..आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो..
आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो.
अन दु:खाला जगण्याचा अधीभार म्हणालो
हाताने ती भरवीत होती घास कुणाला .
तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो.
तिने ठेवले खांद्यावर मस्तक विश्वासाने
साधा भोळा हा आपला शृंगार म्हणालो.
किती वेदना दाराजवळि दिसल्या घुटमळताना
होईल तुमचा छान इथे उपचार म्हणालो.
दु:ख म्हणाले निघताना "मज बरे वाटते"
गायब केला जुना तूझा आजार म्हणालो.
बदनामी जर यदाकदाचीत सत्य निघाली.
होईल माझा नक्की जयजयकार म्हणालो.
नियती देखील शस्त्र त्यागुनि हसुन परतली
दिसशी तू तर चतूर देखणी नार म्हणालो
स्वागत केले इथे तसेही सुमनांचे पण
काट्यांनाही मी माझा परीवार म्हणालो..
शत्रू येता कवटाळूनी मी त्याला तेव्हा..
मित्रा तू तर नवाच माझा यार म्हणालो..
मेघ गर्जवत संकट येता दाहीदिशांनी
होईल आता नक्की मुसळाधार म्हणालो.
नशीब येता घेऊन माझी हार कधी जर..
हार नव्हे हि,हा तर माझा सत्कार म्हणालो
पडलो उठलो रडलो हसलो इथे कितिदा!
निघतानाही आयुष्यास आभार म्हणालो..
------
कानडाऊ योगेशु
वाचने
2960
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
सुरेख!
In reply to सुरेख! by प्राची अश्विनी
धन्यवाद प्राचीतै!
मीटर गंडतंय जाम. बाकी भाव आवडले. ते उत्तम पकडतोस तू.
In reply to मीटर गंडतंय जाम. बाकी भाव by वेल्लाभट
वेल्लाभट,
मात्रावृत्तात लिहायचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक ओळीत २५ मात्रा आहेत.!
In reply to वेल्लाभट, by कानडाऊ योगेशु
हो...तसं जाणवलं पण गेयता कमी वाटली. बघतो पुन्हा.
अ प्र ति म ! अतिशय सुंदर रचना ! वाह, क्या बात कायो !
हाताने ती भरवीत होती घास कुणाला
तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो.
मस्तच !
In reply to अ प्र ति म ! अतिशय सुंदर by चौथा कोनाडा
धन्यवाद चौ.को!
कायो, मानरे नै मियां.
मस्त भेष्ट आवड्यास.
सुरेख!
सुंदर रचना!
पडलो उठलो रडलो हसलो इथे कितिदा!
निघतानाही आयुष्यास आभार म्हणालो..
खरे!
In reply to सुंदर रचना! by शिव कन्या
बरबादियों का जशन मनाता चला गया...
आवडली गझल. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद बाबा योगिराज,रातराणी,शिवकन्या आणि बिरूटेसर!
खूपच छान....!
"नियती देखील शस्त्र त्यागुनि हसुन परतली
दिसशी तू तर चतुर देखणी नार म्हणालो"
आम्हीही म्हणून पाहिले. पण नियती कानफटवून तरातरा पुढे गेली.
दिसता दारावरी वेदना घुटमळताना
'होइल तुमचा छान इथे उपचार' म्हणालो.
In reply to मीटरमध्ये by चलत मुसाफिर
योग्य बदल आहे च.मु साहेब. धन्यवाद.
सुरेख!