सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : १ :
गड फिरून पूर्ण झाला आणि आता जायचं होत पांडवकालीन विमलेश्वर मंदिर.>>>>>
विमलेश्वर मंदिराच्या परिसरात विरगळ एका बाजूला मांडून ठेवलेत पण सगळ्याच विरगळावर युद्धाचे देखावे कोरले नव्हते. काहींवर व्यक्ती तपश्चर्या (पूजा पाठ) करताना दाखवले होते. प्रचेतस यावर सविस्तर सांगू शकतील. जमीन शेणाने सारवलेली होती, परिसर साफ सुंदर होता. हे मंदिर कातळात कोरलेले आहे वरून रस्ता आहे ज्याच्यावरून गाड्यांची ये जा चालू असते. मंदिराच्या बाजूला सिमेंट मध्ये दोन हत्ती माहूतांसोबत बनवलेले आहेत.

माहूत
मंदिरात प्रवेश करतानाच गणपती बाप्पाची छान मूर्ती आहे, जुन्या काळातील घड्याळ आपल्याला देखील जुन्या काळात घेऊन जात. छताला बरीच वटवाघळ लटकलेली होती. उजव्या बाजूला शंकराची छान मूर्ती आहे. आत मध्ये गाभाऱ्यात शंकराची सुंदर पिंडी आहे. पुरेशा उजेडा अभावी फोटो नीट काढता आले नाहीत. थोडावेळ विश्रांती घेऊन देवगड किल्ल्याकडे निघालो.

शिवपिंडीवर ठेवलेली गणपतीची मुर्ती
विमलेश्वर मंदिर परिसर
देवगडकडे जाताना समुद्रकिनारी दिसलेले एक सुंदर मंदिर
देवगड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हापूस आंबा. प्राचिन काळापासून देवगड हे एक सुरक्षित बंदर म्हणूनही प्रसिध्द आहे. देवगड बंदराच्या तीन बाजूंनी असलेल्या डोंगरांमुळे तेथे नाले सारखा आकार तयार झाला आहे, त्यामुळे या भागात पावसाळ्यातही उंच लाटा तयार होत नाहीत. याच कारणासाठी शिवाजी महाराजांच्या काळात व आजही मालवण, वेंगुर्ला व आजूबाजूच्या बंदरातील बोटी पावसाळ्यात देवगड बंदरात नांगरल्या जातात.देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे. त्यामुळे त्याला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे.दोन बुरुजांच्या मध्ये लपवलेला मुख्य दरवाजा सहजा सहजी दिसत नाही. तटबंदीला लागून कातळात खंदक खोदलेले आहेत जेणेकरून शत्रूला सहजा सहजी किल्ल्यात प्रवेश मिळू नये. आत शिरल्यावर तटबंदीत हनुमानाची मूर्ती बसवलेली आहे. प्रवेशद्वारासमोर जिर्णोद्धार केलेले गणपतीचे मंदिर आहे, आम्ही दुपारी गेलो होतो तेव्हा मंदिर बंद होते. रखरखत्या उन्हातून तटबंदी वरून चालत दीपस्तंभाजवळ जात असताना चौकोनी बांधून काढलेली विहीर दिसली. त्यात पाणी नव्हते, पुढे चालत दीपस्तंभाला भेट देण्यासाठी परवानगी काढायला ग्रुप मधील एक मुलगा गेला. चौकीदारांनी परवानगी देऊन त्या दीपस्तंभाची माहिती दिली, ते कस काम करत, त्याचा प्रकाश किती दूर पर्यंत दिसतो वगैरे. पण इतक्या उंचावरून दिसणारा विलोभनीय समुद्र दिसत असताना त्या माहितीकडे मी लक्ष दिले नाही.
बुरुजांमध्ये लपलेला दरवाजा
चाळा देवस्थान
जीर्णोद्धारीत गणपती मंदिर
वास्तू
तटबंदी वरून चालताना
तटबंदीला लागून असलेल्या खंदकातील पाणी समुद्रात सोडण्यासाठी ठेवलेली जागा
चौकोनी विहीर आणि दूरवर गणपती मंदिर
जहाजांना अंधारात वाट दाखवणारा दिपस्तंभ
देवगड किल्ल्याला पोहोचण्याच्या वाटा:
१. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे शहर असल्यामुळे थेट एसटी सेवा तसेच स्वताच्या वाहनाने यायचे झाल्यास मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव वरून देवगड किल्ल्याला जाता येते.
२. रेल्वेने यायचे झाल्यास कोकण रेल्वे वरील नांदगाव येथे उतरावे, तिथून एसटीने किंवा सहा आसनी रिक्षाने किल्ल्यावर जाता येते.
