Skip to main content

एक संघ मैदानातला - भाग १२

लेखक शि बि आय यांनी शुक्रवार, 03/06/2016 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
केक खाताना दादाचं सेंटी होण उगाच मनात घर करून बसलं होत. बाप आपल्या मुलीचा किती विचार करत असतो ते जाणवलं. थोड्यावेळाने मँच होती त्या दृष्टीने मानसिक तयारी करण गरजेचं होत पण काही केल्या पुढचा गियर पडत नव्हता. मँचसाठी लागणारा अर्लटनेस, अँग्रेशन मला माझ्यात कुठेच दिसत नव्हत. ह्या टुर्नामेण्टला मी कॅप्टन होते. त्यामुळे माझा मेंदू घोडयापुढे धावण अपेक्षित होत पण इथे तर मन आणि मेंदू कम्फर्ट झोन मधून बाहेर निघत नव्हते. "देवा… आता काय करू? " मी बाथरूमला जाऊन आले. उगाच तोंडावर भरपूर पाणी मारलं. ग्राउंडमध्ये जाऊन अंदाज घेतला तर तिसरी मँच आत्ता सुरु झाली होती.

आंब्याचे सासम/सासव

लेखक उल्का यांनी शुक्रवार, 03/06/2016 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर आंबा पाकृचा पाऊस पडतोच आहे तर आपण पण थोडे भिजवुया या प्रांजळ विचाराने प्रेरित होउन ही पाकृ देते आहे. ही पारंपारिक सारस्वत पा़कृ आहे. ह्या पाकृसाठी खास रायवळ आंबे उत्तम. कोकणात, गोव्यात ह्या जातीचे आकाराने मोठे आंबे पहावयास मिळतात. मुंबईत मात्र लहान लहान असतात. पण चवीला गोड असले की झाले.

तो प्रवाही प्रवास…!

लेखक अश्विनी वैद्य यांनी शुक्रवार, 03/06/2016 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
नदीकिनारी चालत जाताना उन्हाची ऊब जरा जास्तच जाणवत होती. तळपायांना थोडा गारवा मिळावा म्हणून किनाऱ्यावर लांबच लांब पसरलेल्या हिरव्या, थंडगार लुसलुशीत गालिच्यावर शूज काढून पाय टेकवत एका झाडाखाली बसले. तिथल्या नीरव शांततेचाही एक वेगळाच आवाज कानांना जाणवत होता. थोड्यावेळाने सहजच लक्ष गेलं. माझ्यापासून अगदी दोन पावलांवरच मुंग्याची चाललेली एक लांबच लांब रांग दिसली…एक एक मुंगी अगदी ओळीने पुढचीच्या बरोबर मागे जात होती…मध्ये येणारे छोटे छोटे दगड, खळगे एका मागोमाग एक सहज ओलांडून पुढे चालली होती.

किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने

लेखक पैसा यांनी गुरुवार, 02/06/2016 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
1 रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -८

लेखक मेघना मन्दार यांनी गुरुवार, 02/06/2016 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
भाग आठवा - आज माझा पहिला थांबा होता कोवेण्ट गार्डन. हे गार्डन नाहीये. हे एक शॉपिंग सेंटर म्हणता येईल अशी जागा आहे. कोवेण्ट गार्डन हे ट्युब स्टेशन आहे इथून उतरून चालत जाता येतं या छोट्याश्या मॉल मध्ये. इथे सगळ्या आंतरराष्ट्रीय ब्रांड ची छोटी दुकाने आहेत त्याचबरोबर लोकल ब्रांड ची सुद्धा दुकानं आहेत. सौंदर्य प्रसाधने , कपडे , दागिने , गृहोपयोगी वस्तू सुवेनिअर्स असं बरच काय काय मिळतं इथे. तसं स्वस्त इथे काहीच नाही पण इथे जरा किमती एकंदरीतच कमी वाटल्या मला.

घर क्रमांक – १३/८ भाग -२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/06/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
घर क्रमांक – १३/८ भाग - १ घर क्रमांक – १३/८ भाग -२ प्रणवने दार उघडले. तो अगदी निवांत दिसत होता. ‘‘काहीच नाही साहेब ! मी मस्त आहे’’ तो म्हणाला. ‘‘हंऽऽऽऽ मी निराश होत म्हणालो. ‘‘तू काहीच पाहिले नाहीस ? ऐकले नाहीस? निश्चित ?’’ ‘‘साहेब मला काहीतरी विचित्र आवाज ऐकू आला पण ते सोडल्यास बाकी काही नाही’’ ‘‘आवाज ? कसला आवाज?’’ ‘‘ कोणीतरी माझ्या मागे चालतय असा आवाज. एक दोनदा कोणी तरी कानात काहीतरी कुजबुजतय असाही आवाज ऐकू आला असे वाटले पण त्यानंतर काही नाही.’’ ‘‘तुला बिलकुल भीती वाटली नाही ?’’ ‘‘कणभरही नाही साहेब !

शृँगार १५

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 02/06/2016 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
हे इतक सोप होत मग मी उगाचच इतका वेळ वाया घालवला . किती सहजपणे ती तयार झाली . पण ती येईल तेव्हा खर . आता ती आली की परत एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊ . आताच अपॉंइंटमेंट घेऊन ठेऊ . खरच आहे १+१=११ आणि २-१=० . ओके आज घर जरा आवरून घेऊ फारच पसारा झाला आहे . आणि नविन काहीतरी करूया , काय करूया ? कर्टन्स चेंज करूया का ? हो बरेच दिवस झाले आता चेंज करायला हवे . नको तिला आवडणार नाही उगाच खर्च केला म्हणेल . मग दुसर काय कराव ? फुलं ठीक आहेत आणि आणि ... तेव्हढ्यात फोन वाजला . परांजपे सरांनी बोलावून घेतलं .

गीतबाधा

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 02/06/2016 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला होतं का कधी असं? भूतबाधा व्हावी तशी गीतबाधा होते मला. एखादं गाणं कचकचून चावतं आणि त्याची बाधा होते. मग ते गाणं मला बरेच दिवस सोडत नाही. कित्येक दिवस मी फक्त तेच गाणं ऐकतो, म्हणतो, ओरडतो, कोकलतो, पुटपुटतो. शेवटी बायको वैतागून ते गाणं बंद करायला सांगते. तरी ते गाणं मला सोडत नाही. संपूर्ण गाणं त्यातल्या संगीताच्या एक-एक तुकड्यासकट तोंडपाठ झाल्याशिवाय मीदेखील त्या गाण्याला सोडत नाही. आधी गाणं मला बाधतं, मग मी गाण्याला बाधतो. एका वेळेस १५-२० वेळा आणि असं किमान ८ ते १० वेळा मी ते गाणं ऐकतो.

आंबा पुराण - एक जिलबी

लेखक स्पा यांनी गुरुवार, 02/06/2016 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
ssere तुम्ही आंबा कसा खाता? आंबा घातलेल्या इतक्या पाक्रु बोर्डावर आल्यात की आता पब्लिक नुसता आंबा कसा खातात असे प्रश्न विचारायला लागली.मन एकदम गावच्या आठवणीत रमले आणि जिलबी पाडायचे ठरवले :) आंबा हे इतके प्रिय फळ आहे की ते वर्षभर का मिळत नाही, ह्याची नेहमी हुरहुर लागून राहते.त्यात आंब्याच्या इतक्या जाती की बघायला नको. कोकणात आंब्याची नावे पण विचित्र असतात.