Skip to main content

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 17/07/2016 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥

माझा मिपाविश्व प्रवेश

लेखक संत घोडेकर यांनी रविवार, 17/07/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ७-८ वर्ष झाली असतील, ऑफिसमध्ये काम करीत होतो. कंटाळा आला म्हणून शेजारी बसलेल्या सहकाऱ्याशी गप्पा माराव्या म्हणून त्याच्या डेस्क जवळ गेलो. तो हि बहुतेक कंटाळला असावा कारण त्याच्या संगणक पडद्यावर तो एक pdf उघडून कुठली तरी कथा वाचत बसला होता. “ काय रे, हे काय?”, मी विचारले. “अरे छान कथा आहे, अगदी उत्कंठावर्धक. तुला पाठवतो वाचून सांग कशी आहे ते”. त्याने उत्तर दिले. ठीक आहे म्हणून त्याने पाठविलेल्या कथा वाचनात मी गुंग झालो. खरोखरच उत्तम अशी ती कथा होती. “कुठून मिळाली रे कथा, खरेच छान आहे की”. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये मी त्याला विचारले.

रांजण खळगी

लेखक अभिजीत अवलिया यांनी रविवार, 17/07/2016 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यापासून अंदाजे 80 किमी वर आहे अहमदनगर जिल्हयातील टाकळी हाजी व निघोज हे गाव. आणी ह्या दोन गावांच्या दरम्यान आहेत आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक रित्या तयार झालेली खळगी (रांजण खळगी) ज्याची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहेत. बरीच वर्ष जाऊ जाऊ करत होतो पण इथे जाणे काही होत न्हवते. शेवटी मे महिन्यात अचानक एके दिवशी गेलो बघायला. शेकडो वर्षे कुकडी नदीच्या पाण्यातून येणारे दगड गोटे ह्या नदीपात्रातील बसाल्ट खडकावरून 'वर्तुळाकार पद्धतीने' फिरल्याने ही सर्व खळगी तयार झाली असावीत असा भूगर्भ शास्त्रन्यांचा कयास आहे. ही क्रिया सतत चालूच असल्याने खळग्यान्चा आकार वाढतच चालला आहे.

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 16/07/2016 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

काही क्षणिका - स्त्री

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 16/07/2016 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
(१) वस्त्रांत देह स्त्रीचा पुरुषांनी गुंडाळला. भोगदासी झाली स्त्री त्या क्षणापासूनच. (२) पद्मिनीने म्हणे चितेत उडी घेतली. आगीत वासनेच्या नाही ती जाळली. (३) देह वासनेचा अग्नीत हा जाळला उरले फक्त आता अमर प्रेम तराणे.
काव्यरस

लिंब, धोम, भोगावमधील काही क्षण

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 16/07/2016 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी भुईंजनजीकच्या किकलीगावात तिथले अप्रतिम कोरीवकाम असलेले भैरवनाथाचे मंदिर आणि शेदीडशे वीरगळ पाहिलेले होते. त्याच दिवशी नंतर शेरी लिंब येथील बारा मोटेची विहिर आणि धोम-भोगावची पण सफर झाली होती त्याची ही चित्रमय झलक. वाटेवरच्या लिंब गोवे गावातील दुर्लक्षित वीरगळ a लिंबची विहिर पहिल्या शाहूमहाराजांच्या पत्नी वीरूबाई ह्यांनी बांधवून काढली. ह्या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे. १२ मोटेच्या विहिरीचं प्रथमदर्शन.

जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 16/07/2016 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
जन का म्हणतिल, 'हाय हाय !'???? केलेच नाही तर राहिल कार्य काय ? . पोस्टा तळपतिल, फोटु झळकतिल; फेसबुके अपुला क्रम आचरतिल, असेच वाद संवाद पुढे चालतिल, नसशी तु फरक पडेल का? . वाद वर्षतिल, डोके पिकतिल, गेट टुगेदर हे जोरात चालतिल कुणा काळजी की न तळतिल, पुन्हा जिलब्यांचे हे घाणे? . सखेसोयरे डोळे पुसतिल, पुन्हा लेख कविता लिहितिल उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल तु सोडले फेसबुक त्यांचे काय जाय ? . अभासी जगास्तव काय कुढावे ! मोहिं लाईक्स च्या का गुंतावे ? डोके पिकवुनी का विन्मुख व्हावे ? ख-या जगतातील आनंदास???

अक्का महादेवी, कर्नाटकाची संत मीरा ?

लेखक माहितगार यांनी शनिवार, 16/07/2016 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांची मने अध्यात्म अथवा स्त्रीमुक्ती पैकी कशानेही दुखावतात अशांनी पुढे वाचले नाही तरीही चालेल. *** (मर्त्य मानवी नवरे तुझ्या चुलीत घाल !) *** Like treasure hid in the ground, like flavour in the fruit, like gold in the rock and oil in the seed, the Absolute is hidden in the heart. I love the Handsome One: he has no death decay or form no place or side no end nor birthmarks. I love him O mother.

॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 15/07/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥

इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥

आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती  ॥३॥

माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥

गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥

लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।