किल्ल्यात पाण्याची सोय नाही, दीपस्तंभ जवळ असणाऱ्या शासकीय कार्यालयाजवळ पिण्याचे पाणी मिळते. देवगड मध्ये राहण्याची जेवणाची सोय होऊ शकते.
आता पोटातले कावळे हत्तीच रूप घेऊन नाचत होते मग जवळच असलेल्या एका घरगुती खानावळीत सुंदर अशा कोकणी जेवणावर आडवा हात मारला. जेवून झाल्यावर ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीच दर्शन घ्यायला गेलो. मुख्य वाटेवरून थोड खाली उतरून एका गुहेत ही समाधी आहे. वातावरण इतके शांत होते की आपण सुद्धा समाधीस्त व्हावे अशी इच्छा झाली यावर बायकोने "समाधी लागल्यावर घोरू नये" असा सल्ला दिला, मग समाधीचा विचार तूर्तास बाजूला ठेवून समाधीच दर्शन घेतलं. बाजूलाच शिवकालीन भुयारी मार्ग आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या शिवमंदिरातील विहिरीतून निघणारी चोरवाट येथे येउन संपते अशी वंदता आहे. खर खोट माहित नाही पण आता तो भुयारी मार्ग बंद केला आहे आणि सिधुदुर्ग किल्ल्यातील ती चोरवाट एका दगडाने बंद केली आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यातून बाहेर पडणारी चोरवाट येथे बाहेर पडते
ओझर येथील ब्रह्मानंद स्वामींची समाधी आणि चोरवाट
तिथून मग आमची वरात आमचा मुक्काम असलेल्या देवबाग गावाकडे निघाली. नारळी माडांच्या बागेत असलेल्या कौलारू घरात आजची रात्र काढणार होतो. गावाला नेहमी शेणाने सरावलेले अंगण पाहणाऱ्या मला वाळूच अंगण पाहून जाम मजा वाटली, मग काय लगेच कपडे बदलून छोट्या बच्चे कंपनी सोबत वाळूचे घर, किल्ला बनवायला लागलो. थोड्या वेळाने फ्रेश होऊन समुद्राची गाज ऐकत त्या वाळूत पाय रुतवून शांत बसलो तेवढ्यात चहापातीचा चहा आला. वाह साला स्वर्ग सुख म्हणजे अजून काय. वाळूत चहाचे घुटके घेत बायकोशी गप्पा मारणे आहाहाहा.
घराच्या अंगणातून दिसणारा नजारा
टुमदार कौलारू घर
रात्री जेवल्यावर जवळ असलेल्या बीचवर शतपावली करायला गेलो, चांदण्यात चमकणार समुद्राच पाणी आणि अनवाणी पायाला थंड स्पर्श करणाऱ्या वाळूने दिवसभराचा शिणवटा पळवून लावला. घरात आल्यावर झोपायच्या आधी नवीन असलेल्या सभासदांना संस्थेची आणि फिरणाऱ्या किल्ल्यांची थोडक्यात माहिती सांगितली. आणि संस्थेकडून आप्पा परब यांच सिंधुदुर्ग पुस्तक सर्वांना भेट म्हणून देण्यात आल.
रात्र गाजवली ती दीड वर्षाच्या अर्णवने, थोडी झोप लागली की हा सप्तसुरात रडायला सुरु करी. त्याला झोपवे पर्यंत रात्रीचे दोन वाजले. अर्धा तास झोप लागली तर लगेच याने परत रडून सर्वांना उठवलं. त्याच्या रडण्याच्या नादात सकाळचा अलार्म पण लवकर वाजल्यासारखा वाटला. उठल्यावर पटापट तयारी करून निघालो - आजच खास आकर्षण - स्कूबा डायविंग
क्रमशः
(अवांतर : फोटो जास्तच झालेत, पुढच्या वेळेला कमी टाकेन….)
वाचने
6009
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
झक्कास!
व्वा!!
फोटो छान आहेत.
+१
In reply to फोटो छान आहेत. by दुर्गविहारी
छान लिहिलंय.
तुम्ही त्याची माहिती, त्यातले बारकावे सांगाल
In reply to छान लिहिलंय. by प्रचेतस
खूप छान माहीती आणि फोटो
खूप मस्त लिहिताय. पुभाप्र.
मस्त
मस्त वर्णन!! ती वटवाघळं बघून
खूप छान. आताच पहिला भाग पण
देवबाग गाव
मस्तच हो!
धन्यवाद
In reply to मस्तच हो! by बोका-ए-आझम
मस्त
मस्त