Skip to main content

सविता कोर्कू... भाग - २ शेवटचा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 09/05/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
सविता कोर्कू... भाग - १ दुसरा लिहून झालाय आत्ताच. म्हणून लगेचच टाकला आहे... :-) ....‘‘देशमुख, मी म्हणतो तुम्ही कशाला असल्या मित्रांच्या नादी लागता ? तुमच्या गावात शेतीवाडी असेल ना ? ती कसा, सुखात रहा. या अशा वागण्यात तुमचे काही भले नाही...!’’ त्याच्या नजरेत काहीतरी वेगळीच चमक दिसली मला. तो एकदम म्हणाला, ‘काका मी फौजेत भरती होणार बस्स !’’ असे म्हणून तो उठला आणि एकदम चालू लागला...... थोड्याच वेळात सविता आली. मी तिला काय घडले ते सांगितले. ‘‘जाऊ दे काका !’’ ती म्हणाली..

सैराट

लेखक समीर_happy go lucky यांनी सोमवार, 09/05/2016 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळत नाही यासम सूर आपण बरेचदा बघतो आणि तो खराही असल्याचे तिकीट काढताना बरेचदा अनुभवतो पण बरेच काळानंतर किंबहुना काही वर्षानंतर एक असा मराठी सिनेमा आलेला आहे जो रिलीज होण्याच्या ९ दिवसानंतरही त्याचे तिकीट मिळत नाहीये. अक्षरश: प्रचंड लोकाश्रय सर्व वयोगटातून मिळालेला एक मराठी सिनेमा. बजरंगी भाईजान नंतर कोणत्याही सिनेमाचे तिकीट मिळण्यासाठी इतकी ईर्ष्या पहिल्यांदा अनुभवली लेख लिहिणार्याने आणि मराठीसाठी तर पहिल्यांदाच.

शृंगार १३

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 09/05/2016 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-याला काही शिकवणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे स्वतः दोनदा शिकणे अस म्हणतात . याचाच प्रत्यय यायला लागला होता . मलाही आता त्या सामाजिक कोप-याची गरज भासू लागली होती . याची सुरूवात सोसायटीमधून करायच ठरवल . ज्यांची थोडीफार तोंडओळख होती त्यांना जाता-येता स्माईल द्यायला सुरूवात केली . हळूहळू त्याला प्रतिउत्तरही मिळू लागल . ज्या लोकांशी थोडस बोलत होतो त्यांच्याशी संवाद थोडा वाढवला . सुरूवातीला बोलायला काही विषयच नाही सुचायचा पण अगदी जनरल टॉपिक पासून सुरूवात करून मग हळूहळू टॉपिक मिळू लागले . जितके वाटतात तितके लोक रूक्ष अबोल नसतात . फक्त एका स्टार्टरची गरज असते त्यांना .

श्वानांचे प्रेम

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 09/05/2016 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
तस पाहिलं तर कुत्रा या प्राण्याबद्दल मला फारस कधी प्रेम नव्हत . पण या प्राण्याला माझ्याबद्दल नेहमी प्रेम वाटत आलेले आहे . पूर्वी अगदी फार भुंकणारे कुत्रेहि मला भुंकत नसत . याच कारण काही माहित नाही . पण बहुधा माझा अंधविश्वास याला कारणीभूत असावा असे वाटते . मला असे वाटायचे कि आपण जीन्स घातली असल्यामुळे त्याचे दात काही या जीन्सला पार करून आपल्यापर्यंत पाहोचणार नाहीत व फक्त आपण हात वर केला तरी तो आपल्या हाताला चावू शकणार नाही . त्यावेळी मित्र परिचित नातेवाईक यांच्याकडच्या कुत्र्यांनाही फार प्रेम व्यक्त करूस वाटायचं .

सैराट - याड लागलं!

