Skip to main content

संघः कलियुगातील एक चमत्कार

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 12/09/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य.

‘धागे अरब जगाचे’: गुंतागुंतीच्या जगाची ओळख (पुस्तक परिचय)

लेखक आतिवास यांनी सोमवार, 12/09/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी अफगाणिस्तानमध्ये असताना शिया-सुन्नी, वहाबी-सलाफी, इराण-सौदी अरेबिया ही द्वन्दवं जगात आहेत याचा जाणीव ठळक झाली होती. त्यानंतर इस्लाम आणि अरब जगाबद्दल कुतूहल वाढलं होतं. बरेच प्रश्नही पडत होते. अरब जगाबद्दल मला दोनच गोष्टी माहिती होत्या – इथलं तेल आणि इथला कडवा इस्लाम. अरब जगातल्या बहुसंख्य देशांनी अफगाणिस्तानमधल्या तालिबान राजवटीला मान्यता दिली नव्हती हे मला आश्चर्यजनक वाटलं होतं. यामागे नेमकं काय कारण असेल? शिया आणि सुन्नी हे दोन्ही इस्लामचे पंथ आहेत, मग त्यांच्यात भांडणाचा मुद्दा तरी काय आहे? इस्त्रायलला आपण (भारत) पाठिंबा देतो खरा, पण ते सारखे हल्ले का करतात पॅलेस्टाईन जनतेवर?

आंतरजालावरचा भेंडीपणा !!

लेखक इरसाल यांनी सोमवार, 12/09/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारण कोणा एका मित्राने, ओळखीच्याने तो आधीच कार्यरत असलेल्या एखाद्या मराठी संस्थळाची माहिती दिली आणी आपणही त्यात सामील व्हावे अशी गळ घातली की "त्या" लाही वाटते की बघुया तरी की ही आभासी दुनिया आहे तरी कशी ? हो नाही करता करता "तो" सगळे सोपस्कार पार पाडुन या लोंढ्यात एकदाचा सामील होतो. रंगीबेरंगी असणारी ही दुनिया त्याच्या मनाला, मनात येणार्‍या लेख्/कविता/विचारांना कधी एकदा जालावर ओसंडुन वाहु ह्याच्या कळा द्यायला सुरुवात करते. जर आधीच कोणी सखा/मित्र/पाठीराखा असेल तर हा प्रवेश सुकर ठरतो.

मनात असावा सतत श्रावण....

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 12/09/2016 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
मनात असावा सतत श्रावण.... तुझे येणे जणू असते वादळ, ऐनभरातले तुझे बोलणे जणू असते गीत, सुरातले तुझी ओढ असते जणू पाणी, पुरातले तुझे रुसणे असते जणू लटके, प्रेमज्वरातले तुझे लाजणे उधळत असते रंग, गुलाबातले तुझी आठवण येणे असते जणू ऊन, श्रावणातले एवढेच असावे मनात असावा सतत श्रावण जरी दीस असले ग्रीष्मातले..... राजेंद्र देवी

रहाटगाडगं.

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/09/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा निवांत वाटतय.. सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.! रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला? बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!? हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला. असं का वाटत नाही? ? ? पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला! असो... चालायचंच. पाणी वहातं राहिलं पाहिजे. रहाटगाडगं फिरवलं पाहिजे!

गौराई...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 12/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
गौराई... झाली तीच्या आगमनाची घाई आता जोडीने येईल गौराई दारी उमटतील पाउले कुंकवाची सुख शांती अन समृद्धींची सजतील लेऊन शालू भरजरी असेल मध्ये गणराया मखरी दोन दिसांची असेल माहेरवाशीण पंचपक्वान्नाचे असेल जेवण देता निरोप येईल डोळा पाणी गौराई माझी लाडाची गं राणी राजेंद्र देवी

सफर ग्रीसची: भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस

लेखक निशाचर यांनी सोमवार, 12/09/2016 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन भाग २ - प्राचीन कोरिंथ भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत असलेल्या मायसिनीतून पाय निघत नव्हता. पण ३ वाजून गेल्यावर तिथल्या रखवालदारांनी हाकलण्याआधी निघालो. बाहेर मस्त उन पडलं होतं. निळंशार आकाश आणि समोर ऑलिवच्या झाडांना घेवून उभे असलेले डोंगर! आणखी दोनतीन तास सहज उजेड असणार होता. ३ वाजता साइट बंद करण्याच्या आळशीपणाला नावं ठेवत बाहेर सावलीत गप्पा मारत बसलो.

पुणेकरांचा मिपा च्या वर्धापन निमित्त शुभेच्छांचा वर्षाव

लेखक वाल्मिक यांनी रविवार, 11/09/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच हाती आलेल्या माहित नुसार मिपाच्या 10 वर्षे झाल्यामुळे अनेक पुणेकरांनी आर्जवून अभिमानदं केले ठराविक मासले खाली प्रमाणे 1) आमचे दुकान 2-4 बंद असते तसेच मिपा पण दुपारी बंद असते ,ह्यामुळे बंधुभाव वाढतो ,वर्धापन दीना निमित्त पेढे आमचंच दुकानांतून घ्या - चितळे 2) फक्त 10 ?

विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 11/09/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता. वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव. बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही.

न्यू यॉर्क : ०५ : टाईम्स स्क्वेअर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 11/09/2016 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================================== न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...               ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर...