Skip to main content

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ३

लेखक पद्मावति यांनी रविवार, 11/09/2016 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
कॅॅपस्टॅड, द मदर सिटी अर्थात केप टाउन!!! अगदी आटोक्यात, हाकेच्या अंतरावर आणि सतत नजरेच्या टप्प्यात असणारे अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही या शहराची खासियत आहे. समशीतोष्ण हवामान, समुद्र, डोंगर रांगा, मुबलक वन्यजीवन आणि त्याचबरोबर उत्तम कुझीन, शॉपिंग साठी असंख्य प्रकारचे पर्याय, मुलांसाठी सुद्धा झू, अक्वॅरियम्स.... जगभरातील पर्यटकांच्या बकेट लिस्ट मधे हे शहर नक्कीच खूप वरच्या नंबर असते. वेळ कसा जाईल हा प्रश्न नाहीच इथे उलट असलेला वेळ नेहमी कमीच पडतो मग ते चार दिवस असोत किंवा चार महिने.... केप टाउनचे मूळ रहिवासी खोई या जमातीचे लोक होते.

बाप ------- हवा आहे पण कशाला?

लेखक मी कोण यांनी शनिवार, 10/09/2016 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

श्रीगणेश लेखमाला: पायरोग्राफी: जाळ अन् धूर संगटच...

लेखक मूनशाईन यांनी शनिवार, 10/09/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background-color: #F7F0ED; } .inwrap { border: solid transparent; border-width: 30px; -moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7NoipWB8umtRrJQI6xzsP9FoDw6_R28E8ubxIAvPgpG4Z1LtZRt2dgHOA186X9lZTDVhRTrF3vUlcpvAIO02SZGyaPGfzBu_1KJePL-VNuMnf4T9U_G2ZkGmi57E5w2Rxv6Ao7Qay1ifyaIlbhM6yyjE0vAxsimDT3c6QyttQMKk0OJc1lxdOwvwL9mOpmNWJPEvXOasIj5H2fil5gJCc69T1Cq_u5J5eJf73JwtFrs1LOLfqFDxLhq9koWBdnOriy-DMcB-3Z4cy4rQC0idezcO1kcH0uFgDzR1kFE9QkUAcSNByEmsJVoYRCOghsflaC-WBAszJ4XhOU1iM5AzcL_Zs3fb7Lr8brZCNyUaKYpmtSCTVYWaGyH2w7gTXNfLSFunWk6h2DL8I3Dh_S

दु:खाच्या वाटेवरचे गाव

लेखक शिवोऽहम् यांनी शुक्रवार, 09/09/2016 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
वेदिका कुमारस्वामी यांच्या कविता सध्या वाचतोय फेसबुकवर. कविता नव्या आहेत, नव्या दमाच्या आहेत. दम कोंडणार्‍या आहेत. धग सोसवत नाही आणि तोंड फिरवायचीही सोय नाही. यापुर्वी इतकी घालमेल झाली होती तेंव्हा जिएंची राधी वाचून खाली ठेवली होती. का चंद्रावळ किंवा स्वामी? गळ्यात माझ्याच आतड्यांचे फास अडकवून अस्संच फरफटवत नेलं होतं ती गोलपिठ्यातली कुठली बरं कविता? की सगळ्याच? ही जिवंत कविता आहे. - ताजी, रक्ताळलेली, जाईजुईच्या काटेरी डोंगरांमधली, लुत भरलेल्या ओंगळ कुत्र्याची. हिरव्या रेषांच्या वाटांची, चमेलीच्या अंगाची. - आज्जीची, अम्माची, हेगडेची, भद्रा नदीसारखं हसण्याची, कॉफीच्या बियांची.