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 09/05/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
'सैराट'वर सध्या बरीच चर्चा होतेय. माझे मत नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून हा लेख-प्रपंच! आता हा विषय चघळून कंटाळा आला असल्यास क्षमस्व. लेख उडवला तरी नो हरकत! काल 'सैराट' पाहिला. काही लोकांकडून अफाट स्तुती ऐकली होती तर काहींनी बेक्कार नाके मुरडली होती. अतिशय टोकाची मते 'सैराट'विषयी ऐकायला मिळत होती. 'सैराट'ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सगळे विक्रम मोडले असं ऐकलं होतं. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात जोरात चालू आहे. इतकंच नव्हे तर अमेरिकेतदेखील काही चित्रपटगृहात 'सैराट' प्रदर्शित झालेला आहे आणि तुफान गर्दी खेचतो आहे असे दिसते.

आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 09/05/2016 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही.

आखाजीना सन

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/05/2016 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
खान्देशी लेकी आखाजीच्या सणाला माहेराला येतात अन काय गीत म्हणतात पहा - नदीनं पानी वाहे झुळूझुळू वाहे झुळूझुळू चला त्यानामा आंगूळ करू आंगूळ करू माहेरवास्नी सार्‍या उनात उनात ( उनात = आल्यात) झोका टांगेल शे दारात आंबानं पान हिरवंगार झोका जावूदे जोरदार गवराई चला ग मांडूया पुजा तिची करूया आखाजीना सन शे माहेराला बरकत दे माय वं माय वं तुन्ह्या लेकीस्ले सासर मधार सुख दे (अहीराणी भाषेवर एवढी हुकूमत नसल्याने चुकभूल द्या घ्या) - पाभे
काव्यरस

आखाजीचा सण

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/05/2016 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
गवराईचा सन आला गवराईचा सन आला या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्‍या या झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला पानोपानी त्याच्या आता कैर्‍या लगडल्या कैरी हाले कैरी डुले वार्‍यासंगे मागेपुढे हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही - पाभे
काव्यरस

समरस व्हावे ऐसे

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 09/05/2016 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
थांबल्या पळी या प्रेमाच्या क्षण एक तू डोळ्यांत पहा कृत्रीमतेचा उतरवून साज रेशमी मिठीत सजून पहा दे शब्दांना आधार तुझ्या गंधीत मौनाच्या साथीचा दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे थरथरत्या हळव्या अधरांचा शीतल छाया, मी घनदाट तरू तू वळणारी खळखळ सरिता मी एक डोलता प्राण अचल तुज पाहून, अविचल वाहता मी धागा अतूट प्रितीचा तू फूल एक नाजूकसे गुंफता प्रित, गुंतता हृदय प्रेममाला सुरेख शोभतसे परिणीती, धुंद श्वासांची लयदार काव्यात व्हावी सूर जुळता ही तमवसने कोमल स्वरात न्हावी मी स्वत:स विसरून जावे तू असे मला निरखावे डोळ्यांनी तन्मयतेने मग युगल गीत गावे संकोच मनी, भारल्या क्षणी ना स्पर्शे उभय चित्तांशी तू अवघी तुल

सविता कोर्कू... भाग - १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 09/05/2016 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
सविता कोर्कू मी कर्नल जगदाळे. कर्नल विजय जगदाळे. (निवृत्त) मूळ गाव जामखेड. सध्या मु.पो. पुणे. एक घडलेली गोष्ट सांगतो. मरण्याआधी ती मला कुणालातरी सांगितलीच पाहिजे. कथा आहे एका मुलीची... असे काही शक्य नाही... असे तुम्ही म्हणालही कदाचित, पण असे घडले म्हणून ही कथा जन्माला आली हे लक्षात घ्या. शिवाय तुमचा यावर विश्वास बसतोय की नाही याने मला काहीही फरक पडत नाही. मला ती कुणालातरी सांगायची आहे बस्सऽऽऽ ! पहिली भेट. यावेळी माझी बदली पुण्याला झाली होती. ....या मुलीची आणि माझी पहिली भेट झाली ती एका चोरीच्या प्रकरणात. म्हणजे तिनेच चोरी केली होती व ती चोरी होती माझ्या मुलीच्या मनगटी घड्याळाची.