Skip to main content

कामाची टाळाटाळ, उत्पादकता, व्यवस्थापन आणि कानबान

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 21/10/2016 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, डिस्क्लेमरः या लेखात बरेच मुद्दे आहेत ज्यावर एक एक कादंबरी होईल, पण थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा. प्रतिसादांमधे चर्चा/प्रश्न उत्तरे यातून आणखी उपयुक्त होईल अशी आशा. धन्यवाद. जशी आपण उत्तरोत्तर प्रगती करतो तसा कामांचा व्यापही वाढत जातो. वेळ आणि शरीरक्रियांवर आपला फारसा ताबा नसतो. मग या सर्वातून काही लोक कसे यशस्वी होतात किंवा ही तारेवरची कसरत फार त्रास न होता कशी संभाळतात?

अरबस्थाना तील दोन बोधकथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/10/2016 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
... .................... कथा क्रमांक एक एका गावात एक माणुस रहात असतो..तो "मै जिंदगी भर रोता ही रहा हूं" टाईप असतो.. तो परमेश्वरावर नाराज असतो..अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही असे म्हणत तो कुढत जीवन जगत असतो... तो विचार करत रस्त्याने जात असता त्याला एक फकीर दिसतो.. तो त्या फकिराला थांबवतो.अन अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही.. असे रडगाणे सुरू करत परमेश्वरावर नाराजी व्यक्त करतो.. फकीर हसतो व म्हणतो..अरे एव्हढेच ना?

"दिल्याने " होत आहे रे ...

लेखक पाणक्या यांनी गुरुवार, 20/10/2016 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
"प्लिज मला सोडतोस का रे ऑफिसला" आशु एकदम घाईघाईत म्हणाली. ठीक आहे म्हणून निघालो आम्ही बाईकवर. वाटेत गप्पा मारताना सांगत होती "काल कॅश एक्सेस लागली, कुण्या एका वयस्कर व्यक्तीची पेन्शन मोजून घेण्यात चूक झाली असावी, आज गेल्या गेल्या कॅमेरा चेक करून आणि त्यांना फोन करून पैसे परत करते त्यांचे". गाडी वाट काढत काढत कॅम्प पर्यंत आली तोच मागून एका रिक्षावाल्याने आवाज दिला, " ओ ताई तुमचा स्कार्फ पडलाय मागे तिकडे ". मी गाडी स्लो केली पण आशु म्हणाली प्लिज चल पुढे ... स्कार्फ मागे कुठे पडलाय काय माहिती ... वेळ जाईल अरे शोधण्यात". मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना.

पाचवी सावित्री

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 20/10/2016 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
सावित्री म्हटलं की दोनच सावित्री साधारणपणे आठवतात. पण नीट विचार केल्यावर दोन नाही, तर चार सावित्री डोळयांसमोर येतात. एक थेट प्राचीन काळातून आपल्यापर्यंत येते ती महाभारताच्या माध्यमातून. सूर्यदेवतेची उपासना करून झालेली ही मुलगी, ’सवितृ’ बद्दलची कृतज्ञता म्हणून तिचे नाव आहे सावित्री. कथा असे सांगते की तिच्या तेजामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. मग ती स्वत:च वर निवडते. वनवास पत्करावा लागलेल्या अंध राजाच्या मुलाची - सत्यवानाची ती पती म्हणून निवड करते. त्याचे एक वर्षाचेच आयुष्य बाकी आहे, हे नारदांनी सांगूनही सावित्री त्याच्याशीच लग्न करते.

समेट....

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 20/10/2016 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
समेट.... रम्य ती पहाट, शांत तो घाट, चंद्रभागेचा हलकासा खळखळाट गळा तुळसीमाळा, मुखी विलसतसे हास्य रम्य तो आरतीचा थाट गजबजला बघ हा चंद्रभागेचा घाट कीर्तनी दंग पाहा ते भाट युगानुयुगे उभा विठू माझा ताठ धन्य ती पाउलिची वीट आता कोठली वारी धरिली खाट बोलाव माउली कर आता समेट राजेंद्र देवी

पहिलं पाऊल

लेखक विनायकपाटील८९ यांनी गुरुवार, 20/10/2016 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणात क्षण विरत गेला काळ ही पुढे चालत गेला अबाल राहिलो आजही तसेच कर्तव्य ना दिसले कुठेच उद्या करीन म्हणता म्हणता उद्या कधी आलाच नाही दाभोळकर, कुलबूर्गी गेले तरी आम्हाला जाण नाही हो, मस्त चाललंय आमचं पण पोट मात्र भरत नाही शोधून शोधून थकलो, पण समाधान कुठे मिळत नाही इराक, सिरीया साक्ष आहे भविष्य फार स्पष्ट आहे सावरा लवकर स्वतःला ऐका तळमळीच्या साद ला कुठून येतात कन्हैया, उमर पुरे आता यांचा कहर का नाही पुरस्कारांचा मान हेच का सामाजिक भान बदललं पाहिजे वाटतं बलिदान, निस्वार्थ जाचतं शक्य आहे तुम्हा आम्हालाच फक्त पहिलं पाऊल लागतं.....

The Place of Peace

लेखक विनायकपाटील८९ यांनी गुरुवार, 20/10/2016 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
जसा पाण्याने वाहण्याचा आपला धर्म कधी सोडला नाही तसाच आम्हीही निरंतर रस्त्याने प्रवास करण्याचा आमचा छंद गोडी लागल्यापासून आजवर सोडलेला नाही. असाच या निरंतर रस्त्यांचा वर्षाचा शेवटचा प्रवास आम्ही मावळ्यांनी ५ dec २०१५ रोजी करण्याचा योजिला. पण नेहमी प्रमाणे जागा ठरत नव्हती, आणि नेहमीप्रमाणेच टांगू came up with an idea of हरिश्चंद्रगड…!!