आता मला वाटते भिती

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 09/09/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
आता मला वाटते भिती कोठे गुंड त्रास देती कोठे पोलीस मार खाती अशा या समाजाची आता मला वाटते भिती कधी तरुणाईचे भांडण तर कधी रस्त्यावरचे भांडण सुशिक्षित समाजातले असंस्कृत जन अशा या जनाची आता मला वाटते भिती रामराज्याची अपेक्षा पण वागण्याची रावणनिती या समाजाला आता नाही कोणाची भीती अशा या समाजाची आता मला वाटते भिती या समाजाच मी एक भाग मला माझ्या सावलीची आता मला वाटते भिती राजेंद्र देवी

अर्पणपत्रिका...

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 09/09/2016 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांचं एक वेगळं, स्वतःच असं जग आहे हे सगळ्यांना ठाउक आहे. पण या पुस्तकांत सुद्धा एक त्याचाच भाग असलेलं पण तेवढचं स्वतंत्र अस एक जग असतं ते म्हणजे 'अर्पणपत्रिका'... मनात वाटलं या अर्पणपत्रिका, हे जग एकत्र आणलं तर... बस या एका विचाराने हा धागा काढला आहे... मला भावलेल्या आवडलेल्या काही अर्पणपत्रिका मी इथे देत आहे... आपणही या संग्राहात हातभार लावावा अशी विनंती... अर्पणपत्रिका म्हटलं कि सगळ्यात पहिल्यांदा मला जी.ए. आठवतात.. म्हणुन सुरुवात त्यांच्याचकडुन.. ‘हिरवे रावे’ हा कथासंग्रह आपल्या आईला अर्पण करताना जी.ए. म्हणतातः कै.

हॅमर कल्चर

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 09/09/2016 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
हॅमर कल्चर लेखक :- प्रभाकर नानावटी बाविसाव्या शतकातील बाप-लेकीत घडलेला हा संवाद. "पपा, पपा, तुम्ही सतत माझ्यापासून तो हातोडा का लपवून ठेवता?" "त्याच्यामागे एक फार मोठी गोष्ट आहे." "पपा सांगा की ती गोष्ट मला" "विसाव्या शतकात घडलेली ही गोष्ट आहे. त्याकाळी एक ‘प्रगत’ समाज होता. अचानक एके दिवशी एकमेकांच्या डोक्यावर हातोडा मारण्याची लाट उठली. काही महिन्यातच ही क्रेझ सर्वांच्या अंगवळणी पडू लागली. लोकांना दुसरे काही सुचेनासे झाले. जो उठतो तो हाण दुसऱ्याच्या डोक्यावर हातोडा. हळू हळू हा समाज बदलला.

एकेकाचे जगणे

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 09/09/2016 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला कशाची पडलेली असते अन कुणाला कशाची कुणाला काय भावतं अन कुणाला काय कुणाला काय सलतं अन कुणाला काय अन ज्याला जे भावतं, जे सलतं त्याला तेच महत्वाचं वाटतं …. कुठे 'गोली मार भेजे में' कुठे 'जिस्म' कुठे 'जय जय राम कृष्ण हरी' कुठे 'जय हिंद' कुठे 'गांधीगिरी' कुठे 'नथ्थुराम' कुठे काय नि कुठे काय या ना त्या प्रकारे घेतो प्रत्येकजण जगणे मोल कुठे सोनेरी कुठे बिलोरी कुठे बेगडी …. पण प्रत्येकाने मोजलेली किंमत मात्र असते अस्सल - रक्ताची अश्रूंची हृदयाची आत्म्याची

रात्रीस खेळ चाले....

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 09/09/2016 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीस खेळ चाले.... गूढं त्या महाली केस सोडून ती बसलेली काळा मिट्ट अंधार अन काजव्याने पण मान टाकलेली अचानक एक टिटवी ओरडली आढ्याशी भुते खदखदली वारा नव्हता तरी अचानक तावदानाची दारे खडखडली रात्र खूपं वाढलेली कोल्हे कुत्री केकाटली झरोक्यातून सावली उतरली मांजराने बाहुली पळवली.... राजेंद्र देवी