शेवटची भेट - (काल्पनीक)
आज त्याला खुप उदास वाटत होते . त्याच्या गावातील सिनेमा थिएटर आज पाडण्यात येणार होते . थिएटरची इमारत जुनी झाल्यामुळे गेले सहा महिने ते बंदच होते . ते थिएटर पाडुन तिथे एक भव्य शॉपिंग मॉल बांधला जाणार होता .
या थिएटरमध्ये पिक्चर्स पाहायला लहान असल्यापासुन ते थिएटर बंद पडेपर्यंत तो बरेचदा गेला होता . कधी आपल्या कुटुंबियांबरोबर , कधी शाळा , कॉलेजातल्या मित्रांबरोबर , तर कधी ऑफिसमधल्या कलिग्सबरोबर .
अनेक गाजलेले हिंदी , मराठी चित्रपट त्याने या थिएटरच्या सिनेमा हॉलमध्ये पाहिले होते . इंग्रजी हॉलिवूडपटांच्या अचाट दुनियेशीही याच थिएटरमध्ये त्याची ओळख झाली होती .