Skip to main content

कातरवेळ

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 26/05/2016 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळ,सूर्यास्तानंतर मिट्ट काळोख होईपर्यंतची ही वेळ, तशी जेमतेम पाऊण एक तासाची. पण ही वेळ कशी जीवघेणी असू शकते ह्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो. एकदा सुधागडला गेलो होतो. गडावर जायचा आजचा जो प्रचलित मार्ग आहे तो आहे पाच्छापुराहून. औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर शहेनशहाशी बगावत करून आला होता ते संभाजीराजांचे साह्य घेण्यासाठी तेव्हा राजांनी त्याच्या सोय गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एका लहानशा वाडीत केली होती. तेव्हापासून अकबराच्या छावणीमुळे ते ओळखलं जाऊ लागलं पाच्छापूर ह्या नावाने. आज ह्या मार्गावर एक भक्कमशी शिडी लावलीय. तेव्हा ती नव्हती. नाडसूरच्या एसटीने उतरलो ते धोडसे गावात.

फक्त लढ म्हणा !!

लेखक रमेश भिडे यांनी गुरुवार, 26/05/2016 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या पोरांची. ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत. . . आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती मध्ये पळताना दिसतात. ज्यांची B.Sc, M.Sc झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन शिकवतात.

लाकूडतोड्याची लोखंडी कुल्हाडी - कथेचा सार

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 26/05/2016 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
लाकुडतोड्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहित असेल. लाकुडतोड्याची कुल्हाडी पाण्यात पडली. लाकुडतोड्याने जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली. जलदेवता सोन्याची, चांदीची आणि लोखंडी कुल्हाडी घेऊन वर आले. लाकुडतोड्याने लोखंडी कुल्हाडी आपली म्हणून ओळखली. जल देवता प्रसन्न झाले, लोखंडी कुल्हाडी सोबत सोन्या आणि चांदीच्या कुल्हाडी हि त्याला दिल्या. काही दिवस आधी एका फेसबुक मित्राचा लेख वाचला होता. लेखाचा सार काहीसा असा होता - नीती कथा चतुर लोकांनी सामान्य लोकांना मूर्ख बनविण्यासाठी लिहिल्या आहे. सामान्य माणसांनी केवळ श्रम करावे आणि दाल-रोटी खाऊन गुजरा करावा.

समुद्र

लेखक विश्वेश यांनी गुरुवार, 26/05/2016 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा पूर्वी पायाशी येउन घोळणारा तो, आता उगाच कोरड्या झालेल्या मला भिजवेल अन निमूट माघारी वळणाऱ्या पायांना थिजवेल … एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा माझ्यावर सोडलेली त्याची ती जालीम लाट, उगाच आणलेले उसने आवसान जाताना पुसत जाणार अन घट्ट रुतलेल्या पायांचाही पुन्हा पुन्हा तोल ढासळणार एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा पसरला आहे मिट्ट काळोख चहूकडे, हल्ली सूर्याबरोबर बहुदा तो रात्रीचे तारेही गिळतो, अन दूरवर ते लाईट हाउस अन इथे मी दोघेच रात्रभर जळतो …. एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा - विश्वेश

सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : २ :

लेखक जगप्रवासी यांनी गुरुवार, 26/05/2016 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : १ : गड फिरून पूर्ण झाला आणि आता जायचं होत पांडवकालीन विमलेश्वर मंदिर.>>>>> https://lh3.googleusercontent.com/-CG28KLeKhH0/VxSaOUhd5jI/AAAAAAAAHgw/AxrBGi9aoEsOuDGNpjmaVfzHZ_gT0eYQgCCo/s640/IMG_6734.JPG विमलेश्वर मंदिराच्या परिसरात विरगळ एका बाजूला मांडून ठेवलेत पण सगळ्याच विरगळावर युद्ध

Doodhsagar - Where milk flows..

लेखक हृषिकेश पांडकर यांनी गुरुवार, 26/05/2016 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
अॅनिमेशनने ओतप्रोत भरलेला बाहुबली पाहण्याचा योग आला.सिनेमा आवडला,कथा तशी काल्पनिक असल्याने नक्कीच सुसह्य आहे.पात्रांची मांडणी आणि निवड योग्य वाटते.एकूण काय तर तीन तास निखळ मनोरंजन करण्याची क्षमता यामध्ये नक्कीच आहे.या तीन तासानंतर जेव्हा आपण थियेटरच्या बाहेर पडतो तेव्हा सर्वजण आपापल्या विचारानुरूप आठवणी घेवून तिथून बाहेर पडत असतात. या तीन तासाने मला काय दिले याचा हिशोब जमवत असताना सुरुवातीला दाखवलेला धबधबा आणि सर्वात शेवटी दाखविलेली लढाई या दोन गोष्टींना झुकते माप गेले.अर्थात दोन्ही गोष्टी ग्राफिक्सच्या सहाय्याने भव्य दाखविल्या आहेत यात शंका नाही.पण या गोष्टी ज्या प्रकारे समो

एक्सेल एक्सेल - भाग २ - एक्सेलची तोंडओळख

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 26/05/2016 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ सुरुवातीचे भाग कमी अंतराने टाकतो, कारण अगदीच बेसिक असल्याने विशेष मंथन करण्यासारखं त्यात काही नसेल, हे मी पहिल्या भागाचे प्रतिसाद वाचून गृहीत धरतोय. a

अनिला भाग 2

लेखक abhajoshi14 यांनी गुरुवार, 26/05/2016 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
अनिला भाग 1 - http://www.misalpav.com/node/36145 मग मावशी जरा बोलती झाली. हि सुशीला गोडसे. माझी शाळेतली खास मैत्रीण. आम्ही दोघी एकाच शाळेत एकाच बाकावर बसायचो. 9 वर्षे रोज एकत्र असायचो. तिचे आणि माझे घर पण तसे जवळ जवळ होते. एकाच पेठे मध्ये. आम्ही सगळे शनिवारातले ना .सगळ्यांनाच पुराचा फटका बसलेला. ह्यांच्या कुटुंबांला तर फारच मोठा धक्का होता तो. तिच्या आई बाबांनी शून्यातून परत संसार उभा केला, पदरात पाच मुले. घर राहिले नाही म्हणून दुकानातच आडोसा करून संसार मांडला. हि सर्वात मोठी. हिचे लग्न मात्र पुराच्या आधीच फार घाई गडबडीत झाले होते.

..आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 26/05/2016 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो. अन दु:खाला जगण्याचा अधीभार म्हणालो हाताने ती भरवीत होती घास कुणाला . तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो.

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०६

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 26/05/2016 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी ..