Skip to main content

जाणिवांच्या जखमा

लेखक महेश रा. कोळी यांनी शुक्रवार, 09/09/2016 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे असे दिवसा उजेडी आभाळ आंधारू नये करावे उपकार कुणी केस मोकळे सोडू नये. हसतोच आहे हाय मी मंदिरात अन् मसणातही काय याला दुःख कसले?असे कुणा वाटू नये. काल शिकलो मी धडा प्राक्तनाच्या बेदिलीचा क्षणासाठी तोडले मोगऱ्याला , मग वाटले तोडू नये का अशा जाणिवानां होतात जखमा सारख्या? काळीज चिरणार्या अशा आठवां कुणी काढू नये. ....म्हैश्या
काव्यरस

अडीच हजार गायींची चोरी करणारा अल्वरेज केली

लेखक महामाया यांनी गुरुवार, 08/09/2016 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतला हाॅलीवुड-सात चोरी ती चोरीच...पण त्या चोरीचं तत्कालीन अमेरिकी राष्ट्रध्क्षांनी देखील कौतुक केलं होतं. म्हैस किंवा गाय चोरून नेण्याची एखादी घटना आपल्याला जवळपास कधीतरी बघायला मिळते, पण अडीच हजार गायी एकत्र पळवून नेणं...अशक्यच...नाही कां...! अशाच चोरीच्या एका सत्य घटनेचं रोमहर्षक चित्रण होतं हॉलीवुडच्या ‘अल्वरेज केली’ या चित्रपटांत, दिग्दर्शक होता एडवर्ड डिमट्रिक्स. चित्रपटाच्या सुरवातीला पडद्यावर ही अक्षरे येतात... In every war...In every age...The forgotten weapon is...Food.

गुडगांव

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 08/09/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपणच खरवडून काढावे आपल्या अजस्र जखमेवरच्या अपक्व खपल्यांचे तुकडे.... तसं हे शहर भयाण स्वप्नांच्या रात्रीनंतर दिवास्वप्नांच्या भीतीने टक्क जागे राहावे..... तसं हे शहर सागराचा थांग घेताना अथांग व्हावे नदीने अन् त्याचा माज करावा...... असं हे शहर उत्फुल्ल पाण्यात कळकट शेवाळी तवंग तरंगावा..... तेच हे नगर एका पराभवातून अलगद दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या विजयाचा आनंदोत्सव.... .....गुडगांव

गुडगांव

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 08/09/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
आपणच खरवडून काढावे आपल्या अजस्र जखमेवरच्या अपक्व खपल्यांचे तुकडे.... तसं हे शहर भयाण स्वप्नांच्या रात्रीनंतर दिवास्वप्नांच्या भीतीने टक्क जागे राहावे..... तसं हे शहर सागराचा थांग घेताना अथांग व्हावे नदीने अन् त्याचा माज करावा...... असं हे शहर उत्फुल्ल पाण्यात कळकट शेवाळी तवंग तरंगावा..... तेच हे नगर एका पराभवातून अलगद दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या विजयाचा आनंदोत्सव.... .....गुडगांव

उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम!

लेखक पिलीयन रायडर यांनी गुरुवार, 08/09/2016 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः- इथे तुम्ही नेहमीच एकाहुन एक सरस पाकृ पहाता. पण ते म्हणजे कसं की सेलेब्रेटींचं आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहिल्या सारखं आहे. सामान्यांच्या व्यथा तुम्हाला कशा कळाव्यात? तर समाजातलया तळागाळातल्या लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण ह्या पाकृ मध्ये आहे. हृदय हेलावणारे काही फोटो आहेत. कोमल मनाच्या लोकांनी पाहु नका! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ तर काय झालं की गणपती आले.. मग सगळीकडे मोदकांचे फोटोच फोटो.. साधेसुधे नाही, उकडीचे! आम्ही इथे अमेरिकेत, जिथे आई नाही की चितळे नाहीत की मोदक करुन आयते खाऊ घालतील.

मी एकटी ....

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 08/09/2016 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकटी .... एल तीरावर मी एकटी पैलतीर त्याला नाही समोर पसरला अथांग दर्या साजणाचा पत्ता नाही परतुनी आले सारे अजून तो आला नाही रात्रीचा चंद्र देतसे तो येईल याची ग्वाही रंग हळदीचा अन मेंदीचा अजून उतरला नाही स्वप्नांचे जहाज बुडाले साजणाचे तारू वाचले का नाही ? बघत बसते खुणा वाळूतल्या निरखीत असते लाटांनाही नकोत रत्ने मज सागरा का साजण माझा परत देत नाही ? राजेंद्र देवी

एक स्पॅनिश टोपी

लेखक सुहास बांदल यांनी गुरुवार, 08/09/2016 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
ऑनलाईन बँकिंग आता आपल्या जीवनातील रोजचा भाग आहे. गेल्या एका दशकात आपण बरेच त्यात निपुण झालो आहोत. तरी आपल्याला वाटते कि आपल्याला सगळे माहित आहे आणि आपण एवढी काळजी घेतो कि आपल्याला कोण टोपी घालणार आहे. आमच्या आयुष्यात हा टोपी घालण्याचा प्रसंग ८ महिन्यांनपुर्वी घडुन आला आणि प्रस्थापित मुलतत्वाला सॉलिड धक्का लागला. जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही मित्र मंडळी बसुन या वर्षी च्या ट्रिप चे नियोजन करत बसलो होतो. अखेर बऱ्याच चर्चे अंती टेनेरीफ स्पेन वर एकमत झाले. मार्च च्या इस्टर हॉलीडेज मध्ये जायचे ठरले. लहान मुलांची पसंती पण कुठे तरी समुद्र किनारी जायची होती.

अवधूत (भाग-९)

लेखक प्रभास यांनी गुरुवार, 08/09/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
एकदम बेसावधपणेच तो पाण्यात कोसळला... ग्ळक्क… ग्ळक्क… पाण्याचे जोरदार घुटके नाकातोंडात वेगाने शिरले. डोक्यात एकदम जोरदार कळा उठल्या. काही क्षणांतच त्याचे पाय विहिरीच्या तळास लागले. अचानक तो जाणीवेत परत आला. ही काय भानगड चालू आहे? बंद झालेले डोळे चटकन उघडले. त्या एक दोन क्षणांतच त्याला मिटल्या डोळ्यांपुढे काहीतरी दिसलेलं होतं. अचानक विजेच्या प्रकाशात वस्तु झळाळून उठतात तसंच. पण ही विचार करण्याची वेळ नव्हती. नवीन श्वास घेणे आवश्यक आहे… भराभर हातपाय मारत तो पाण्याच्या बाहेर आला. एव्हाना श्वास संपलेला होता. बाहेर येऊन त्याने नाकातोंडात शिरलेलं पाणी थुंकून काढलं. जोरात ढास लागलेली होती.

श्रीगणेश लेखमाला - अवघे धरू सुपंथ

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी गुरुवार, 08/09/2016 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background-color: #F7F0ED; } .inwrap { border: solid transparent; border-width: 30px; -moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7NoipWB8umtRrJQI6xzsP9FoDw6_R28E8ubxIAvPgpG4Z1LtZRt2dgHOA186X9lZTDVhRTrF3vUlcpvAIO02SZGyaPGfzBu_1KJePL-VNuMnf4T9U_G2ZkGmi57E5w2Rxv6Ao7Qay1ifyaIlbhM6yyjE0vAxsimDT3c6QyttQMKk0OJc1lxdOwvwL9mOpmNWJPEvXOasIj5H2fil5gJCc69T1Cq_u5J5eJf73JwtFrs1LOLfqFDxLhq9koWBdnOriy-DMcB-3Z4cy4rQC0idezcO1kcH0uFgDzR1kFE9QkUAcSNByEmsJVoYRCOghsflaC-WBAszJ4XhOU1iM5AzcL_Zs3fb7Lr8brZCNyUaKYpmtSCTVYWaGyH2w7gTXNfLSFunWk6h2DL8I3Dh_S

यार देवदार

लेखक पथिक यांनी गुरुवार, 08/09/2016 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदाच हिमालयात जाऊन आल्यावर लिहिलेल्या या ओळी.. मराठीत भाषांतर करण्याची गरज वाटत नाही. काय म्हणता ? यार देवदार मैंने सोचा न था की तुम चंद मुलाक़ातों में ही यूँ दिल में बस जाओगे अपनी महकती हुई ख़ामोशी मेरे ज़ेहन में यूँ रख जाओगे अपने गूंजते हुए सन्नाटों में यूँ बार बार बुलाओगे तुम्हें देखा तो तुम अजनबी से लगे थे तुम्हें छोड़ कर आया हूँ तो किसी अपने की तरह याद आते हो तुम, यार देवदार