्यावर ते कधी एकदा कापून मस्त गार करून खातो/ते असे प्रत्येकालाच होत असते. खर्र की नाही? पण मग त्याचा तो जाड जाड सालींचा पसारा उचलून टाकताना अर्धे पैसे वाया गेले म्हणून वाईट वाटत असेल तर आता मी त्यावर एक उपाय सांगते जो तुम्हाला नक्की आवडेल.
१. किसणी घेऊन त्या सालींचा सगळा पांढरा गर किसून घ्या.
२.
चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)
काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :(
हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले!
शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :(
बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना!
म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण!
हिवाळ्यातला लदाख - विमानातून दिसणारा महा-हिमालय (समाप्त)
हिवाळ्यातला लदाख - विमानातून दिसणारा महा-हिमालय (समाप्त)
मागील पानावरून ............ तेथून परत मुख्य रस्त्यावरती आलो. तेथून टैक्सी पडून दहा रुपयात मेन चौकात आलो. नंतर रस्ता पार करून चोगलमसर ला जाणारी टैक्सी पकडली आणि जेल पर्यंत यायला अजून पंधरा रुपये लागले. दिल्ली वरून निघताना एक मुंबई वरून फोन आला होता कि, येताना सिन्धु नदीचं पाणी घेऊन ये म्हणून. माज्याकडे अजून खूप वेळ होता. बाटली घेतली आणि सिंधू घाटावर पोहोचलो. चार दिवस झाले लेह फिरतोय. तेच तेच नजारे बघून आता वैताग आला होता. कधी घरी जातोय असे झाले होते.
झब्बूशाहची पोरगी - खलिल जिब्रान
झब्बूशाहची पोरगी - खलील जिब्रान
सिंहासनावर झोपलेल्या म्हातार्या राणीच्या आजूबाजूस चार गुलाम पंखा हलवत होते.
गेले प्यायचे राहूनी..
गेले प्यायचे राहूनी
ते.. पहिल्या धारेचे देणे
माझ्या पास कालच्या विड्या
आणि थोडे बॉइल शेंगदाणे
आलो होतो रांगत मी
काही थेंबांसाठी फक्त
रात्रीचे-ओझे आता
कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त
आता पिऊन घेऊ रगड
राहू कण्हत कशाला!?
होते जगण्याचे निर्माल्य
नाही, तर.. फिरतो बोळा!
सहप्रवासी
ट्रेनच्या स्लीपर कोचमधून कुठेही जायचं झालं की माझा उत्साह जागा होतो. मला असा प्रवास आवडतो. नवीन अनोळखी माणसं आपल्यासोबत एक दिवस आणि अर्धी रात्र किंवा अर्धा दिवस आणि अख्खी रात्र काढतात. अर्थात् दिवस किती आणि रात्र किती हे आपण कुठून कुठे चाललोय त्यावर अवलंबून असतं म्हणा.
तर या प्रवासात आपल्याला नवे चेहरे दिसतात. काही चांगले काही सामान्य काही वाईट काही अतिवाईट.
गुंतण
आणि अचानक तो बिलोरी आरसा हाती लागला
पुरातन पण जादुई, अगदी परीकथेतल्या सारखा
यौवनाच्या मंतरलेल्या दिवसात स्वप्नात भेटलेला
आज माझ्या हातात हसत अलगद विसावलेला
थरथरत्या हातानी, साशंक मनानी समोर धरला
आणि माझच एक आगळं रूपडं आलं भेटीला
अगदी नितळ, प्रफुल्लित, अन् आकंठ तृप्तता
धडधडत्या उराशी त्याला गच्च कवटाळला
हळूहळू त्यावरही काळाची काळी पुट चढू लागली
तर पारा उडू नये म्हणून इकडे माझी वेडी काळजी
त्यातल्या रुपड्यात कुठेशी उदासीची छटा दिसली
तर माझीच नजर अंधूक, अशी समजूत काढली
असं त्या आरश्यात गुंतण आता जड जातय
दिवसरात्र जीवाची तडफड आता असह्य होतेय
ते रुपड का तो आसरा प्रिय, हा पडलाय प्रश्न
उत्तराची सा
मिसळपाव